Join us   

बाळंतपणापुर्वी अनुष्का शर्माने घेतला होता खास डाएट प्लॅन! काय होतं त्या प्लॅनमध्ये- का होता गरजेचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 6:16 PM

Anushka Sharma's Prenatal Nutrition Diet Plan: बाळंतपणापुर्वी हल्ली अनेक जणी आहारतज्ज्ञांकडून डाएट प्लॅन तयार करून घेत असतात. का असते त्याची नेमकी गरज?

ठळक मुद्दे गरोदर महिलेची तब्येत, वजन, इतर आजार, ॲलर्जी, कामाचे स्वरुप, बाळाची स्थिती, आईचे वय अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन डाएट प्लॅन करावा लागतो.

स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे एक डाएट कॉन्शस जोडपं. तसं तर खेळाडू म्हणून आणि अभिनेत्री म्हणून दोघांनाही त्यांच्या आहाराबाबत जागरुक असणं गरजेचंच आहे. पण तरीही दोघंही वेगन डाएट घेतात. शिवाय दोघांचंही रात्रीचं जेवण संध्याकाळी ६ वाजेपर्यंत होऊन जातं. ते शक्यतो बाहेरचं खाणं टाळतात... या सगळ्या गोष्टींमुळे ते डाएटच्या बाबतीत इतरांपेक्षा खूप वेगळे ठरतात. त्यांच्या डाएट एक्सपर्टने म्हणजेच रॅन फर्नांडो यांनी एका यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नुकतीच अनुष्का शर्माच्या गरोदरपणातील डाएट प्लॅनविषयीची माहिती शेअर केली. (Anushka Sharma's Prenatal Nutrition Diet Plan)

 

यामध्ये रॅन असं सांगतात की अनुष्का जेव्हा तिची मोठी मुलगी वामिका हिच्यावेळी गरोदर होती, तेव्हा तो कोरोनाचा काळ होता. तेव्हा जवळपास सगळेच आयसोलेशनमध्येे राहात हाेते.

दसरा स्पेशल : ट्रॅडिशनलही नको आणि एकदम मॉडर्नही नको! ५ टिप्स- दसऱ्याला ‘असा’ करा लूक

तेव्हा विराटने रॅन यांच्याशी संपर्क साधून त्यांना अनुष्काच्या गरोदरपणाविषयी माहिती दिली आणि त्यांच्याकडून खास डाएट प्लॅन तयार करून घेतला. रॅन सांगतात की गरोदरपणाच्या काळात एकच एक प्लॅन आपण ठरवून देऊ शकत नाही. आईची गरज, बाळाची वाढ यानुसार प्रत्येक तीन महिन्यांनी तो प्लॅन बदलत जातो. त्यानुसार त्यांनी अनुष्कासाठी प्लॅन तयार केले हाेते.

 

गरोदरपणात डाएट प्लॅन कसा असावा?

गरोदर महिलेची तब्येत, वजन, इतर आजार, ॲलर्जी, कामाचे स्वरुप, बाळाची स्थिती, आईचे वय अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन डाएट प्लॅन करावा लागतो. तो कसा असावा याविषयी आहारतज्ज्ञ कनिका मल्होत्रा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली माहिती..

सणासुदीला घरासमोर पायऱ्यांवर कशी रांगोळी काढावी सुचेना? पाहा घराची शोभा वाढविणाऱ्या सुंदर- सोप्या डिझाईन्स

१. पहिल्या ३ महिन्यात उलट्या, मळमळ असा त्रास होत असतो. त्यामुळे मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. या काळात फॉलिक ॲसिड खूप गरजेचं असल्याने ते देणारे पदार्थ जास्त घ्यावे.

२. ४ ते ६ महिने या काळात कॅलरी, प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन डी हे घटक देणारे पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावे. 

३. त्यानंतर ७ ते ९ महिने या काळात अनेकींना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. त्यामुळे फायबरयुक्त पदार्थ जास्त खावे. तसेच ओमेगा ३ फॅटी ॲसिड, कॅल्शियम देणारे दुग्धजन्य पदार्थ आहारात जास्त असावे.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसीअनुष्का शर्माविराट कोहली