Join us   

प्रेग्नंसी टाळण्याच्या गोळ्या घेतल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो का? संशोधन सांगते की..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 12:48 PM

Contraceptive pills can cause breast cancer or not : डॉक्टर कंबाइन्स पिल्स घेणं टाळण्याचा सल्ला देतात. खासकरून अशा लोकांना ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल.

नको असलेली प्रेग्नंसी टाळण्यासाठी महिला  इमजेंसी गोळ्या, मॉर्निग आफ्टर पिल, कॉन्ट्रासेप्टीव्ह पिल्स जास्तीत जास्त घेतात. ज्यावेळी फिजिकल रिलेशन ठेवताना  कंडोम्सचा वापर केला जात नाही  अशावेळी महिला या गोळ्यांचा वापर करतात. जास्तीत जास्त महिलांना याची कल्पना नसते की या गोळ्या खाल्ल्यानं हार्मोनल संतुलन बिघडू शकतं तर ब्रेस्ट कॅन्सरचा  धोका ही उद्भवू शकतो. (Contraceptive pills can cause breast cancer shocking revelation in study)

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संधोधक सांगतात...

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त पिल्स  घेतल्यानंच नाही तर प्रेग्नंसी रोखण्याचे इतर उपाय जसं की IUD मुळेही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका २३ ते ३० टक्क्यांनी वाढतो हा अभ्यास पीएफओएस मेडिसन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हार्मोनल कॉन्टासेप्टीव्ह आणि ब्रेस्ट कॅन्सरमधिल संबंध प्रस्थापित करणारा हा पहिलाच अभ्यास आहे. अभ्यासानुसार कॉन्ट्रासेप्टीव्ह पिल्स घेणं सोडल्यानं आजारांचा धोका वाढू शकतो. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी हे सांगितलं की २० किंवा यापेक्षा कमी वयाोगटातील लोकांच्या तुनलेत मोठ्या वयाच्या महिलांना या आजाराचा धोका जास्त असतो. 

तरूण मुलींमध्ये धोका कमी

तज्ज्ञांनी सांगितलं की  सर्व प्रकारच्या ओनली कॉन्ट्रासेप्टिव्सना कंबाईन्ड ओरल कॉन्ट्रासेप्टीव्हप्रमाणेच ब्रेस्ट कॅन्सरशी जोडलं जातं. (Contraceptive side effects) कमी वयाच्या महिलांमध्ये याचा धोका कमी असतो. वृद्धांमध्ये याचा धोका जास्त असतो. एक एकत्रित गर्भनिरोधक गोळी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनचा वापर करते. जेणेकरून अंडाशयातून प्रत्येक महिन्याला अंडी बाहेर पडू नयेत. हे गर्भधारणा रोखण्यासाठी 99.7 टक्के प्रभावी आहे.

या पिल्सचे दुष्परिणाम

प्रोजेस्टीन ओन्ली पिल्समध्ये फक्त १ हार्मोन असतो. जो सर्वाईकल म्यूकसला घट्ट बनवतो आणि स्पर्म्सना गर्भात प्रवेश करण्यापासून रोखतो. २ गोळ्याचे दुष्परिणामही होतात जसं की कामेच्छा कमी होणं, मूडमध्ये बदल, सॉफ्ट ब्रेस्ट, आजार पडल्यासारखं वाटणं, वजन  कमी होणं. डॉक्टर कंबाइन्स पिल्स घेणं टाळण्याचा सल्ला देतात. खासकरून अशा लोकांना ज्यांना ब्रेस्ट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असेल.

टॅग्स : प्रेग्नंसीमहिलाहेल्थ टिप्सआरोग्य