प्रेग्नंसी टाळण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या पिल्सचे सेवन महिलांना सेक्सनंतर २४, ४८ किंवा ७२ तासांच्या आत करावे लागते. सगळ्या बर्थ कंट्रोल पिल्स या पाण्यासोबत घेतल्या जातात. सध्या चर्चेत असलेला प्रेग्नंसी टाळण्याचा नवा उपाय म्हणजे बर्थ कंट्रोल पिल्स तुम्ही पाण्यासोबत न घेता चघळू शकता. या चघळायच्या बर्थ कंट्रोल पिल्ससुद्धा इतर पिल्सप्रमाणेच काम करतात. फक्त तुम्हालाा या गोळ्या घेण्यासाठी पाण्याची गरज नसते तुम्ही चावूनही या गोळ्या खाऊ शकता. ( How to prevent pregnancy contraception method chewable birth control pills benefits side effects)
या गोळ्यांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन नावाचे दोन हार्मोन्स असतात. हे दोन्ही हॉर्मोन्स प्रेग्नंसी रोखण्यासाठी आणि प्रेग्नंसीचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. रेग्यूलर बर्थ कंट्रोल पिल्स तुम्ही चावून किंवा चघळून खाऊ शकत नाही. पण बर्थ कंट्रोल पिल्सना अशा प्रकारे डिजाईन करण्यात आलं आहे. ज्या तुम्ही चावून किंवा चघळून घाऊ शकता. या गोळ्याचे फायदे आणि तोटे समजून घ्या.
चघळायच्या गोळ्यांचे फायदे - तोटे
चघळायच्या बर्थ कंट्रोल पिल्ससाठी तुम्हाला पाण्याची आवश्यकता नसते. यामुळे या पिल्स इतर उपायांपेक्षा वेगळ्या असतात. ज्यांना पाण्यासोबत गोळ्या घ्यायला आवडत नाहीत त्या महिलांसाठी या गोळ्या डिजाईन करण्यात आल्या आहेत. या गोळ्यांमध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिन असल्यामुळे एग्सना गर्भशयात इंप्लाट होण्यापासून रोखता येतं. काही बर्थ कंट्रोल पिल्स चावून किंवा पाण्यासोबत अशा दोन पद्धतीनं घेता येतात.
याऊलट चघळायच्या बर्थ कंट्रोल पिल्सचे सेवन सगळेचजण करू शकत नाहीत. कारण अनेकांना या गोळ्यांची चव आवडत नाही. काही महिलांची तक्रार असते की या गोळ्या त्यांच्या दातांमध्ये अडकतात. पूर्ण फायदा मिळवण्यासाठी गोळी पूर्ण चघळून त्यानंतर थोडं पाणी प्यावं. इतर चघळण्याच्या गोळ्या आणि बर्थ कंट्रोलच्या गोळ्या चळघण्यात खूप फरक असतो. अनेकदा ब्लड क्लोटींगची समस्या उद्भवते. स्मोकींगची सवय असलेल्या आणि वय ३५ असलेल्या महिलांमध्ये ही समस्या सर्वाधिक जाणवते.