Lokmat Sakhi >Health >Pregnancy > Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

गरोदरपण जसं सुरू होतं, तसं ती स्त्री बाळांतपणाचा विचार करू लागते. अनुभवी स्त्रियांकडून वेगवेगळी  माहिती कळाल्यामुळे आपली डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला हवी, असं तिला हळूहळू वाटू लागतं. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सोसण्यासाठी शरीरही तेवढंच सशक्त असणं गरजेचं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:50 PM2021-07-20T16:50:39+5:302021-07-20T17:01:22+5:30

गरोदरपण जसं सुरू होतं, तसं ती स्त्री बाळांतपणाचा विचार करू लागते. अनुभवी स्त्रियांकडून वेगवेगळी  माहिती कळाल्यामुळे आपली डिलिव्हरी नॉर्मलच व्हायला हवी, असं तिला हळूहळू वाटू लागतं. पण नॉर्मल डिलिव्हरीच्या कळा सोसण्यासाठी शरीरही तेवढंच सशक्त असणं गरजेचं आहे.

Exercise for pregnant women which helps for normal delivery | Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

Pregnancy Exercise: नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गरोदरपणातही व्यायाम कराच! व्यायाम टाळले की प्रश्न वाढले..

Highlightsगरोदरपणात जो व्यायाम कराल, तो तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच केला पाहिजे. व्यायाम करताना कोणतेही अनाठायी धाडस करू नये. प्रकृती सांभाळूनच व्यायाम करावा.

गरोदरपणात शरीराला व्यायामाची नितांत गरज असते. या काळात शरीर जेवढे फ्लेक्झिबल असेल, तेवढे ते चांगले असते. त्यामुळे गरोदरपणात सुरूवातीला होणारा त्रास जरा कमी झाला, की प्रत्येक गरोदर स्त्री ने तज्ज्ञांच्या मदतीने काही व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत. नियमित व्यायाम केल्याने प्रसवकळा सोसण्यासाठी शरीर तयार तर होतेच, पण त्यासोबतच मनही खंबीर होत जाते. कारण बाळांतकळा देताना शरीर आणि मन दोन्हीही कणखर असणे गरजेचे असते. 

 

गरोदर महिलांनी करावेत असे व्यायाम
नियमितपणे चालणे हा गरोदर पणातला सर्वोत्तम व्यायाम आहे.
स्ट्रेचिंग
मानेचे व्यायाम
भ्रामरी प्राणायाम
मार्जरासन


वज्रासन
पर्वतासन
दोन्ही प्रकारचे कोनासन
त्रिकोणासन
वीरभद्रासन
पश्चिमोत्तानासन
सर्वांगासन
बटरफ्लाय आसन

 

गरोदरपणात व्यायाम का करावे ?
व्यायामामुळे ओटीपोट, पाठ आणि मांडीचे स्नायु बळकट होतात. प्रसवकळा देताना हे स्नायू बळकट असणे खूप आवश्यक असते. हे स्नायू बळकट नसतील, तर डिलिव्हरीच्या वेळी कळा देताना शक्ती राहत नाही, कळा सहन करणे शक्य होत नाही. शेवटी त्या स्त्रीला खूप थकवा आल्याने डॉक्टरांना नाईलाजाने सिझेरियनचा पर्याय निवडावा लागतो. 

गरोदर महिलांनी व्यायाम करताना अशी काळजी घ्यावी
१. जर्की आणि बाऊंसिंग मुव्हमेंट करू नये.
२. पहिल्यांदाच जेव्हा एक्सरसाईज सुरू कराल, तेव्हा पहिले काही दिवस आठवड्यातून तीन दिवसच व्यायाम करा. त्यानंतर हळूहळू दिवस वाढवत न्या.
३. सुरूवातीला दोन आठवडे केवळ वार्मअप व्यायाम करा.


४. वार्मअप- एक्सरसाईज, कुल डाऊन हा क्रम पाळायला हवा.
५. अतिकष्टाचे आणि त्रासदायक व्यायामप्रकार करणे टाळा. व्यायाम करताना जर खूपच त्रास होतो आहे, असे वाटले की लगेच थांबावे आणि रिलॅक्स व्हावे.
६. व्यायाम करण्याची जागा हवेशीर असायला हवी. 
७. व्यायाम करताना तुमचे हर्टबीट १४० पेक्षा जास्त व्हायला नको.
८. पाणी किंवा एनर्जी ड्रिंक व्यायामाच्या आधी, मधे आणि नंतरही थोडे- थोडे घेत रहा. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही आणि थकवा येणार नाही.


 

Web Title: Exercise for pregnant women which helps for normal delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.