Lokmat Sakhi >Health >Pregnancy > 'दिसत नव्हता, तरी मलाही मानसिक आजार होताच...', समीरा रेड्डी सांगतेय तिच्या बाळंतपणानंतरच्या नैराश्याबाबत....

'दिसत नव्हता, तरी मलाही मानसिक आजार होताच...', समीरा रेड्डी सांगतेय तिच्या बाळंतपणानंतरच्या नैराश्याबाबत....

Depression after delivery: आई झाल्याचा आनंद जेवढा असतो, तेवढंच जास्त डिप्रेशन नंतरच्या काही दिवसांत येऊ लागतं... असा तुमचाही अनुभव असेल तर समीरा रेड्डीची (Sameera Reddy) ही पोस्ट वाचायलाच हवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 12:09 PM2022-05-20T12:09:59+5:302022-05-20T12:13:13+5:30

Depression after delivery: आई झाल्याचा आनंद जेवढा असतो, तेवढंच जास्त डिप्रेशन नंतरच्या काही दिवसांत येऊ लागतं... असा तुमचाही अनुभव असेल तर समीरा रेड्डीची (Sameera Reddy) ही पोस्ट वाचायलाच हवी..

Actress Sameera Reddy said she also was suffering from postpartum depression and suggest some solution for this mental illness | 'दिसत नव्हता, तरी मलाही मानसिक आजार होताच...', समीरा रेड्डी सांगतेय तिच्या बाळंतपणानंतरच्या नैराश्याबाबत....

'दिसत नव्हता, तरी मलाही मानसिक आजार होताच...', समीरा रेड्डी सांगतेय तिच्या बाळंतपणानंतरच्या नैराश्याबाबत....

Highlightsबाळंतपणानंतरचा काळ खरोखरंच अनेक जणींसाठी मोठ्या अडचणीचा ठरतो..भावनिक, मानसिक स्तरावरही अनेक जणी खूपच कमकुवत होऊन जातात.अभिनेत्री समीरा रेड्डीही याला अपवाद नाही. त्याविषयीचीच तिची एक पोस्ट

बाळंतपणानंतरचा काळ खरोखरंच अनेक जणींसाठी मोठ्या अडचणीचा ठरतो.. शरीराच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी प्रचंड बदल सुरू असतात. हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन, बाळाची काळजी आणि एक नवी जबाबदारी अंगावर आल्याचे दडपण, करिअरपासून दूर जाण्याचा धोका, बाळामुळे इतरांशी कमी झालेला संपर्क यामुळे भावनिक, मानसिक स्तरावरही अनेक जणी खूपच कमकुवत होऊन जातात. यातुनच मग एकाकीपणाची भावना निर्माण होते, नैराश्य येते.. एकट्यातच रडू येते.. (postpartum stress) हा सगळा त्रास अनेक जणींना सहन करावा लागतो. अभिनेत्री समीरा रेड्डीही याला अपवाद नाही. त्याविषयीचीच तिची एक पोस्ट (viral post of Sameera Reddy) सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.

 

वास्तववादी पोस्ट टाकणारी अभिनेत्री म्हणून सध्या समीरा रेड्डी ओळखली जाते. अभिनेत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून, स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात जे काही बदल होतात, ते स्पष्टपणे आणि अगदी खरेपणाने मांडते. म्हणूनच तर अनेकजणींना तिचे प्रॉब्लेम स्वत:चेच असावेत, इतके जवळचे वाटतात. आता सुद्धा तिने जी पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर केली आहे, ती देखील अनेक जणींनी अनुभवलेलीच आहे.. बाळंतपणानंतर मलाही नैराश्य आलं होतं. मानसिक आजार वरवर दिसत नसला, जाणवत नसला तरी तो असतोच, मलाही होता, अशी कबुलीही तिने या पोस्टद्वारे दिली आहे.

 

ती म्हणते की, तिच्यासाठी तर बाळंतपणानंतरचा काळ खूप जास्त कठीण आणि ताणतणाव असणारा होता. या पोस्टमध्ये तिने काही फोटोही शेअर केले आहेत. ती म्हणते की या फोटोतूनच माझं नैराश्य, मानसिक त्रास अगदी स्पष्टपणे दिसून येतो. मला आलेलं डिप्रेशन एवढं जास्त होतं की बाळाच्या जन्मानंतर कित्येक दिवस मला आनंद झालेलाच नव्हता.. मला एवढंच सांगायचं आहे की असा त्रास जर तुम्हालाही होत असेल तर हा त्रास सहन करणाऱ्या तुम्ही काही एकट्याच नाही. अनेक जणींना हा त्रास होतो. त्यामुळे धीर धरा. एकमेकींसोबत रहा आणि एकमेकींना हिंमत द्या. तिची ही पोस्ट वाचून या त्रासातून जाणाऱ्या अनेक जणींना आधार मिळावा, अशीच तिची अपेक्षा आहे. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी तिने काही उपायही सांगितले आहेत. 

 

बाळंतपणानंतर आलेले नैराश्य घालविण्यासाठी उपाय (remedies for postpartum stress)
- बोलत रहा, हा तुमचा त्रास तुमच्या जवळच्या व्यक्तींना सांगा
- बाळ झाल्यानंतर अवघड आहे, पण तरीही रात्रीची ८ तासांची झोप पुर्णपणे घेण्याचा प्रयत्न करा.
- स्क्रिन टाईम कमीतकमी ठेवा
- तुम्हाला नेमका कशाचा त्रास होतो आहे, त्यावर काय उपाय करता येईल, याविषयी शांतपणे विचार करा.
- अधिकाधिक पौष्टिक, सकस आहार घ्या.
- ३० मिनिटे तरी व्यायाम करा.
- काहीतरी नवं शिकण्याचा प्रयत्न करा.
- मित्रमंडळी, नातलग यांच्या संपर्कात येण्याचा, त्यांच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा.  
 

Web Title: Actress Sameera Reddy said she also was suffering from postpartum depression and suggest some solution for this mental illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.