आपण आई होणार ही बातमी समजली की अनेकींच्या मनात येतं नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे. काही ठिकाणी तर घरातले मागे लागतात. वडिलधाऱ्या बायका सल्ले देतात. (Exercise For Normal Delivery) अर्थात त्यापलिकडे आपले डॉक्टर काय सांगतात आणि आईसह बाळासाठी बाळांतपणाच्यावेळी काय महत्त्वाचं यावरच सिझेरिअन की नॉर्मल डिलिव्हरी हे ठरतं. (Exercise For Normal Delivery) मात्र गरोदरपणात काही व्यायाम केले तर डिलिव्हरी सोपी होऊ शकते. ( Exercise To Speed Up Your Labour During Pregnancy)
योग्य आहार, योग्य व्यायाम हे तर होणाऱ्या आईच्या हातात असते. बर्थ एज्युकेटर अनुपमा विजय आनंद सांगतात गरोदरपणात कोणते व्यायाम केले तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी उपयोग होऊ शकतो. अर्थात हे जनरल व्यायाम आहेत, गरोदर महिने आपल्या डॉक्टरचा सल्ला न घेता कुठलेही व्यायाम परस्पर करु नयेत. (Exercise To Speed Up Your Labour During Pregnancy)
१) डक वॉक
प्रेग्नंसीच्या शेवटच्या तीन महिन्यात महिलांनी डक वॉक करायला हवं. हा व्यायाम केल्याने तुमच्या मांसपेशी मजबूत राहतात. बाळ खाली सरकण्यात मदत होते. जमेल तसा कुणाच्या मदतीने हा व्यायाम करता येतो. हा व्यायाम फार वेगात न करता सावकाश करा.
२) बर्थ बॉल
बाजारात बर्थ बॉल म्हणजेच रबराचे मोठे बॉल्स मिळतात.या बॉलवर बसून हळूहळू वर उठावे. मूल खाली येण्यास आणि गर्भाशयाची ग्रीवा परसण्यास मदत होते. ज्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यास मदत होऊ शकते.
३) डीप स्क्वॅट्स
प्रेग्नंसीच्या शेवटच्या महिन्यात डीप क्वाट्स केल्याने बाळाला बाहेर येण्यास मदत होते. याशिवाय किगल व्यायाम केल्यानेही पेल्विक फ्लोरच्या मांसपेशी ॲक्टिव्ह होतात. गर्भाशय आणि योनीच्या पेशी मजबूत होतात. संतुलित आहार, भरपूर पाणींही प्यायला हवं. आणि हे लक्षात ठेवायला हवं की प्रत्येकीचं गरोदरपण वेगळं आहे त्यामुळे डॉक्टरला न विचारता स्वत:वर कुठलेही प्रयोग करु नयेत. प्रेग्नंसीच्या दिवसांत कोणताही व्यायाम सांभाळून करावा. जपून चालावे, भरारभर चालणं टाळून सावकाश पाऊलं ठेवावीत. सातव्या महिन्यानंतर गरज असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर पडताना स्वत:ची पूर्ण काळजी घ्यावी.