बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा हिला काही महिन्यांपुर्वीच मुलगा झाला. प्रेग्नन्सीच्या (pregnancy complications) काळात उद्भवलेल्या दियाच्या आजारपणामुळे ९ महिने पुर्ण होण्याच्या आधीच तिची डिलिव्हरी करावी लागली. त्यामुळे अतिशय नाजूक असलेल्या बाळाला सांभाळणं आणि त्यातही आसपास वाढलेला कोरोनाचा संसर्ग यामुळे त्या दिवसांत खूपच विचित्र, भयावह परिस्थितीला सामोरं जावं लागलं, असं दियाने नुकतंच एका मुलाखतीदरम्यान (latest interview of Dia Mirza) सांगितलं. तिचं बाळंतपण आणि त्यानंतरचा काही काळ तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी किती कठीण होता, याविषयी पहिल्यांदाच ती एवढं मनमोकळं बोलली.
बॉलीवूड हंगामा यांना नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दियाने सांगितलं की गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यांत तिचं अपेंडिक्सचं दुखणं वाढलं आणि त्यामुळे त्याचं ऑपरेशन तात्काळ करावं लागलं.
३७ व्या वर्षी गरोदरपण त्यात कोरोनाही झाला, पण... सोनम कपूर सांगतेय कठीण दिवसांची परीक्षा
त्यानंतर काही आठवड्यांतच तिच्या शरीरात बॅक्टेरियल संसर्ग झाला. त्यामुळे तिच्या प्लॅसेंटामधून रक्तस्त्राव होऊ लागला. ही परिस्थिती दिया आणि तिचं बाळ या दोघांच्याही दृष्टीने कठीण होती. म्हणून डॉक्टरांना प्रीमॅच्युअर डिलिव्हरी करावी लागली. बाळ जन्माला आल्यानंतर अवघ्या ३६ तासांच्या आत त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली.
बाळाचा जन्म झाला तेव्हा कोराेनाचा संसर्ग वाढलेला होता. शिवाय बाळही अतिशय नाजूक अवस्थेत होतं. त्यामुळे त्याला दवाखान्यातच आयसीयूमध्ये ठेवलेलं होतं.
कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट! फिट राहण्यासाठी पिते खास स्मुदी, बघा तिने सांगितलेली स्पेशल रेसिपी
अशा परिस्थितीमुळे दियाला आठवड्यातून केवळ दोन वेळाच बाळाला भेटता यायचं. आणि ते देखील दुरूनच बघावं लागायचं. बाळाच जन्म झाल्यानंतर तब्बल अडीच महिने तिला बाळाला स्पर्शही करता आलेला नव्हता. त्यानंतर बाळ जेव्हा साडेतीन महिन्यांचं झालं तेव्हा त्याच्यावर पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. बाळाच्या तब्येतीची सतत चिंता होती, पण तो या परिस्थितीतून सुखरुप बाहेर पडेल, असा विश्वास नेहमीच वाटायचा असंही दिया म्हणाली.