Join us   

बाळंतपणानंतर PCOD चा त्रास खरंच कमी होतो का? काय नेमकं खरं? वाचा तज्ज्ञ काय सांगतात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 5:10 PM

Does PCOD Temporary or Permanent After Pregnancy: एक बाळ झालं की पाळी नियमित होऊन जाईल... असा सल्ला घरातल्या वयस्कर महिलांकडून मिळतो, पण खरंच असं होतं का?PCOD चा त्रास खरंच कमी होतो का?

ठळक मुद्दे खरंच बाळंतपणाचा आणि PCOD चा काही संबंध आहे का? बाळंतपणानंतरही पाळी अनियमितच असेल, तर काय करावं?

१७ ते २० या वयोगटातल्या तरुणींमध्ये PCOD या आजाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बदललेल्या जीवनशैलीचाच एक परिणाम म्हणून या आजाराकडे पाहिलं जातं. डायबिटीजप्रमाणे इन्सुलिन रेझिस्टन्स हे या आजाराचं कारण आहे. फक्त यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स हे फक्त त्या स्त्रीच्या प्रजनन संस्थेशी संबंधित अवयवांमध्येच असतं. पीसीओडी या आजारात ओव्हरीमध्ये ग्लुकोजला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ओव्हरीचं कार्य नीट होत नाही आणि मग मासिक पाळीविषयीचे अनेक त्रास सुरू होतात, असं साधारण या आजाराचं स्वरुप आहे.(Is PCOD go away after delivery or pregnancy)

 

या आजाराबाबत अनेक समज- गैरसमज आहेत. तसेच हा त्रास सहन करणाऱ्या मुलींच्या, महिलांच्या मनात अनेक प्रश्नही आहेत. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे खरंच बाळंतपणानंतर PCOD चा त्रास कमी होतो का?

रोज फक्त १० मिनिटं करा २ व्यायाम, पोटावरची चरबी झरझर होईल कमी- मिळेल फिटनेससह उत्तम फिगर

खरंच बाळंतपणाचा आणि PCOD चा काही संबंध आहे का? बाळंतपणानंतरही पाळी अनियमितच असेल, तर काय करावं, अशा काही प्रश्नांची उत्तरं आता आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

 

बाळंतपणानंतर PCOD चा त्रास कमी होतो का? PCOD किंवा Polycystic Ovarian Disease आता भारतीय मुलींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. बदललेली बैठ्या कामाची पद्धत, आहारात वाढलेले जंकफूडचे प्रमाण, व्यायाम नसणे आणि काही प्रमाणात अनुवंशिकता हे काही घटक यासाठी कारणीभूत आहेत.

"संदिप को बोलो...." स्विगी ऑर्डर लवकर यावी म्हणून बघा काकांनी काय मेसेज लिहिला....

PCOD असलेल्या मुलींमध्ये गर्भधारणेसाठी थोड्याफार प्रमाणात उपचारांची गरज पडते. बाळंतपणानंतर PCOD चा त्रास पुर्णपणे कमी होतोच, असे नाही. बाळ झाल्यानंतर आहार, वजन याची काळजी न घेतल्यास PCOD चा त्रास परत होऊ शकतो. गरोदरपणामध्ये वाढलेले वजन कमी न झाल्यास याची जास्त शक्यता असते. बाळंतपणानंतर स्तनपान सोडल्यावरही पाळी न येणे, आल्यास ती नियमीत नसणे, अतिरिक्त हेअर ग्रोथ अशी लक्षणे दिसायला लागतात व उपचारांची गरज पडू शकते. डॉ. ऋचा दाशरथी आचार्य स्त्रीरोग तज्ज्ञ 

 

टॅग्स : पीसीओएसपीसीओडी