Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

Alia Bhat Shared Her Pregnancy Experience: स्वत:च्या प्रेग्नन्सीबाबत आलियाने नुकतीच एक आठवण शेअर केली आहे.. गरोदरपणाचा बाऊ करणाऱ्या प्रत्येकीसाठी आलियाने सांगितलेला हा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2023 05:28 PM2023-01-02T17:28:57+5:302023-01-02T17:30:29+5:30

Alia Bhat Shared Her Pregnancy Experience: स्वत:च्या प्रेग्नन्सीबाबत आलियाने नुकतीच एक आठवण शेअर केली आहे.. गरोदरपणाचा बाऊ करणाऱ्या प्रत्येकीसाठी आलियाने सांगितलेला हा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे..

Actress Alia Bhat shared her pregnancy experience, said early few weeks of pregnancy were really difficult, but.... | प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

Highlightsअनेक अभिनेत्री आज गरोदर असतानाही काम करतात. आलियानेही तसंच केलं. पण तिच्याबाबत आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गरोदर असताना तिने तिच्या आयुष्यातल्या पहिल्या हॉलीवूड ॲक्शनपटातही काम केलं.

अभिनेत्री आलिया भटचं (Actress Alia Bhat) लग्न, त्यानंतर तिने गरोदर असल्याची दिलेली गोड बातमी आणि नंतर काही महिन्यांमध्ये तिला झालेलं कन्यारत्न.... या एका मागे एक घडलेल्या घटनांमुळे मागच्या संपूर्ण वर्षातच आलिया भट- रणबीर कपूर ही जोडी चर्चेत होती. आलिया आजची आघाडीची अभिनेत्री. त्यामुळे तिच्याविषयीच्या चर्चांना नेहमीच उधाण येतं. कारण तिच्याविषयी ऐकण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सूक असतात. आता नुकताच आलियाने एका मुलाखतीदरम्यान तिच्या प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळातला जो अनुभव (pregnancy experience) सांगितला आहे, तो प्रत्येकीसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.(Alia Bhat shared her inspiring experience of pregnancy)

एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट म्हणतेय की प्रत्येक गरोदर स्त्रीला होतो, तसाच गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये तिलाही खूपच त्रास होत होता.

मेहंदी लावून लालसर झालेले केस आवडत नाही? मेहंदीमध्ये ४ गोष्टी टाका, केस होतील काळेभोर- सिल्की

मळमळ, नॉशिया, थकवा असं सतत सुरू होतं. पण तरीही तिने चित्रपटांच्या काही प्रोजेक्टबाबत आधीच कमिटमेंट केलेल्या असल्याने तिला या काळातही काम करणं गरजेचं होतं.

 

शिवाय सुरुवातीचे १२ आठवडे प्रेग्नन्सीबाबत कुठेही बोलू नको, असं तिच्या डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं. त्यामुळे शूट, प्रमोशन यादरम्यान खूप त्रास व्हायचा, पण कुणाला काही सांगू शकत नव्हते.

कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

म्हणून मग शूटदरम्यान जसा वेळ मिळेल, तसा आराम करणं, जमेल तशी झोप घेणं असं तिचं सुरू होतं. ती म्हणते काम तर महत्त्वाचं होतंच. पण त्याकाळात कामाएवढंच महत्त्व माझ्या तब्येतीलाही होतं.  

 

अनेक अभिनेत्री आज गरोदर असतानाही काम करतात. आलियानेही तसंच केलं. पण तिच्याबाबत आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गरोदर असताना तिने तिच्या आयुष्यातल्या पहिल्या हॉलीवूड ॲक्शनपटातही काम केलं.

चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर टाकून देऊ नका, भांडी स्वच्छ करण्यासाठी करा खास उपयोग

ती म्हणते की ही गोष्टी तिच्यासाठी खरोखरच खूप महत्त्वाची आहे. कारण या एका गोष्टीतून तिने हा अनुभव घेतला की जर तुम्ही ठामपणे मनावर घेतलं आणि एखादी गोष्ट ठरवली तर तुमचं शरीरही तुम्हाला तेवढीच खंबीर साथ देतं. तिचा हा अनुभव खरोखरच प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.  

 

Web Title: Actress Alia Bhat shared her pregnancy experience, said early few weeks of pregnancy were really difficult, but....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.