Lokmat Sakhi >Health >Pregnancy > कॉपर टी बसवायची भीती वाटते? डॉक्टर सांगतात, कॉपर टी बसवा- गैरसमज विसरा कारण..

कॉपर टी बसवायची भीती वाटते? डॉक्टर सांगतात, कॉपर टी बसवा- गैरसमज विसरा कारण..

स्त्रियांच्या मनात कॉपर टी बद्दलचे अनेक गैरसमज आहेत. विनाकारण त्याबाबतची भीती आहे. त्याबाबत डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी दिलेली ही खास माहिती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2024 04:44 PM2024-04-18T16:44:08+5:302024-04-18T17:04:34+5:30

स्त्रियांच्या मनात कॉपर टी बद्दलचे अनेक गैरसमज आहेत. विनाकारण त्याबाबतची भीती आहे. त्याबाबत डॉ. शिल्पा चिटणीस जोशी यांनी दिलेली ही खास माहिती....

copper t and its benefits, expert's advice about using copper t, misunderstanding about copper t | कॉपर टी बसवायची भीती वाटते? डॉक्टर सांगतात, कॉपर टी बसवा- गैरसमज विसरा कारण..

कॉपर टी बसवायची भीती वाटते? डॉक्टर सांगतात, कॉपर टी बसवा- गैरसमज विसरा कारण..

Highlightsमैत्रिणींनो कॉपर टी सारख्या कुटुंब नियोजनाच्या उत्तम साधनाबद्दल चुकीच्या समजुती दूर करून त्याचा फायदा करून घेण्यातच आपले हित आहे.

डॉ शिल्पा चिटणीस जोशी
स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ, पुणे


"अग गेल्या वर्षभरात हा तिसरा गर्भपात करायला आली आहेस तू! मी गेल्यावेळीच तुला बजावलं होतं कॉपर टीसाठी पाळीच्या पाचव्या दिवशी ये म्हणून..का आली नाहीस?"
"मॅडम मला खूप भीती वाटते कॉपर टी ची.!"
"आणि वारंवार गर्भपाताची भीती वाटत नाही?" मी थक्क होऊन विचारले..
 अशा मानसिकतेच्या बऱ्याच स्त्रिया असतात.
लग्नानंतर एक मूल होईपर्यंत गर्भनिरोधक गोळ्या हा कुटुंबनियोजनाकरता उत्तम उपाय असतो. हल्ली बहुतेक जोडप्यांना एकच मूल हवे असते. मग गर्भनिरोधक गोळ्या अनिश्चित काळासाठी घेतल्या जाऊ शकत नाहीत.
त्यामुळे एका अपत्यानंतर कॉपर टी हाच पर्याय योग्य ठरतो.


कॉपर टी बद्दल खूप गैरसमज आणि त्यामुळे अनाठायी भीती स्त्रियांच्या मनात बसलेली आहे.
कॉपर टी शक्यतो एक मूल असलेल्या महिलेच्या गर्भाशयात पाळीच्या पाचव्या दिवशी बसवली जाते. तीन, पाच किंवा दहा वर्षे मुदत असलेल्या कॉपर टी उपलब्ध आहेत.

वजन कमी करण्यासाठी 'असा' करा उपवास, ३ साध्या- सोप्या टिप्स- झर्रकन उतरेल वजन

पण त्या मुदतीच्या आधी सुद्धा कधीही काढता येतात.
कॉपर टी गर्भाशयात शुक्राणूसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करते. त्यामुळे गर्भ रुजण्याची प्रक्रिया थांबवते. त्यामुळे गर्भधारणा होत नाही. त्याचा कोणत्याही हार्मोन्सशी काही संबंध नसतो. तसेच कॉपर टी मुळे वजन वाढणे किंवा कमी होणे अजिबात शक्य नसते. कॉपर टी मुळे माझं वजन वाढलं किंवा कमी झालं हा स्त्रियांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज आहे.

 

कॉपर टी चे काही फायदे तोटे बघूया..

फायदे

१.एका अपत्यानंतर खात्रीशीर, सुरक्षित कुटुंब नियोजनाचा पर्याय.

२.  जेव्हा परत प्रेग्नन्सी हवी आहे असं वाटेल तेव्हा कॉपर टी लगेच काढून टाकता येते. पुढच्या महिन्यापासून कधीही गर्भधारणा होऊ शकते.

त्वचेचं सौंदर्य बिघडवणारे ३ पदार्थ, लगेचच खाणं थांबवा- आठवडाभरातच त्वचेवर येईल तेज

३. नको असलेल्या गर्भधारणेची भीती नसल्यामुळे जोडप्याचे लैंगिक जीवन निकोप राहते.

४. कॉपर टी मुळे कोणत्याही हार्मोन्सवर काही परिणाम नसल्यामुळे चाळिशीपर्यंत सुद्धा ती बसवता येऊ शकते.

 

कॉपर टी चे काही तोटे

१.कॉपर टी बसवल्यानंतर सुरवातीचे दोन तीन महिने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो पण त्यासाठी औषधे देऊन तो नियमित करता येतो.

२.मधुमेह, काही प्रकारचे हृदयरोग, संसर्ग होण्याची शक्यता जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये कॉपर टी बसवता येत नाही.

उन्हाळ्यात पिऊनच बघा थंडगार चोको मिल्क, मुलांसोबत स्वत:लाही द्या छान ट्रिट- बघा सोपी रेसिपी

३. कॉपर टी ची नियमित तपासणी दर सहा महिन्यांनी आवश्यक असते. तसेच योनीमार्ग आणि गर्भाशयाच्या मुखावर संसर्ग किंवा जखम असल्यास त्याकडे लक्ष ठेवून वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक ठरते.

तर मैत्रिणींनो कॉपर टी सारख्या कुटुंब नियोजनाच्या उत्तम साधनाबद्दल चुकीच्या समजुती दूर करून त्याचा फायदा करून घेण्यातच आपले हित आहे. हो ना?


 

Web Title: copper t and its benefits, expert's advice about using copper t, misunderstanding about copper t

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.