Join us

Cesarean delivery : शिल्पा शेट्टी ते लारा दत्ता, सीझर करावं लागलं पण त्यांचा फिटनेस कायम! काय त्याचं सिक्रेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:41 IST

Cesarean delivery : वियानच्या आधी शिल्पा गर्भपाताच्या वेदनेतून गेली होती आणि त्यानंतर वियानचा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला.

ठळक मुद्दे अनेक अभिनेत्री जेव्हा आई बनल्या तेव्हा त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी नाही तर सिजेरियनच्या प्रक्रियेतून जावे लागले. कोणत्याही प्रकारे मनात चिंता ठेवता त्यांनी आपल्या मातृत्वाचा आनंद घेतला. खरं तर, कोणतीही महिला मग ती सेलिब्रिटी असो, तिला नेहमी नॉर्मल डिलीव्हरी व्हावी अशी इच्छा असते.

बॉलिवूड अभिनेत्रींसाठी  परफेक्ट फिगर इतर कशाहीपेक्षा महत्वाची असते. शरीरावर कोणत्याही प्रकारचे स्कार्स, खुणा असणं त्यांच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. याच कारणामुळे बॉलिवुड सेलेब्स आपल्या कमाईचा सर्वाधिक भाग स्वतःला मेटेंन ठेवण्यासाठी खर्च करतात.  त्वचेवरील डाग काढून टाकण्याासाठी अनेक सेलिब्रिटी कॉस्मेटिक सर्जरीजचाही आधार घेतात. अनेक अभिनेत्री जेव्हा आई बनल्या तेव्हा त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी नाही तर सिजेरियनच्या प्रक्रियेतून जावे लागले. कोणत्याही प्रकारे मनात चिंता ठेवता त्यांनी आपल्या मातृत्वाचा आनंद घेतला. 

खरं तर, कोणतीही महिला मग ती सेलिब्रिटी असो, तिला नेहमी नॉर्मल डिलीव्हरी व्हावी अशी इच्छा असते. म्हणूनच, जेव्हा जेव्हा एखादी स्त्री गर्भवती असते, तेव्हा ती स्वतःची अधिक काळजी घेण्यास सुरुवात करते, जेणेकरून तिला प्रसूतीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये. बॉलिवूड अभिनेत्री या बाबतीत अनेक पावले पुढे आहेत. खाण्यापिण्यापासून, फिटनेसपर्यंत सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. या लेखात आम्ही अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत ज्या सी सेक्शन प्रक्रियेद्वारे आई बनल्या आणि त्यांनी  आपल्या मातृत्वाचा पुरेपूर आनंद घेतला. 

शिल्पा शेट्टी कुन्द्रा

या यादीतील पहिले नाव शिल्पा शेट्टी कुंद्राचे आहे. 21 मे 2012 रोजी शिल्पानं वियान म्हणजेच आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. वियानच्या आधी शिल्पा गर्भपाताच्या वेदनेतून गेली होती आणि त्यानंतर वियानचा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला. मात्र, वियानच्या जन्मानंतर लवकरच शिल्पाने स्वतःला पुन्हा सांभाळले. ती नेहमीच तिच्या फिगरबाबत खूप जागरूक राहिली आहे आणि तिच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाही.

लारा दत्ता

माजी मिस युनिव्हर्स लारा दत्तानेही 2012 मध्ये मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये सी-सेक्शनद्वारे एका बाळाला जन्म दिला. खरं पाहता तिची मुलगी सायराच्या जन्माच्यावेळी पोटात स्थिती अशी झाली होती की सामान्य प्रसूती शक्य नव्हती आणि म्हणूनच तिने सिझेरियनचा मार्ग निवडला. लारा तिच्या मुलीच्या जन्मानंतर अगदी कमी वेळात परफेक्ट फिगरमध्ये आली. डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यासाठी तिने प्रामुख्याने योगाचा अवलंब केला.

करिना कपूर

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर  दोन मुलांची आई आहे. करीनाच्या दोन्ही प्रेग्नंसीची चर्चा सर्वत्र होती. तिने २१ फेब्रुवारीला त्यांचा दुसरा मुलगा जहांगीरला जन्म दिला. यापूर्वी तिने 20 डिसेंबर 2016 रोजी तैमूरला जन्म दिला. खरं तर, संपूर्ण गर्भधारणेदरम्यान करीनाने स्वतःचा आहार, व्यायाम याबाबत संपूर्ण काळजी घेतली. परंतु त्यांच्या दोन्ही मुलांची प्रसूती सी-सेक्शनद्वारे झाली.

काजोल

काजोल २००१ मध्ये पहिल्यांदा गर्भवती होती, पण दुर्दैवाने तिचा गर्भपात झाला. यानंतर, वर्ष २००३ मध्ये, अजय आणि काजोलच्या घरात पाळणा हलला आणि त्यांची मुलगी न्यासा देवगणचा जन्म झाला. १३ सप्टेंबर २०१० रोजी न्यासाच्या जन्मानंतर जवळपास सात वर्षांनी, काजोलने तिच्या दुसऱ्या मुलाला, युग देवगणला जन्म दिला. युगचा जन्म सी-सेक्शनद्वारे झाला.

अमृता राव

अमृता राव १५ मे  २०१६ रोजी आरजे अनमोलसोबत विवाह बंधनात अडकली. लग्नाच्या सुमारे चार वर्षानंतर अमृताने २०२० मध्ये एका मुलाला जन्म दिला. ज्याला त्याने वीर नाव दिले. अमृता रावची डिलिव्हरी सी-सेक्शनद्वारे झाली. अमृताने स्वतः एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. इतकेच नाही तर अमृता आपल्या मुलाच्या जन्मानंतर बेबी ब्लूजबद्दलही बोलली होती. 

टॅग्स : बॉलिवूडप्रेग्नंसीगर्भवती महिलाकरिना कपूरशिल्पा शेट्टीलारा दत्ताकाजोल