Lokmat Sakhi >Health >Pregnancy > खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

Does Birth Control Pills Make Your Breasts Bigger : Birth Control Pills & Breast Size : Birth Control Pills Can Make Your Boobs Bigger : गर्भनिरोधक गोळ्या स्वत:च्या मनानं घेणं टाळा, डॉक्टरांचा सल्ला घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 06:52 PM2024-11-11T18:52:03+5:302024-11-11T19:06:26+5:30

Does Birth Control Pills Make Your Breasts Bigger : Birth Control Pills & Breast Size : Birth Control Pills Can Make Your Boobs Bigger : गर्भनिरोधक गोळ्या स्वत:च्या मनानं घेणं टाळा, डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Does Birth Control Pills Make Your Breasts Bigger Birth Control Pills & Breast Size Birth Control Pills Can Make Your Boobs Bigger | खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी अनेकजणी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सोपा मार्ग निवडतात. परंतु दीर्घकाळासाठी अशा गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम झालेला दिसून येतो. गर्भनिरोधक गोळ्या सतत घेत राहिल्याने आपल्याला पुढील काळात अनेक शारीरिक समस्या सतावू लागतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे नको असलेली गर्भधारणा टाळता तर येते पण सोबतच अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढतात. अनेकांना नको असलेला गर्भ पाडण्यासाठी या गोळ्या घेणे ही सोपी पद्धत वाटत असली तरी आरोग्यासाठी मात्र ते अतिशय घातक असते. मात्र महिलांकडून कधी मनाने तर कधी जवळच्या मैत्रीणीने, नातेवाईकांनी दिलेल्या सल्ल्याने सर्रास या गोळ्या घेतल्या जातात. या गोळ्यांमुळे होणारे दुष्परिणामही (Birth Control Pills Side Effects) अनेकदा आपण ऐकून असतो. पण त्या वेळेला डोळ्यासमोर दुसरा उपाय दिसत नसल्याने आपण या गोळ्या घेतो. इतकेच नाही तर या गोळ्या घेणे हा तुलनेने स्वस्त पर्याय असल्याने अनेकजणी त्याचा वापर करतात. पण या गोळ्यांचे भविष्यात शरीरावर अतिशय घातक परिणाम होतात, ज्याची या गोळ्या घेताना आपल्याला जाणीव नसते(Birth Control Pills & Breast Size).

 वास्तविक, तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये (Birth Control Pills Can Make Your Boobs Bigger) काही विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स असतात, ज्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. अशा परिस्थितीत अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने स्तनांचा आकार वाढू शकतो का? साई पॉलीक्लिनिकच्या वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विभा बन्सल यांनी ओन्ली माय हेल्थला दिलेल्या माहितीनुसार, गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्याने स्तनांचा आकार वाढू शकतो का? याबद्दल अधिक माहिती समजून घेऊयात(Does Birth Control Pills Make Your Breasts Bigger). 

 गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्तनांचा आकार वाढतो का ?  

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भनिरोधक गोळ्यां खाल्ल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या पातळीमध्ये अनेक बदल होतात. महिलांच्या शरीरातील अशा हार्मोन्सच्या बदलांमुळे स्तनांच्या आकारात वाढ होऊ शकते. खरंतर, मासिक पाळी दरम्यान, महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी बदलते. यामुळे स्तनाच्या ऊतीमध्ये बदल होऊ शकतात, ज्यामुळे मासिक पाळी दरम्यान महिलांना स्तन दुखणे किंवा आकारात बदल जाणवू शकतो. अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्यांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन हार्मोन्स असतात. प्रोजेस्टिन हा प्रोजेस्टेरॉनचा एक कृत्रिम प्रकार आहे. जेव्हा स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सुरुवात करतात तेव्हा या गोळ्यांमधील हार्मोन्सच्या प्रभावामुळे स्तनांचा आकार वाढू शकतो. मात्र, ही वाढ खूपच कमी प्रमाणांत असते. 

पाळीत पोट दुखतं-क्रॅम्स येतात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते ५ आसनं, त्रास कमी!

याशिवाय गोळ्या घेत असताना महिलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे स्तनांमध्ये सूज येऊ शकते, ज्यामुळे महिलांना वाटते की त्यांच्या स्तनांचा  आकार बदलला किंवा वाढला आहे. याचबरोबर, जेव्हा महिला गर्भनिरोधक गोळ्या घेणे बंद करतात तेव्हा काही आठवड्यांनंतर त्यांच्या स्तनाचा आकार पूर्वीसारखा होतो. 

योनीमार्गात प्रचंड कोरडेपणा, सतत आग - जळजळ होण्याची ५ कारणं, त्रास कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात..

 गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्तनांचा आकार कायमचा वाढू शकतो का ? 

डॉक्टरांच्या मते, गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने स्तनांचा आकार कायमस्वरूपी वाढवत नाहीत. जरी गोळ्यांमुळे स्तनाच्या आकारात काही बदल झाला तरी तो तात्पुरता असून कायमस्वरूपी नसतो. गर्भनिरोधक गोळ्या घेणे बंद केल्यावर स्तनांचा आकार पुन्हा आधीसारखा पूर्ववत होतो. गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना, स्त्रियांना स्तनांच्या आकारात बदल होण्यासोबतच अनेकांची इतर दुष्परिणाम जाणवू शकतात. परंतु हे अनेक परिणाम किंवा शारीरिक समस्या  प्रत्येक स्त्रीमध्ये दिसून येतीलच असे नाही. परंतु, काही स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या घेताना डोकेदुखी, वजन वाढणे, मूड बदलणे, मळमळ होणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. या गोळ्या घेतल्यानंतर जर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Web Title: Does Birth Control Pills Make Your Breasts Bigger Birth Control Pills & Breast Size Birth Control Pills Can Make Your Boobs Bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.