Same Blood Group Marriage : आजकाल लग्न करताना एकमेकांची आरोग्यासंबंधी माहिती मिळवणं किंवा ब्लड टेस्ट रिपोर्टची मागणी करणं महत्वाचं मानलं जातं. जेणेकरून लग्नानंतर काही समस्या होऊ नये. यासोबतच आजकाल दोघांचा ब्लड ग्रुप एकसारखा असल्यावर लग्न करावं की नाही? असाही प्रश्न अनेकांना पडत असतो. कारण बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, एकसारखा ब्लड ग्रुप असलेल्या जोडप्यानं लग्न केल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळाला आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल किंवा कुणी सांगितलं असेल तर आधी योग्य माहिती मिळवा. खरंच असं काही होतं का? होणाऱ्या बाळाला समस्या होतात का? या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ.
एक्सपर्ट सांगतात की, मुळात ब्लड ग्रुप दोन प्रकारात विभागलेले असतात. एक म्हणजे A, B, AB आणि O. तर दुसरा भाग म्हणजे RH फॅक्टर्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं? तर ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन असतात ते लोक आरएच पॉझिटिव्ह असतात. ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन नसतात ते लोक निगेटिव्ह असतात. म्हणून प्रत्येक ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो.
जर होणारी आई आरएच निगेटिव्ह असेल आणि होणारे वडील आरएच पॉझिटिव्ह असतील तर होणारं बाळ हे RH पॉझिटिव्ह जन्माला येतं. अशावेळी आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे या स्थितीत गरोदर असलेल्या महिलेला म्हणजे RH निगेटिव्ह महिलेला एनटीडीचं इन्जेक्शन दिलं जातं. असं केल्यास जोडप्याच्या होणारं बाळ हे जन्माला सुरक्षितच येतं. त्यामुळे लग्न करणाऱ्या जोडप्याचा ब्लड ग्रुप सारखा नसावा हे सांगण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ब्लड ग्रप सारखा आहे म्हणून त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं नाही, यात काहीच तथ्य नाही.
याबाबत डॉक्टरांनी एक सल्ला दिला की, जोडप्यांनी hb electrophoresis चाचणी करून घ्यायला हवी. जेणेकरून बाळाला hemoglobin abnormalities होऊ शकतो की नाही याबाबत कळू शकेल. सोबतच यावरून लक्षात येतं की बाळाला थालेलिमिया होण्याची शक्यता आहे की नाही.
लग्नानंतर बाळांना आरोग्यासंबंधी काही समस्या होऊ नये यासाठी डॉक्टर सल्ला देतात की, शक्य असल्यास जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करू नका. जर करायचंच असेल तर दोघांच्याही जेनेटिक्सचा अभ्यास केला जावा. जेणेकरून सतत गर्भपात होणं, बाळामध्ये दोष होण्याची शक्यता कमी असते.