Lokmat Sakhi >Health >Pregnancy > खरंच व्यायाम केल्यामुळे बाळंतपणात आईच्या दुधाची चव बदलते? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात की.... 

खरंच व्यायाम केल्यामुळे बाळंतपणात आईच्या दुधाची चव बदलते? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात की.... 

जर व्यायाम कमी प्रमाणात केला तर त्याचे मानसिक लाभ तर होतातच आणि हृदयाची श्वसन शक्ति पण वाढते, त्याचबरोबर स्नायुंची शक्ती आणि आई झालेल्या स्त्रीची लवचिकता पण वाढते.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:44 PM2021-09-16T17:44:12+5:302021-09-16T18:00:59+5:30

जर व्यायाम कमी प्रमाणात केला तर त्याचे मानसिक लाभ तर होतातच आणि हृदयाची श्वसन शक्ति पण वाढते, त्याचबरोबर स्नायुंची शक्ती आणि आई झालेल्या स्त्रीची लवचिकता पण वाढते.

Fact Check : Does exercise really change the taste of breast milk during childbirth? Gynecologists say that .... | खरंच व्यायाम केल्यामुळे बाळंतपणात आईच्या दुधाची चव बदलते? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात की.... 

खरंच व्यायाम केल्यामुळे बाळंतपणात आईच्या दुधाची चव बदलते? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात की.... 

Highlightsबाळंतपणानतंर आईने व्यायाम योग्य प्रमाणात करणं गरजेचे आहे. जर तिची धडधड वाढत असेल तर हे संकेत पाहून समजावे की तिने व्यायाम कमी करावा. अशी धडधड तेंव्हाच वाढते जेंवा हृदयाचे ठोके 120-130 च्या वर जातात.कमी प्रमाणात व्यायाम केल्याने बाळाचे वजन पण नियंत्रणात राहते. गर्भावस्थेमुळे होऊ शकणारे हायपरटेंशन किंवा मधुमेह यांना आटोक्यात ठेवता येते. योग्य व्यायाम, योग्य पद्धतीने करणे नितांत गरजेचे आहे.

बाळाला दूध पाजण्यासंबंधी जे काही गैरसमज प्रचलित आहेत. त्यात एक सर्वसामान्य आहे तो म्हणजे व्यायाम केल्याने स्तनपान करत असलेल्या आईच्या दुधाची चव बदलते. काही तुरळक शोधात नक्कीच हे आढळले आहे की जास्त व्यायाम केल्याने शरीरात लॅक्टिक अॅसिड वाढते, जे दूधात पण जाते आणि दूधाची चव कडू आणि खारट जाणवते. तरी हे लक्षात घेण्यासारखे आहे की यामुळे दूधाच्या मात्रेवर काही परिणाम होत नाही किंवा कमी प्रमाणात व्यायाम करण्यात काहीच हरकत नाही.

सर्वाधिक माता आपल्या बाळाचे स्तनपान डॉक्टरांनी सांगितलेल्या सुचनांनुसार करतात. प्रसुतीरोग तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मंजिरी काबा (सैफी रुग्णालय)  यांनी याबाबत महिलांच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्यायाम कमी प्रमाणात केला तर त्याचे मानसिक लाभ तर होतातच आणि हृदयाची श्वसन शक्ति पण वाढते, त्याचबरोबर स्नायुंची शक्ती आणि आई झालेल्या स्त्रीची लवचिकता पण वाढते. याने तिला शारीरिक लाभ तर होतोच पण त्याच बरोबर बाळंतपणा नंतर होणारे नैराश्य पण जाते.

व्यायाम करणे गर्भवती महिलांना देखील लाभदायी आहे, जे त्यांना अवघड (मस्क्यूकोस्केलेटल) अवस्थेने होणारे त्रास आणि कष्ट कमी करते. गर्भवती असतानाचे त्रास जसे कंबरे खालील भागात दुखणे, कंबरेसंबंधी त्रास आणि ओटीपोटीत वेदना कमी करते. स्ट्रेचचे व्यायाम केल्याने स्नायुंना आराम मिळतो.

