Lokmat Sakhi >Health >Pregnancy > कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी?

कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी?

कोरोनाचा धोका गरोदर महिलांना जास्त असल्याचा अजून तरी कुठलाही डाटा उपलब्ध नाही, मात्र काळजी घ्यायलाच हवी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 01:59 PM2022-05-21T13:59:48+5:302022-05-21T14:02:13+5:30

कोरोनाचा धोका गरोदर महिलांना जास्त असल्याचा अजून तरी कुठलाही डाटा उपलब्ध नाही, मात्र काळजी घ्यायलाच हवी..

Are pregnant women more susceptible to COVID 19 infection? Precautions and travel guide- corona time - Narikaa | कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी?

कोरोनाची साथ आवाक्यात असली तरी अजूनही गरोदरपणात प्रवास करताना महिलांनी काय काळजी घ्यावी?

Highlightsगरोदर महिलांना जास्त धोका आहे का या संबंधीचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

कोरोनाची साथ आता कमी झालेली असली तरी गरोदरपणात अन्य सर्व प्रकारच्या इन्फेक्शनपासून स्वत:ला सुरक्षित ठेवताना कोरोना इन्फेक्शनचा धोकाही टाळायलाच हवा. साथ नसली तरीही. मुळात वैद्यकीयदृष्ट्या कोव्हीड-१९ हा श्वसनसंस्थेचा संसर्ग आहे. कोरोना व्हायरसमुळे श्वसनमार्गाच्या वरच्या आणि खालच्या भागाचा जीवघेणा नसलेला न्यूमोनिया होऊ शकतो आणि श्वसनमार्गाचा तीव्र संसर्ग होऊ शकतो जो जीवघेणा ठरू शकतो. या व्हायरसमुळे सर्व वयोगटातील लोक संक्रमित होऊ शकतात. मात्र गरोदर स्त्रियांना एकूणच श्वसनमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताही जास्त असते. मात्र इतर सुदृढ व्यक्तींपेक्षा गरोदर महिलांना कोव्हीड होण्याची जास्त शक्यता आहे असं दाखवणारा कुठलाही पुरावा नाही.

कोरोना व्हायरसमुळे गरोदरपणावर काय परिणाम होतो?

या व्हायरसच्या बदलत्या रुपामुळे त्याचा गर्भावर काय परिणाम होऊ शकतो ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही. व्हायरसचं थेट संक्रमण आढळून आलेलं नसलं तरी कोव्हीड-१९मुळे कमी दिवसाची बाळं जन्माला येण्याचं प्रमाण वाढलं आहे. गरोदर महिलांना बहुतेक वेळा सध्या फ्लू सारखी लक्षणं जाणवतील. जर का लक्षणं तीव्र झाली तर त्याचा अर्थ श्वसनमार्गाचा संसर्ग असा असू शकतो. 

संसर्ग होऊ नये यासाठी गरोदर महिलांनी काय करावं?

गरोदर महिलांनाकोरोना होण्याची जास्त शक्यता आहे का हे माहिती नसेल तरीही त्यांनी शारीरिक अंतर पाळणं महत्वाचं आहे. गरोदरपणाच्या काळात रोगप्रतिकारशक्ती काहीशी क्षीण झालेली असते. त्यामुळे शरीराची विषाणूंना प्रतिकार करण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे गरोदर महिलांनी या काळात अधिक सावध असणं योग्य आहे.
मात्र गरोदर महिलांनी त्याचा जास्त ताण घेण्याची आवश्यकता नाही. तुमचे छंद जोपासा आणि मन तणावमुक्त राहील याची काळजी घ्या. प्रवास करतांना गरोदर महिलांनी घ्यायची काळजी

गरोदर महिलांनी विमानप्रवास करण्यावर कुठलेही निर्बंध नसले तरीही त्यांनी शक्यतो ते टाळलं पाहिजे. प्रवासात पूर्ण वेळ मास्क वापरणं आणि हातांची स्वच्छता राखणं आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींशी हात मिळवणं, कुठल्याही पृष्ठभागाला हात लावणं आणि त्यानंतर चेहेऱ्याला हात लावणं टाळलं पाहिजे. त्याहीपेक्षा चांगलं म्हणजे मास्क आणि फेस शील्डबरोबर डिस्पोझेबल ग्लोव्ह्जही वापरले पाहिजेत.
मधुमेह, श्वसनाचे विकार आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांप्रमाणे गरोदर महिलांना कोरोनापासून फार वाढीव धोका असल्याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही.  त्याबाबत अजूनही नवीन शोध लागत आहेत. गरोदर महिलांना जास्त धोका आहे का या संबंधीचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मात्र काळजी घेणं हे केव्हाही अधिक चांगलं असतं. शारीरिक अंतर, मास्क आणि हात व चेहेऱ्याची स्वच्छता यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येऊ येऊ शकतो.


तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार : डॉ. मल्होत्रा बोरा (M.D, FICMCH, FMAS)

Web Title: Are pregnant women more susceptible to COVID 19 infection? Precautions and travel guide- corona time - Narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.