Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

Alia Bhatt says she didn’t lose pregnancy weight ‘unnaturally’: ‘My mother-in-law made me gond ka ladoo that I ate for 6 weeks’ : बाळंतपणानंतर लगेच शेप मध्ये येण्याचा अट्टहास का ? आलियाने केला सगळ्या नवमातांसाठी प्रश्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 05:39 PM2023-05-03T17:39:19+5:302023-05-03T17:56:28+5:30

Alia Bhatt says she didn’t lose pregnancy weight ‘unnaturally’: ‘My mother-in-law made me gond ka ladoo that I ate for 6 weeks’ : बाळंतपणानंतर लगेच शेप मध्ये येण्याचा अट्टहास का ? आलियाने केला सगळ्या नवमातांसाठी प्रश्न...

Alia Bhatt's Postpartum Weight Loss Journey And Message To New Moms | बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

"प्रेगनन्सी नंतर तू किती जाड झाली आहेस"? "स्वतःच्या वजनाकडे जरा लक्ष दे.." ,"कशी दिसते आहेस तू" असे अनेक टोमणे नुकत्याच आई झालेल्या स्त्रीला ऐकावे लागतात. प्रेगनन्सी हा बाईचा दुसरा जन्म असतो, असे मानले जाते ते काय उगाच नाही. कारण खरंच प्रेगनन्सी नंतर एका स्त्रीच आयुष्य संपूर्ण बदलून जात.  तिच्या शरीरात होणाऱ्या अनेक बदलांपासून ते तिच्या खांद्यावर वाढलेल्या जबाबदारी पर्यंत सगळेच तिच्यासाठी नवीन असते. प्रेग्नंन्सी नंतर वाढलेल शरीर यासारख्या मोठ्या बदलाला तिला एकटीलाच सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ती स्त्री खंबीरपणे या सगळ्या गोष्टींचा सामना करुन स्वतःला पूर्ववत करु पहाण्यासाठी लाखो प्रयत्न करते. प्रेगनन्सी नंतर शरीराची झालेली झीज भरुन काढण्यासाठी आहार चांगला घ्यावा लागतो. पण प्रश्न एवढाच असतो की ते सारं खाऊनही आपलं वजन वाढू नये, फिगर खराब होवू नये, ऑफिस जॉइन केल्यावर कुणी आपल्याला जाड झालीस म्हणू नये याचं तिला सतत टेंशन असत. इंस्टाग्रामवर कुणी म्हंटलं की आता दिसतेस तू एका पोराची आई तर त्यात आपलं वय वाढलं, आपण तरुण दिसत नाही हे का डोक्यात यावं? मुळात बाळांतपणानंतर सहा-आठ महिने, काहींना वर्ष दोन वर्षेही वजनवाढीचा त्रास होवूच शकतो. त्यामुळे घाबरुन जायची गरज नसते.

बाळंतपणानंतर लगेच वजन घटवून अतीश्रम करण्याची घाई आरोग्याला बरी नाही हे पण अनेकजणी विसरुन जातात. त्याला कारण आपल्यापर्यंत माध्यमातून किंवा सोशल मीडियातून येतं... अमूक अभिनेत्रीने बाळांतपणानंतर चार महिन्यात इतकं वजन कमी केलं, तमूक तर दहाव्याच दिवशी कामावर रुजू झाली. आणि मग अनेकींना वाटतं की आपण डिलिव्हरीनंतर लठ्ठ झालो, शेप बिघडला तर? खरंतर ऐश्वर्या रायसारखी विश्वसुंदरीपण डिलिव्हरीनंतर काही काळ जाड झाली तर लोकांनी तिला ट्रोल केलं. पण तिने आपलं वजन लपवलं नाही. अगदी अलीकडे करीना कपूरनेही पोट सुटलेलं दिसलं तर दिसलं म्हणत आपलं जगणं बदललं नाही(Alia Bhatt's Postpartum Weight Loss Journey And Message To New Moms).

नुकतीच आई झालेल्या आलियाचा सल्ला ऐका...  

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आलियाने गरोदरपणानंतर फार कमी वेळात तिचे वजन घटवले आहे. त्यामुळे तिच्या डाएट प्लॅनची सतत चर्चा पाहायला मिळते. नुकतंच आलियाने राहाच्या जन्मानंतर वजन कसे कमी केले, याबद्दल खुलासा केला आहे. 

एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

“मी जेव्हा राहाला जन्म दिला तेव्हा मी माझ्या शरीराबद्दल फारसे कठोर निर्णय घेत नव्हते. माझ्याकडे पाहून प्रत्येकाला वाटते की मी माझे वजन नैसर्गिकरित्या कमी केलेले नाही. पण राहाच्या जन्मानंतर मी स्वत:वर कोणतीही बंधन घातली नाही. त्यावेळी मला डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, तू १२ आठवड्यानंतर वर्कआऊट करु शकते. त्या वर्कआऊटमध्ये तू खूप मेहनत कर आणि मी तसेच केले”, असे आलिया म्हणाली.

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

“माझे वजन अजूनही पूर्ववत झालेले नाही. पण मी माझे वजन नैसर्गिकरित्याच कमी केले आहे. मी १५ मिनिटे चालणे, दीर्घ श्वास घेणे आणि व्यायाम करणे असे सर्व सुरुवातीच्या दिवसात केले. या काळात माझ्या सासूने माझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवले होते. हे लाडू मी सहा आठवडे खाल्ले. त्यामुळे लोकांनी हे समजून घेणं गरजेचे आहे की, गरोदरपणात किंवा बाळाच्या जन्मानंतर वजन वाढणं हे जास्त खाल्ल्यामुळे होत नाही”, असा सल्लाही आलियाने दिला. "राहाच्या जन्मानंतर मी माझ्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकलेला नाही". 

आलिया नवं मातांना सल्ला देते की, स्वतःवर अवास्तव अपेक्षा लादणे टाळावे. हा बदल नैसर्गिक आहे आणि वजन कमी करण्यासाठी घाई करू नका. खरं तर, हळूहळू आणि स्थिरपणे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी निरोगी सवयींचा समावेश करा. 

अत्यंत बोल्ड मॅटर्निटी फोटो शूट करणाऱ्या १० बॉलिवूड अभिनेत्री, गरोदरपण त्यांनी अभिमानानं मिरवलं...

मग बाळंतपणानंतर लगेच शेप मध्ये येण्याचा आपला तरी अट्टहास का ? 

मुळात शास्त्रीय माहिती न घेता आपल्या शरीरावर केलेल्या प्रयोगाचा आपल्या बाळावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरावर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा. मूल अंगावर पीत असताना किमान सहा महिने तरी आपल्या आणि बाळाच्याही पोषणाचा विचार करायला हवा. बाळांतपणानं झालेली शरीराची झीजही भरुन यायला हवी.  वजन वाढेल या भितीनं अनेकजणी पौष्टिक अन्न खात नाहीत. वजन वाढेल या भीतीने आपल्या व बाळाच्या अशा दोघांच्याही आरोग्याची हेळसांड करुन घेण्यात काय शहाणपण आहे. आपला आहार सांभाळून, वजन आणि पोषण दोन्ही उत्तमरित्या बॅलेन्स करता येईल.

Web Title: Alia Bhatt's Postpartum Weight Loss Journey And Message To New Moms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.