Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात...

गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात...

Pregnant Alia Bhatt Viral Video Fans trolling her for Wearing Heels Gynecologist says : हिल्स घालणे आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे ते थांबव असा प्रेमाचा सल्लाही अनेकांनी दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2022 01:54 PM2022-08-28T13:54:14+5:302022-08-28T14:01:27+5:30

Pregnant Alia Bhatt Viral Video Fans trolling her for Wearing Heels Gynecologist says : हिल्स घालणे आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे ते थांबव असा प्रेमाचा सल्लाही अनेकांनी दिला.

Alia Bhatt gets trolled for wearing high heels during pregnancy; Whether it's right or wrong in pregnancy, experts say... | गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात...

गरोदरपणात हाय हिल्स घातल्याने आलिया भट झाली ट्रोल; गरोदरपणात ते योग्य की अयोग्य, तज्ज्ञ सांगतात...

Highlightsयोग्य मापाच्या सपाट आपल्याला कम्फर्टेबल असतील अशा चपला, सँडल प्रेग्नन्सीमध्ये वापराव्यात. एरवीही हिल्स घालून चालणं ही मणक्यावर ताण आणणारी गोष्ट असते. पण प्रेग्नन्सीमध्ये तर जास्तच ताण येऊ शकतो.

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्याकडे गुडन्यूज असल्याचे जगजाहीर झाल्यानंतर आपण सगळेच या दोघांसाठी खूश आहोत. बेबी बंपमध्येही आलिया स्वत:ला छान कॅरी करत असल्याने तिचे कौतुक होत आहे. गरोदरपणातही आलियाचा फॅशन सेन्स अतिशय छान असल्याने ती या सगळ्या कपड्यांमध्ये खूप छान दिसत आहे. सध्या आलिया तिच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ती आणि रणबीर नुकतेच स्पॉट झाले. या चित्रपटात आलिया इशाचे पात्र साकारत असून रणबीर शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे (Pregnant Alia Bhatt Viral Video Fans trolling her for Wearing Heels Gynecologist says). 

चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी आलियाने एक छानसा पिंक रंगाचा टॉप ट्रान्सपरंट टॉप आणि लूज फिटींगची पँट घातली आहे. त्यावर तिने काळे जॅकेट घातले असून मोकळ्या केसांमध्ये आलिया खूप सुंदर दिसत आहे. आलियाच्या चेहऱ्यावर आलेला प्रेग्नन्सी ग्लो तिचे सौंदर्य आणखी खुलवत आहे. सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाचे फोटो आणि व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले. यामध्ये आलियाच्या बेबी बंप आणि फॅशनबरोबरच तिच्या हिल्स चपलांचीही बरीच चर्चा झाली. प्रेग्नंट असताना तिने हिल्स घातले असल्याने चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. अनेकांनी तिला अशाप्रकारे हिल्स घालणे आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे ते थांबव असा प्रेमाचा सल्लाही दिला. ‘लोकमत सखी डॉट कॉम’ने याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन यांना विचारले असता त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये हिल्स घालावेत की नाही, त्यामागची कारणे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती दिली. डॉ. पटवर्धन म्हणाल्या..


१. गरोदरपणात गर्भाशयाचा आकार मोठा होतो, साधारणपणे चौथ्या महिन्यापासून बाळाचं वजव वाढत जातं, पुढ बाळाच्या वजनाबरोबरच गर्भाशयातलं पाणी, इतर गोष्टी असं सगळं मिळून वजन साधारणपणे १० ते १२ किलो वाढतं. या सगळ्या वजनाचा आपल्या पायांवर आणि मणक्यावर ताण येतो.

२. पाय दुखणे, सुजणे, पायात क्रॅम्प येणे यांसारख्या तक्रारी सुरू होतात. तसंच गरोदरपणात निर्माण होणाऱ्या हार्मोन्समुळे लिगामेंटसवरही ताण येतो. तसंच पोटाचा भाग वाढल्यामुळे पाठीच्या मणक्यावर हा ताण पडतो.

३. या सगळ्या गोष्टींमुळे गरोदर महिलेच्या शरीराची ठेवण काहीशी बदलते. अशात शरीराचे वजन पायावर पेलण्यासाठी हिल्सचा वापर अतिशय घातक असतो. कारण हिल्ससाठी आपल्याला शरीराचे बॅलन्सिंग करावे लागते. त्यामुळे मणक्यावर ताण येऊन कंबरदुखी उद्भवू शकते. एरवीही हिल्स घालून चालणं ही मणक्यावर ताण आणणारी गोष्ट असते. पण प्रेग्नन्सीमध्ये तर जास्तच ताण येऊ शकतो.

४. हिल्स घातल्याने टाचा आणि पोटरी यांमध्ये जो अँगल तयार होतो त्यामुळे नसांवरही ताण येऊन रक्तप्रवाह सुरळीत होण्यात अडथळा येतो. पायाकडचे रक्त हृदयापर्यंत पोहोचवण्यामध्ये गर्भधारणेमुळे आधीच थोडा अडथळा आलेला असतो, त्यात हिल्समुळे आणखी अडथळा निर्माण होतो. 

५. हिल्समुळे गरोदरपणात पायाला सूज येणे, व्हेरीकोज व्हेन्स यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे योग्य मापाच्या सपाट आपल्याला कम्फर्टेबल असतील अशा चपला, सँडल प्रेग्नन्सीमध्ये वापराव्यात. 

Web Title: Alia Bhatt gets trolled for wearing high heels during pregnancy; Whether it's right or wrong in pregnancy, experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.