गरोदरपणात शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे अनेक जणींची ब्लड शुगर लेव्हल वाढते. ब्लड शुगर लेव्हल वाढणे आईसाठी आणि होणाऱ्या बाळासाठीही धोकादायक असते. डिलीव्हरीच्या वेळी श्वासोच्छवासाला त्रास होणे, औषधांची रिॲक्शन येणे, डिलीव्हरीदरम्यान गुंतागुंत होणे, बाळाचे वजन जास्त असणे अशा अनेक समस्या यातून उद्भवू शकतात. त्यामुळे प्रेगन्सी डिटेक्ट झाल्यानंतर लगेचच आहारात हे काही पदार्थ नियमितपणे घेतले, तर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहू शकते.
गरोदर महिलांनी हे पदार्थ नियमित खावेत १. कोणत्याही प्रकारचे सोयाबीन्स बीन्समधील कार्बोहायड्रेट्स रक्तामध्ये हळूहळू मिसळले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बीन्स खाल्ले, तर शुगर लेव्हलमध्ये अचानक वाढ होत नाही. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार शुगर असणाऱ्या व्यक्तींनी तीन महिेने नियमितपणे बीन्स खाल्ले, तर शुगर लेव्हल नियंत्रणात राहू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स दररोज आलटून पालटून खात जावेत.
२. सफरचंद शुगर आणि सफरचंद हे समीकरणच तुम्हाला कदाचित चुकीचे वाटेल. पण सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने गरोदर महिलांनी ते नियमित खाण्यास काहीच हरकत नाही. सफरचंदामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असून ते फॅट फ्री असतात. लंच आणि डिनर यांच्या मधल्या काळात एखादे सफरचंद खाणे, योग्य मानले जाते.
३. बदाम बदामामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम हा असा घटक आहे, जो आपल्याच शरीरातील इन्सुलिनचा अधिक प्रभावी वापर करून घेण्यास उपयुक्त ठरतो. बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, प्रोटीन्स, फायबर मोठ्या प्रमाणावर असून त्याचा उपयाेग ब्लड शुगर लेव्हल बॅलेन्स करण्यासाठी होतो.
४. पालक गरोदर महिलांनी पालकाची भाजी नियमितपणे खाल्ली पाहिजे. भाजी आवडत नसल्यास पुरी, पराठा, सूप या माध्यमातून पालकाचे सेवन केले पाहिजे. कारण पालकमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असून ते ब्लड शुगर लेव्हल मेंटेन ठेवते. तसेच पालकामध्ये फायबरही मोठ्या प्रमाणावर असतात आणि कॅलरीचे प्रमाण तुलनेने कमी असते.
५. कॅमोमाईल टी कॅमोमाईल चहामध्ये ॲण्टी ऑक्सिडण्ट आणि ॲण्टी कॅन्सर गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तसेच नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार कॅमोमाईल चहामध्ये ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास मदत करणारे घटकही आढळून आले आहेत. सहा महिन्यांसाठी दिवसातून तीन वेळेस प्रत्येक जेवणानंतर जर कॅमोमाईल चहा घेतला, तर ब्लड शुगर लेव्हल कमी होते, असेही अभ्यासकांनी सांगितले आहे.
६. हळद आपल्याकडे बहुतांश पदार्थांमध्ये अगदी सढळ हाताने हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे पँक्रियाचे काम उत्तमप्रकारे होते. त्यामुळे प्री डायबेटीक स्टेजमधून डायबेटीजकडे वळण्याचा धोकाही मोठ्या प्रमाणात कमी होतो.
७. ओटमील ओटमीलमुळे हृदयाला जसा फायदा होतो, तसाच फायदा रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो. सफरचंदाप्रमाणेच ओटमीलचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. त्यामुळे डायबेटीज असणाऱ्या रूग्णांना ओटमील खाण्याचा सल्ला दिला जातो. ओट्सपेक्षा ओटमील खाणे कधीही चांगले.