Join us   

प्रेग्नन्सीबाबत पहिल्यांदाच बोलली बिपाशा बसू, म्हणाली तो क्षण अतिशय भावनिक होता, आणि.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 2:32 PM

Viral Post Of Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बसूने नुकतेच ती गरोदर असल्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना गोड बातमी दिली.. आता पहिल्यांदाच ती तिच्या प्रेग्नन्सीबाबत दिलखुलासपणे बोलली आहे.. (Bipasha Basu is pregnant)

ठळक मुद्दे तो क्षण, तो प्रसंग आपल्यासाठी आणि करणसाठी अतिशय भावनिक होता, असं ती आवर्जून सांगते. 

बिपाशा बसू आणि तिचा पती करणसिंह ग्रोव्हर (Bipasha Basu and Karan Singh Grover) या दोघांनीही बिपाशाच्या प्रेग्नन्सीची न्यूज अतिशय सिक्रेट ठेवली होती. त्यामुळे जेव्हा बिपाशाने तिचे बेबी बंप्स दाखविणारे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले, तेव्हा तो सगळ्यांसाठीच एक गोड धक्का होता. सध्या बिपाशाने तिला कितवा महिना आहे, याबाबत काहीही खुलासा केलेला नाही, पण ती ५ ते ६ महिन्यांची गर्भवती (Bipasha said about her pregnancy) असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आपण आई होणार आहोत, हे समजल्याचा क्षण आणि पुर्ण गर्भारपणाचा प्रवास हा काळ प्रत्येक गर्भवतीसाठी जसा खास असतो, तसाच तो बिपाशासाठीही आहे.. म्हणूनच तर ती तिच्या प्रेग्नन्सीबाबत खूप भरभरून बोलते आहे..(Raaz actress Bipasha Basu)

 

बिपाशा म्हणाली की कोविड येण्याच्या पुर्वी एखादे वर्ष ते बाळ होण्यासाठी प्रयत्न करत होते. पण तेव्हा काही यश आले नाही. नंतर कोरोना आला आणि त्यांनी त्यांचा हा निर्णय पुन्हा लांबविला. त्यानंतर पुन्हा एकदा बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच तिला गुडन्यूज मिळाली. ती म्हणते की जेव्हा आई होणार असं समजलं तेव्हा ती आणि करण दोघांनाही काहीही सुचत नव्हतं. ते अगदी जसे होते तसेच घरच्या कपड्यात घराबाहेर पडले आणि थेट बिपाशाच्या आईचे घर गाठून तिला ही आनंदाची बातमी दिली. तो क्षण, तो प्रसंग आपल्यासाठी आणि करणसाठी अतिशय भावनिक होता, असं ती आवर्जून सांगते. 

 

पुढे ती म्हणते की गरोदरपणा ते आई होणं हा असा प्रवास असतो, ज्या काळात एका स्त्रीचं शरीर संपूर्ण बदलून जातं. मला खरोखरंच अंदाज नाही की आता हळूहळू माझ्या शरीरात अजून काय- काय आणि किती बदल होणार आहेत. हो पण एक गोष्ट मात्र नक्की की या सगळ्या बदलांसाठी मी पुर्णपणे तयार असून I Am Absolutely Comfortable With Everything....  बिपाशा म्हणते ते अगदी खरंच आहे. बहुतांश स्त्रियांची या काळातली अवस्था अशीच असते. स्वत:च्या शरीरापेक्षा त्यांना मिळत असणारं मातृत्वाचं सूख हवंहवंसं वाटतं आणि तेच तर गरजेचं आहे, नाही का?  

टॅग्स : सोशल व्हायरलबिपाशा बासूकरण सिंग ग्रोव्हरप्रेग्नंसी