Lokmat Sakhi >Health >Pregnancy > स्तनपान करताना आईने लक्षात ठेवाव्यात अशा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात आईचे दूध म्हणजे वरदान !

स्तनपान करताना आईने लक्षात ठेवाव्यात अशा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात आईचे दूध म्हणजे वरदान !

7 breastfeeding tips every mother should know : स्तनपान करताना नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2024 04:17 PM2024-08-07T16:17:03+5:302024-08-07T16:26:54+5:30

7 breastfeeding tips every mother should know : स्तनपान करताना नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी...

7 Breastfeeding Tips Every New Parent Should Know 7 Breastfeeding Tips for New Moms | स्तनपान करताना आईने लक्षात ठेवाव्यात अशा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात आईचे दूध म्हणजे वरदान !

स्तनपान करताना आईने लक्षात ठेवाव्यात अशा ७ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात आईचे दूध म्हणजे वरदान !

पहिल्यांदाच आई - वडील होणे ही भावना खूप छान असते. त्या बाळासोबतच जोडप्याचा आई - वडील म्हणून देखील जन्म होत असतो. नवीनच आई - वडील झाल्याने नेमके काय करावे हे काहीवेळा सुचत नाही. पहिल्यांदाच आई - वडील झाले असल्याने अंगावर एक नवी जबाबदारी येते. अशावेळी बाळाची नेमकी  काळजी कशी घ्यायची याचा अनुभव काहीच नसतो. हा अनुभव नसल्याने काही जोडणी खूप चिंतेत असतात काय करावे आणि काय करु नये असे वाटत असते. आपल्यामुळे बाळाला काही त्रास होऊ नये, त्याची योग्य पद्धतीने काळजी घेत राहावी अशी भावना प्रत्येक नवीन आई - वडिलांना येते(7 breastfeeding tips every mother should know).

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी हे समजून घेण्यासाठी जोडपी अनेक उपाय करतात. पण बाळाचा जन्म झाल्यानंतरच त्याचा खरा अनुभव येऊ लागतो. बाळाची काळजी कशी घ्यावी या पहिल्यांदाच आई - वडील होणार असणाऱ्या प्रत्येक पालकांसाठी गरजेच्या आहेत. लहान बाळाची काळजी कशी घ्यावी, त्याचे खाणे पिणे, पोषण आणि त्याची स्वच्छता यावर विशेष लक्ष द्यावे लागते. पुण्याच्या बाल आरोग्य तज्ज्ञ कल्पना सांगळे यांनी नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, याबद्दल अधिक माहिती  दिली आहे. त्यामुळे नव्यानेच आई - वडील झालेल्या आई - वडिलांसाठी बाळाची काळजी कशी घ्यावी यासाठी काही खास टिप्स पाहूयात(7 Breastfeeding Tips for New Moms).

नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी... 

१. नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कोणतेच पदार्थ देऊ नयेत. नवजात बाळाला पाणी देखील देऊ नये. आईच्या दुधातून बाळाला योग्य ते आणि आवश्यक पोषण मिळत असते. त्यामुळे बाळाला फक्त आईचेच दूध द्यावे. 

२. बाळाचा जन्म झाल्यानंतर पुढचा एक तास हा आई आणि बाळासाठी फारच महत्वाचा असतो. आई आणि बाळामधील नातेसंबंध निर्माण होण्यासाठी हा वेळ अतिशय महत्वाचा असतो. या काळात आई आणि बाळाचा स्किन टू स्किन संपर्क येणे महत्वाचे असते. 

३. बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या एका तासात बाळाला आईचे दूध देणे अतिशय महत्वाचे असते. आईला दूध येण्यासाठी किमान २ ते ३ दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत आईला जरी दूध आले नाही तरी आईने बाळाला स्तनपान करणे महत्वाचे असते. असे केल्याने आईची दूध येण्याची प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत मिळते. 

ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य ? तज्ज्ञ सांगतात अशी घ्या काळजी... 

४. पहिल्या दिवशी किंवा सुरुवातीचे काही दिवस बाळाच्या पोटाची क्षमता ही एक चमचाभर दूध पिऊ शकेल इतकीच असते. त्यामुळे बाळाचे पोट भरले आहे की असे समजून किंवा बाळाला भूक लागेल म्हणून वारंवार दूध देणे टाळावे. 

५. बाळाला बाहेरचे दूध किंवा मध, साखरेचे पाणी असे इतर कोणतेही पदार्थ देऊ नयेत. बाळाला फक्त आईचे दूध द्यावे. 


६. सुरुवातीला आईला दूध येत नसले तरीही अशावेळी बाळाने आईचे स्तनाग्रे चोखणे आवश्यक असते. यामुळे आई आणि बाळातील नातेसंबंध वाढण्यात आणि आईला दूध येण्याच्या प्रक्रियेत मदत होते.   

७. आईची डिलिव्हरी झाल्यानंतर आईला फार थकवा आल्याने शक्यतो बाळाला आईकडे दिले जात नाही. तेव्हा असे करु नये. बाळाला जास्तीत जास्त वेळ आईच्या जवळच ठेवावे, यामुळे आई आणि बाळातील नातेसंबंध वाढण्यात मदत होते.  

Web Title: 7 Breastfeeding Tips Every New Parent Should Know 7 Breastfeeding Tips for New Moms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.