Join us   

‘आधी होती माझी फिगर हॉट, पण आई झाल्यानंतर.. ’ -बिपाश बासू सांगते, मम्मा डोण्ट कॉलॅप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2023 7:00 PM

Know Bipasha Basu’s secrets to postpartum weight loss : बिपाशा बासूची लेक आता सहा महिन्यांची झाली त्यानंतर ती आता पुन्हा आपलं फिटनेस रुटीन सुरु करते आहे, त्या प्रोसेसविषयी ती सांगते..

"प्रेग्नंन्सी म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म" असे म्हटले जाते ते काही अंशी हे योग्य आहे. प्रेग्नंन्सीनंतर स्त्रीचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. प्रेग्नंन्सीनंतर स्त्रीच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते. तिला स्वतःचे करुन परत आपल्या बाळाच्या देखील सगळ्या गरजांकडे लक्ष द्यावे लागते. यासगळ्यांत त्या स्त्रीची फारच ओढाताण होते. प्रेग्नंन्सीनंतर स्त्रीचे संपूर्ण आयुष्य जसे  बदलून जाते तसेच तिच्या शरीरातदेखील खूप मोठे बदल होतात. या बदलांना सामोरे जात असताना स्त्रीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

या बाळंतपणाच्या काळात  इतके शारीरिक बदल अनुभवते जेवढे तिने आजवरच्या आयुष्यात अनुभवलेले नसतात. हे बदल गरोदरपणाच्या स्थितीच्या अनुकूलतेनुसार होत असतात पण याचा मानसिक व शारीरिक परिणाम सुद्धा स्त्री वर मोठ्या प्रमाणावर होतो. बाळंपणानंतर अचानक वजन वाढणे, स्तन लूज पडणे, थकवा जाणवणे, स्किन खराब होणे यांसारख्या असंख्य समस्यांमधून स्त्रीला जावे लागते. माझ्या फिगरने आधी लाखो लोक घायाळ व्हायचे, परंतु आता प्रेग्नंन्सी नंतर वाढलेलं वजन कमीबी करण्यासाठी मलादेखील जिममध्ये घाम गाळावा लागत आहे. असे म्हणत, मुलीला जन्म दिल्यानंतर ६ महिन्यांनंतर बिपाशा बसूने (Bipasha Basu) तिचे शरीर फिट करण्यासाठी काम सुरू केले आहे. बॉलिवूडमधील नुकतीच आई झालेली बिपाशा बासू प्रेग्नंन्सी नंतर वजन (Lose Postpartum Weight) वाढण्याबाबत काय सांगते, आणि हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तिने काय काय परिश्रम घेतले हे सगळ्यांसोबत शेअर केले आहे(Here are Bipasha Basu’s Secrets to Lose Postpartum Weight).

बिपाशा बासूची वेट लॉस जर्नी (Weight Loss Journey)... 

४४ वर्षीय बिपाशाने सहा महिन्यांपूर्वी एका मुलीला जन्म दिला आणि आता तिने प्रेग्नंन्सी दरम्यान वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट सुरू केले आहे. बिपाशाने तिचे गर्भधारणेपूर्वीचे वजन परत आणण्यासाठी आणि तिचा स्टॅमिना व ताकद वाढवण्यासाठी विविध व्यायाम प्रकार करत असल्याचे दिसत आहे. बिपाशाने शेअर केलेल्या तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये  'Mumma Don't Collapse' असे लिहिले आहे. बिपाशाने या पोस्टमध्ये हॅशटॅग दिले आहेत – स्वतःवर प्रेम करा, मम्मा कॅन डू इट, ट्रान्सफॉर्म, पोस्ट प्रेग्नन्सी वेट लॉस जर्नी आणि नथिंग इज इम्पॉसिबल असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. 

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

गरोदपणानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? आलिया भट सांगते तिने स्किन चांगली राहावी म्हणून केलेले उपाय..

बिपाशा बसूचे फिटनेस ट्रेनर महेश घाणेकर यांनी खुलासा केला आहे की सध्या अभिनेत्रीच्या वर्कआउट रूटीनचे मुख्य उद्दिष्ट हे शारीरिक स्ट्रेंथ निर्माण करणे आणि वजन कमी करणे आहे. यामध्ये बिपाशाने सुरुवातीला इंच लॉस करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गर्भधारणेनंतर वजन कमी करण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे बिपाशाने हळूहळू वजन कमी करण्यास सुरुवात केली आहे. 

एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...

प्रेग्नंन्सीनंतर एकदम वर्कआऊट करण्यावर भर देण्यापेक्षा हळूहळू रोज एक तास व्यायाम करण्यावर अभिनेत्री लक्ष केंद्रित करत आहे. ज्यामध्ये फंक्शनल ट्रेनिंग आणि स्ट्रेंथ बिल्डिंगपासून विविध प्रकारचे व्यायाम समाविष्ट आहेत. फिटनेस सोबतच बिपाशाने आपल्या डाएटकडेदेखील तितकेच लक्ष दिले आहे,  जेवणानंतर कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज नियंत्रित करण्याचा आणि मीठ कमी खाण्याचा सल्ला  तिला तिच्या डाएटिशियनने दिला आहे. गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी बिपाशा डंब बेल पंच, प्लेट पुश, सिंगल डंब बेल स्क्वॅट्स, रॉड लेग प्रेस, एल्बो प्लँक, बेंच टॅप इत्यादी व्यायाम करते.

साधारणपणे, डॉक्टर गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यासाठी ६ महिने वाट पाहण्याची शिफारस करतात आणि बिपाशानेही हाच नियम पाळला आणि प्रसूतीनंतर ६ महिन्यांनी तिच्या फिटनेस रूटीनमध्ये परत आली. तुम्हालाही गर्भधारणेनंतर तुमचे वजन कमी करायचे असेल, तर प्रसूतीनंतर किमान ६ महिने थांबा.

टॅग्स : गर्भवती महिलाप्रेग्नंसी