शिल्पा शेट्टी म्हणजे बाॅलीवूडची फिटनेस क्वीन. आयुष्यात कितीही काहीही झालं तरी तिने व्यायाम करणं काही सोडलं नाही. उलट मध्यंतरी जेव्हा तिचा नवरा राज कुंद्रा याच्याविषयी घडलेल्या काही घटनांमुळे शिल्पा व्यथित झाली होती, तेव्हाही या निगेटीव्हीटीतून बाहेर यायला योगा आपल्या उपयोगी येत आहे, असं ती म्हणाली होती. अशा जबरदस्त फिट असणाऱ्या अभिनेत्रीला एखादा आजार आहे, असं आपल्याला कुणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही. असंच काहीसं शिल्पाचंही तेव्हा झालं होतं. आपल्याला antiphospholipid syndrome नावाचा आजार आहे आणि त्यामुळे मी आई होऊ शकत नाहीये, हे जेव्हा मला समजलं तेव्हा तो माझ्यासाठी खूप मोठा शारिरीक आणि मानसिक धक्का होता, असं शिल्पाने सांगितलं. याविषयीचाच तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. (Viral Video Of Shilpa Shetty About Her Miscarriage)
एका रिॲलिटी शोदरम्यान शिल्पाने तिच्या या आजाराविषयी माहिती दिली होती. ती म्हणते की आम्ही जेव्हा बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मला सर्व काही सोपं वाटलं. पण नंतर असं लक्षात आलं की मी प्रेग्नंट होत नाहीये.
अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखाल? लक्षात ठेवा ६ टिप्स, नाहीतर होईल फसवणूक आणि मनस्ताप
काही दिवसांनी मी प्रेग्नंट झाले पण माझं मिसकॅरेज झालं. त्यानंतर काही तपासण्या केल्या असता मला ॲण्टीफॉस्फोलिपिड सिंड्रोम असल्याचं डॉक्टरांना समजलं. त्यानंतर जेव्हा मी प्रेग्नंट राहिले, तेव्हा मला खूप जास्त काळजी घ्यावी लागली. गरोदरपणात मी एवढे जास्त इंजेक्शन घेतले की त्यामुळे माझ्या हातांना, मांड्यांना अक्षरश: जखमा होऊन त्याचे काळे डाग पडले होते. त्यानंतर सी- सेक्शन डिलिव्हरी होऊन शिल्पाचा मोठा मुलगा वियान याचा जन्म झाला. त्यानंतर दुसऱ्या अपल्यासाठी मात्र शिल्पाने सरोगसीचा पर्याय निवडला होता.
ॲण्टीफॉस्फोलिपिड सिंड्रोम नेमका काय असतो?
हा आजार असणाऱ्या व्यक्तींचे रक्त इतरांपेक्षा अधिक घट्ट असल्याने त्यात गुठळ्या होतात आणि रक्तवाहिन्यांच्या कामात अडथळा निर्माण होतो.
जेव्हा शरीरातली इम्युनिटी सिस्टिम खूप जास्त ॲण्टीबॉडिज निर्माण करू लागते, तेव्हा रक्तामध्ये गुठळ्या तयार होतात. त्यालाच ॲण्टीफॉस्फोलिपिड सिंड्रोम असं म्हणतात. हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक दिसून येतो. स्त्रियांमध्ये या आजारात गर्भाशयाशी जोडलेल्या गेलेल्या काही रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असतात. त्यामुळे गर्भाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे गर्भाची नीट वाढ होत नाही.