बाळ जन्माला येण्यापासून ते जन्माला घालेपर्यंतचा काळ आईसाठी अधिक महत्त्वाचा असतो. यात होणारा त्रास-दु:ख, आनंद हे मात्र वेगळचं. (c section delivery recovery food) या काळात महिलांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पोटात वाढणाऱ्या बाळाची पुरेशी वाढ होण्यासाठी आपल्याला अनेक सकस आहारा खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, अनेकदा काही काँम्प्लिकेशनमुळे बाळ जन्माला घालताना सी सेक्शन केलं जातं. बाळ जन्माला आल्यानंतर आईचा पुन्हादा जन्म होतो असं म्हटलं जातं. (avoid this 5 food after c section delivery)
सिझेरिअन झाल्यानंतर महिलांना बाळासह आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. या काळामध्ये योग्य काळजी घेतली नाही तर आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.(Foods to avoid after giving birth) सिझेरिअन प्रसूतीनंतर त्यातून महिलांना बरे होण्यास अधिक वेळ लागतो. या काळात डॉक्टर महिलांना विश्रांती घेण्याचा, अधिक जड वस्तू न उचलण्याचा आणि आहाराची काळजी घेण्याचा सल्ला देतात. पूर्णपणे काळजी घेऊन देखील अनेकदा आपल्याला त्रास होतो. अशावेळी आहाराची योग्य तपासणी करावी. डॉक्टारांशी नियमितपणे चेकअप किंवा संवाद साधावा. आहार कसा असायला हवा हे विचारावं. सिझेरिअन झालं असेल तर हे ४ पदार्थ खाऊ नका.
1. मसालेदार पदार्थ
2. तळलेले पदार्थ
3. बॉइल केलेले पदार्थ
4. कोल्ड्रिंक्स पिऊ नका
आजकाल अनेक महिलांना थंड पेय पिण्याची सवय आहे. परंतु यामध्ये कार्बोनेटेड पेये योग्य नाही. यामध्ये अतिरिक्त साखर असते. जी रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते. सिझेरियन प्रसूतीनंतर कार्बोनेटेड पेये प्यायल्याने रक्तप्रवाहावर परिणाम होतो. ज्यामुळे ऊती दुरुस्ती होण्यासाठी अधिक वेळ लागतो.