कॉमेडी क्वीन म्हणून ओळख असणारी भारती सिंह (Bharti singh) सध्या प्रेग्नंट आहे. नुकतीच प्रेग्नन्सी जाहीर करणाऱ्या भारती सिंगने हुनरबाज या टॅलेंट शोचे शूटिंग सुरू केले आहे. विशेष म्हणजे, या प्रोजेक्टसह तीनं भारतातील पहिली 'प्रेग्नंट अँकर' असल्याचा दावा केला आहे. (Bharti singh calls herself indias first pregnant anchor) चॅनेलने शेअर केलेल्या अलीकडील व्हिडिओमध्ये, भारतीने आपल्या प्रेग्नंसीबद्दल सांगून गर्भधारणेदरम्यान पहिल्यांदा शूटिंग करण्याबद्दल तिच्या भावना देखील व्यक्त केल्या.
तिचे कुटुंब, विशेषत: तिच्या आईला अशा अवस्थेत भारती कसं काम करेल. याची फार काळजी वाटत होती. हुनरबाजच्या शूटच्या पहिल्या दिवशी, भारतीने शेअर केले की शोव्हच्या शूटिंगसाठी तिला शुभेच्छांऐवजी सुचना मिळाल्या. गरोदरपणात शोव्ह होस्ट करताना भारती म्हणाली की, "मला महिलांबद्दलची प्रत्येकाची विचारसरणी बदलायची आहे. मी तुमची आणि भारतातील सर्व मातांची विचारसरणी बदलेन. मी भारताची पहिली गर्भवती अँकर होईल.!"
याच व्हिडीओमध्ये भारतीचा पती हर्ष लिंबाचिया याने शूटिंगच्या आधी भारतीची वाटणारी काळजी व्यक्त केलीये. दुसरीकडे, सर्व काही ठीकच होईल, असा विश्वासही त्याला आहे. बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भारतीने तिच्या गरोदरपणाच्या नवव्या महिन्यापर्यंत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
ती म्हणाली, "आम्ही गरोदरपणातही काम करत आहोत याचा मला आनंद आहे. मला माझ्या गरोदरपणाच्या नवव्या महिन्यापर्यंत काम करायचे आहे. आमच्या बाळालाही आमची मेहनत जाणवेल आणि मला आशा आहे आमचं मूल मोठं होऊन आमच्यासारखंच कष्टकरी बनेल."