Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात उडदाची काळी डाळ खाणं लाभदायक असतं की त्रासदायक? खावी की न खावी?

गरोदरपणात उडदाची काळी डाळ खाणं लाभदायक असतं की त्रासदायक? खावी की न खावी?

गरोदर महिलांमधे काळ्या उडदाच्या डाळीबाबत अनेक गैरसमज आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि भरपूर पोषणमूल्यं असणारी डाळ खाण्यास टाळली जाते. म्हणूनच याबाबत पोषण आहार तज्ज्ञ काय म्हणतात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:58 PM2021-08-26T16:58:15+5:302021-08-26T17:08:37+5:30

गरोदर महिलांमधे काळ्या उडदाच्या डाळीबाबत अनेक गैरसमज आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि भरपूर पोषणमूल्यं असणारी डाळ खाण्यास टाळली जाते. म्हणूनच याबाबत पोषण आहार तज्ज्ञ काय म्हणतात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे.

Is eating black lentil beneficial or harmful during pregnancy? To eat or not to eat? | गरोदरपणात उडदाची काळी डाळ खाणं लाभदायक असतं की त्रासदायक? खावी की न खावी?

गरोदरपणात उडदाची काळी डाळ खाणं लाभदायक असतं की त्रासदायक? खावी की न खावी?

Highlights गरोदरपणात महिलांसाठी काळी उडदाची डाळ महत्त्वाची असते. फक्त ती थोड्या प्रमाणात आणि सुरक्षित स्वरुपात खायला हवी. काळ्या उडदाच्या डाळीत फायबर मोठ्या प्रमाणात असतात. आतड्यांमधे चांगले जिवाणू तयार करण्यास काळ्या उडदाच्या डाळीतल्या गुणांचा उपयोग होतो. काळी उडीद डाळ आधी स्वच्छ धुवून घ्यावी. ती शिजवण्याआधी चांगली उकळून घ्यावी आणि मग शिजवावी.

 गरोदरपणात काय खावं, काय प्यावं याबाबत महिलांच्या मनात अनेक शंका असतात. नुसत्याच शंका नाहीत तर गैरसमजही असतात. हे गैरसमज योग्य वेळी दूर केले नाहीत तर आई आणि बाळाच्य पोषणात कमतरता राहू शकते. गरोदर महिलांमधे काळ्या उडदाच्या डाळीबाबत अनेक गैरसमज आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि भरपूर पोषणमूल्यं असणारी डाळ खाण्यास टाळली जाते. म्हणूनच याबाबत पोषण आहार तज्ज्ञ काय म्हणतात हे बघणं खूप महत्त्वाचं आहे.

छायाचित्र- गुगल

उडदाची काळी डाळ का महत्त्वाची?

उडदाच्या डाळीत ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी अँसिड असतात. हे अँसिड मानवी शरीरात नैसर्गिक स्वरुपात तयार होत नाही. त्यामुळे उडदाची डाळ महत्त्वाची आहे. उडदाची डाळ खाण्यास चविष्ट असते शिवाय ती गरोदरपणात खाल्ली तर तिचा फायदा आई आणि बाळाला होतो.

छायाचित्र- गुगल

उडदाची काळी  डाळ लाभदायक  की धोकादायक?

1. गरोदरपणात महिलांसाठी  काळी उडदाची डाळ महत्त्वाची असते. फक्त ती थोड्या प्रमाणात आणि सुरक्षित स्वरुपात खायला हवी. ही डाळ थोड्या प्रमाणात शरीरात गेली तरी खूप फायदा होतो. उडदाच्या डाळीत प्रथिनं, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम्, पोटॅशियम , सोडियम आणि बी6 हे जीवनसत्त्वं हे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

2. बाळाच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीनं गरोदरपणात काळी उडदाची डाळ खाणं महत्त्वाचं असतं. काळ्या उडदाच्या डाळीत असलेले फॅटी अँसिड बाळाच्या मेंदूच्या विकासाला मदत करतात.

3. काळ्या उडदाच्या डाळीत फायबर मोठ्या प्रमाणात असतात. आतड्यांमधे चांगले जिवाणू तयार करण्यास काळ्या उडदाच्या डाळीतल्या गुणांचा उपयोग होतो. आतड्यातले हे चांगले जिवाणू अन्न पचवण्यास मदत करतात. गरोदरपणात सर्व काही पचवता येत नाही. अशा परिस्थितीत उडदाची डाळ थोड्या प्रमाणात खाणं फायदेशीर असतं आणि सुरक्षितही असतं.

4. ज्या गरोदर महिलांना मधुमेह आहे त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रेरॉलची पातळी कमी जास्त होत राहाते. कोलेस्ट्रेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवायची असल्यास काळी उडदाची डाळ खाणं महत्त्वाचं आहे. गरोदरपणात काळी उडदाची डाळ कमी प्रमाणात सेवन केल्यास त्याचा फायदा हाडं मजबूत होण्यास होतो.

5. काळी उडदाची डाळ शरीराला कॅल्शियमचं शोषण करण्यास मदत करते. उडदाच्या डाळीत अनेक खनिजं असतात. या खनिजांचा उपयोग हाडं बळकट करण्यास होतो.

6. उडदाच्या डाळी लोहाचं प्रमाण चांगलं असतं. त्यामुळे अँनेमियाचा धोका टाळण्यासाठी काळी उडदाची डाळ मदत करते. काळी उडदाची डाळ खाल्ल्यानंतर शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे गरोदर स्त्रियांना जो सतत थकवा येतो तो दूर होण्यास मदत होते.

7. गरोदरपणात अनेक महिलांना बध्दकोष्ठतेचा त्रास होतोच. पण काळ्या उडदाच्या डाळीत फायबर आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे उडदाची डाळ खाल्ल्यानं ही समस्या दूर होते.

छायाचित्र- गुगल

उडदाची डाळ कशी खावी?

काळी उडीद डाळ आधी स्वच्छ धुवून घ्यावी. ती शिजवण्याआधी चांगली उकळून घ्यावी आणि मग शिजवावी. कारण या डाळीत ई कोलाई, चांगली शिजवून घ्यावी. कारण या डाळी ई-कोलाई, लिस्टेरिया, साल्मोनेला सारखे धोकादायक जिवाणू असतात. हे जिवाणू डाळ चांगली शिजवून घेतली की नष्ट होतात. हे जिवाणू गरोदर महिलांसाठी हानिकारक असतात.
तज्ज्ञ म्हणतात की, गरोदरपणात काळी उडदाची डाळ खाणं आवश्यकच आहे. पण ती खाताना थोडया प्रमाणात खायला हवी तरच ती गरोदर महिलेस आणि तिच्या बाळास लाभदायक ठरते. उडदाच्या डाळीचं सूप, खिचडी, लाडू, आमटी अशी विविध स्वरुपात काळी उडीद डाळ खाता येते. 

Web Title: Is eating black lentil beneficial or harmful during pregnancy? To eat or not to eat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.