Join us   

गरोदरपणात लिपस्टिक लावणं अनेकदा धोक्याचं ठरु शकतं असं तज्ज्ञ सांगतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:43 PM

महिला सौंदर्यासाठी वापरत असलेलं कोणतंही कॉस्मेटिक्स हे घातक ठरु शकतं. त्याचे साइड इफेक्टस होतात. पण लिपस्टिक ही सर्व कॉस्मेटिक्समधे सर्वात घातक आहे असं तज्ज्ञ सांगतात. लिपस्टिक ओठांवर लावली जाते. त्यामुळे यातील घातक रसायनं थेट आपल्या पचनसंस्थेत जाण्याचा धोका असतो. म्हणूनच लिपस्टिकच्या बाबतीत गरोदर महिलांनी जास्त कळजी घ्यायला हवी असं तज्ज्ञ सांगतात.

ठळक मुद्दे मॅग्नीज, कॅडमियम आणि अँल्युमिनिअम हे घटक जर शरीरात एकत्र गेले तर ते आरोग्यासाठी धोकादायक असतं.बहुतांश कंपनीच्या लिपस्टिकमधे शिसे हा घटक असतो. शिसे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतं.लिपस्टिकमधे बिस्मथ ऑक्सीक्लोराइड हा घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरला जातो. या घटकामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.छायाचित्रं:- गुगल

महिलांच्या मेकअप किटमधे किंवा पर्समधे लिपस्टिक हमखास असतेच. घाईच्या वेळेत तयार व्हायला वेळ नसला तर ओठांवर हलकीशी लिपस्टिक फिरवली तरी लूक चांगला होतो. अनेक महिला तर केवळ बाहेर जातांनाच नाही तर घरात असतांनाही त्यांच्या ओठावर दिवसभर लिपस्टिक असतेच. लिपस्टिकचं महिलांना आकर्षण असलं तरी लिपस्टिक हे आरोग्यासाठी घातक कॉस्मेटिक ठरतं असं तज्ज्ञ सांगतात. लिपस्टिकच्या बाबतीत सर्वच मुली आणि स्त्रियांनी काळजी घ्यायला हवी. पण गरोदर असलेल्या स्त्रियांनी तर लिपस्टिक बाबत अधिक सावधगिरी बाळगायला हवी असं तज्ज्ञ सांगतात. महिला सौंदर्यासाठी वापरत असलेलं कोणतंही कॉस्मेटिक्स हे घातक ठरु शकतं. त्याचे साइड इफेक्टस होतात. पण लिपस्टिक ही सर्व कॉस्मेटिक्समधे सर्वात घातक आहे असं तज्ज्ञ सांगतात. लिपस्टिक ओठांवर लावली जाते. त्यामुळे यातील घातक रसायनं थेट आपल्या पचनसंस्थेत जाण्याचा धोका असतो.

छायाचित्र:- गुगल

लिपस्टिकमधील घातक घटक

* मॅग्नीज, कॅडमियम आणि अँल्युमिनिअम हे घटक जर शरीरात एकत्र गेले तर ते आरोग्यासाठी धोकादायक असतं. लिपस्टिक लावून जेवताना हे घटक शरीरात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे लिपस्टिक विकत घेताना केवळ त्याचा ब्रॅण्ड आणि शेड न बघता त्यात वरील घातक घटक नाहीत ना हे बघावं.

* बहुतांश कंपनीच्या लिपस्टिकमधे शिसे हा घटक असतो. शिसे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतं. शिसे जर शरीरात गेलं तर हायपरटेन्शन आणि हदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

* लिपस्टिकमधे अनेक प्रकारचे प्रिझर्व्हेटिव्हज असतात ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. जर लिपस्टिकमधील समाविष्ट प्रिझर्व्हेटिव्हजचं प्रमाण जास्त असेल तर मात्र कॅन्सर होण्याचा धोकाही असतो. पॅरॅबिन हे असं प्रिझर्व्हेटिव्ह आहे जे कॅन्सरला कारणीभूत ठरतं. या प्रिझर्व्हेटिव्हमुळे महिलांना स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते.

* लिपस्टिकमधे बिस्मथ ऑक्सीक्लोराइड हा घटक प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरला जातो. या घटकामुळेही कॅन्सर होण्याचा धोका असतो. तसेच या घटकामुळे अनेक प्रकारच्या अँलर्जीही होवू शकतात.

छायाचित्र:- गुगल

गरोदर स्त्रिया आणि लिपस्टिक

  * गरोदरपणात लिपस्टिक लावणं शक्यतो टाळावं असा सल्ला तज्ज्ञ देतात. लिपस्टिक लावायचीच असल्यास स्वस्त किंमतीची लिपस्टिक न घेता चांगल्या ब्रॅण्डची लिपस्टिक घ्यावी.

* लिपस्टिकमधे वर उल्लेख केलेले घातक घटक नाहीत ना याची याची खात्री करुन घ्यावी.

* अनेक महिला लिपस्टिकशिवाय राहूच शकत नाही. अशा महिलंनी लिपस्टिक विकत घेताना डार्क शेडसची घेवू नये. कारण डार्क शेड लिपस्टिकमधे धातू असतात. जे गरोदर स्त्रीसाठी आणि पोटातल्या बाळासाठी घातक असतात.

* लिपस्टिक लावण्याआधी ओठांना  साजूक तूप किंवा पेट्रोलियम जेली लावावी आणि त्यावर लिपस्टिक लावावी. यामुळे लिपस्टिकमुळे होणारे साइड इफेक्टस कमी होतात.