यामी गौतमने (Yami Gautam) अलिकडेच सोशल मीडियावर आपल्या बाळंतपणाचा अनुभव शेअर केला आहे. ज्यात तिने एका खास प्रकारच्या लाडूबद्दल सांगितले आहे. खासकरून प्रेग्नंसी म्हणजेच डिलिव्हरीनंतर शरीराला लवकर रिकव्हर करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हे लाडू खाल्ले जातात जे तब्येतीसाठी बरेच फायदेशीर ठरतात. (Yami Gautam Weight Loss After Delivery Yami Gautam Post Pregnancy Weight Loss)
या लाडूंना पंजीरीसुद्धा म्हटलं जातं. यात खूप सारी पोषक तत्व असतात. हे लाडू खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. या लाडूंचा आहारात समावेश केल्यास मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होईल. हे खास लाडू तुपात गव्हाचं पीठ भाजून तयार केले जातात. यात ड्राय फ्रुट्स, गूळ मिसळले जाते. (How To Loss Weight After Delivery)
पंजिरी लाडू खाण्याचे फायदे
फायबर्स रिच हे लाडू खाल्ल्यानं पोट बराचवेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला ओव्हरइंटींग टाळता येतं. पंजिरी लाडूमध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगले असते. ज्यामुळे हाडांना मजबूती मिळते. तर गूळ शरीराला एनर्जेटीक ठेवतो. यामुळे शरीराचे हॉर्मोनल बॅलेन्सही चांगले राहते.
यातील एंटी ऑक्सिडेंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. याशिवाय पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. या लाडूंचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वेगानं वजन कमी करू शकता. यामी गौतमप्रमाणे या लाडूंचा आहारात समावेश करून तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलची सुरूवात करू शकता.
पंजिरी लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
1) गव्हाचं पीठ - 500 ग्रॅम
2) रवा - 60 ग्रॅम
3) सुकं खोबरं - 1 बाऊल
4) फळांच्या सुकलेल्या बीया- 10 ग्रॅम
5) काजू -20 ते 25 ग्राम
6) बदाम - 20 ते 25 ग्राम
8) गूळ- 150 ग्रॅम
9) तूप - 450 ग्रॅम
पंजीरी लाडू करण्याची सोपी रेसिपी (Pamjiri Ladoo Recipe)
एक कढई घ्या. त्यात थोडं तूप घाला नंतर यात मखाने घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या. नंतर बाहेर काढून मखाने एका ताटात बारीक करून घ्या. नंतर रवा तूपासोबत भाजून त्यात पीठ घाला. यात मखाने, सुकलेलं खोबरं, काजू, बदाम घाला. नंतर गूळ घालून व्यवस्थित मिसळा, हे मिश्रण तयार झाल्यानंतर मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या.