बाकी काही अन्य व्यायामाचे प्रकार जसे ओटीपोटी चे व्यायाम, उदाहरणार्थ कीगल व्यायाम प्रकार करण्यास गर्भावस्थेत सांगितले जाते जेणे करुन बाळाला जन्म देणे सुसह्य होते आणि लघवीवर नियंत्रण ठेवता येते. कमी प्रमाणात व्यायाम केल्याने बाळाचे वजन पण नियंत्रणात राहते. गर्भावस्थेमुळे होऊ शकणारे हायपरटेंशन किंवा मधुमेह यांना आटोक्यात ठेवता येते. योग्य व्यायाम, योग्य पद्धतीने करणे नितांत गरजेचे आहे.

योग्य पद्धतीने व्यायाम केल्याने बाळंतीणीला व्यायामाने होणारा मानसिक आघात जाणवत नाही. ज्यांच्या बाळंतपणात जोखिम सांगितल्या असतील त्यांनी व्यायाम करु नये. त्याचबरोबर अकाली प्रसूतीचा उच्च धोका असणाऱ्या किंवा ज्यांना हृदयविकाराच्या समस्या, उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा आजार किंवा ज्यांना फिट (आकडी) येत असतील असे पूर्वी पासून काही आजार असतील तर त्यांनीसुद्धा व्यायाम करु नये.

बाळाच्या जन्मानंतर किती दिवसांनी व्यायाम करू शकतो?

जर काही त्रास नसेल तर बाळंपणात आणि त्या नतंर बायकांना सल्ला दिला जातो की त्यांनी निदान थोड्याप्रमाणात तरी आठवड्यातून साधारणपणे 150 मिनिटे शारीरिक हालचाल करावी.अति व्यायाम करणे पण हानिकारक असू शकते. बाळंतपणानतंर काही स्ट्रेचेस सोडले तर लगेच व्यायामाला लागू नये, बाळाला जन्म दिल्यानंतर कमीतकमी 40 दिवस तरी आराम करावा. 

शरीराला पूर्ववत यायला 40 दिवसाची कालावधी लागतो, त्याआधी बाळंतीण बरी झालेली नसते. जर बाळाचा जन्म सीजेरियननी (आपरेशन करुन) झाला असेल तर आम्ही नवजात आईला तीन महीने तरी व्यायाम करण्यास टाळायला सांगतो, कारण ओटीपोटीच्या स्नायूंना ताणून धरण्याची ताकत परत यायला तेवढा वेळ लागतो. हे ही खरे आहे कि सगळ्यांची शारिरीक क्षमता वेग-वेगळी असते आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या दृष्टिने जो योग्य असेल तो व्यायाम सांगितला जातो.

बाळंतपणानतंर आईने व्यायाम योग्य प्रमाणात करणं गरजेचे आहे. जर तिची धडधड वाढत असेल तर हे संकेत पाहून समजावे की तिने व्यायाम कमी करावा. अशी धडधड तेंव्हाच वाढते जेंवा हृदयाचे ठोके 120-130 च्या वर जातात, जे योग्य नाही. प्रत्येकाची व्यायाम करण्याची स्वताःची क्षमता असते, आपल्या शरीराचे ऐकावे. प्रत्येक बाई करिता हे वेगळे असु शकते, व्यायामाचा प्रकार पण तिचा वेगळा असू शकतो.

पोहणे सगळ्यात चांगला व्यायाम प्रकार समजला जातो कारण पाणी वजनाला आधार देतो आणि सांध्यांचे ताण कमी करते. पण सामान्य स्त्रीला स्वच्छ स्विमिंग पुल सापडेलच, असे नाही. म्हणून चालणे, योगा करणे किंवा स्ट्रेचचे व्यायाम करणे असे प्रकार ती निवडू शकते. गरज भासल्यास ती योग्य फिजियोथेरेपिस्ट ची मदत पण घेऊ शकते.
 

Web Title: Fact Check : Does exercise really change the taste of breast milk during childbirth? Gynecologists say that ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.