बाळाला जन्म दिल्यानंतर बहुतांश आई आपल्या बाळाच्या पालन - पोषणाकडे लक्ष देतात. बाळाचं जन्म झाल्यानंतर आईचं सर्वस्व बाळाचं होतं. बाळाला जन्म दिल्यानंतर आईचे त्याच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे असते. पण सध्याच्या सेलिब्रिटी बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. व आपला डेली रुटीन फॉलो करतात.
नुकतीच टीव्ही व बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान आई झाली आहे. वयाच्या ४० व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. १० मे रोजी तिची प्रसूती झाली. मात्र, प्रसूती झाल्यानंतर चक्क १० दिवसात तिने १० किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. तिने सोशल मिडीयावर एक सेल्फी पोस्ट केला आहे. ज्यात तिने १० दिवसात १० किलो वजन कमी केले असे कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे(Gauahar Khan Lost 10 Kgs In 10 Days Of Delivering Her Baby, Flaunts Her Postpartum Transformation).
मिडिया रिपोर्टनुसार गौहर खान योगाभ्यासाचा आधार घेऊन वजन कमी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. गौहरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती नाइटसूटमध्ये दिसत असून, ती खूपच स्लिम दिसत होती. तिने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ' १० दिवसात १० किलो वजन कमी केले. आता मला आणखी ६ किलो वजन कमी करायचे आहे. न्यू मॉम लाईफ.''
अपचन-गॅसेस यामुळेही डोके प्रचंड दुखते? ५ उपाय, पोट होईल साफ-डोकेदुखीही थांबेल..
प्रेगनेंसी आधी गौहर खूप बारिक होती, प्रेगनेंसी दरम्यान, गौहर हेल्दी झाली. त्यामुळे आता पुन्हा एकदा पहिल्या सारखं होण्यासाठी गौहर तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसून येत आहे. गौहरच्या ट्रान्सफॉर्मेशनकडे पाहून अनेकांना धक्काच बसला आहे.
उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता
२५ डिसेंबर २०२० रोजी गौहर आणि जैद दरबार दोघेही विवाह बंधनात अडकले. लॉकडाऊन दरम्यान रेशन खरेदी करताना दोघांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर चर्चा सुरू झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गौहरने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.
मुलाचे या जगात आगमन झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांनी गोड बातमी शेअर केली. पोस्ट शेअर करताना दोघांनी लिहिले की, 'इट्स बेबी ब्वॉय. आनंदाचा खरा अर्थ काय आहे याची जाणीव झाली.''