Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदपणानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? आलिया भट सांगते तिने स्किन चांगली राहावी म्हणून केलेले उपाय..

गरोदपणानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? आलिया भट सांगते तिने स्किन चांगली राहावी म्हणून केलेले उपाय..

Alia Bhatt Reveals Her Routine For Glowing Skin Post Delivery : प्रेग्नंन्सी नंतर आपली स्किन पूर्ववत करण्यासाठी नवमातांनी या टीप्सचा जरुर वापर करावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2023 02:53 PM2023-02-19T14:53:43+5:302023-02-19T14:55:42+5:30

Alia Bhatt Reveals Her Routine For Glowing Skin Post Delivery : प्रेग्नंन्सी नंतर आपली स्किन पूर्ववत करण्यासाठी नवमातांनी या टीप्सचा जरुर वापर करावा.

How to take care of skin after pregnancy? Alia Bhatt says the solution she took to keep her skin healthy.. | गरोदपणानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? आलिया भट सांगते तिने स्किन चांगली राहावी म्हणून केलेले उपाय..

गरोदपणानंतर स्किनची काळजी कशी घ्यावी? आलिया भट सांगते तिने स्किन चांगली राहावी म्हणून केलेले उपाय..

"प्रेग्नंन्सी म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म" असे म्हटले जाते ते काही अंशी हे योग्य आहे. प्रेग्नंन्सीनंतर स्त्रीचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. प्रेग्नंन्सीनंतर स्त्रीच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते. तिला स्वतःचे करुन परत आपल्या बाळाच्या देखील सगळ्या गरजांकडे लक्ष द्यावे लागते. यासगळ्यांत त्या स्त्रीची फारच ओढाताण होते. प्रेग्नंन्सीनंतर स्त्रीचे संपूर्ण आयुष्य जसे  बदलून जाते तसेच तिच्या शरीरातदेखील खूप मोठे बदल होतात. या बदलांना सामोरे जात असताना स्त्रीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

या बाळंतपणाच्या काळात  इतके शारीरिक बदल अनुभवते जेवढे तिने आजवरच्या आयुष्यात अनुभवलेले नसतात. हे बदल गरोदरपणाच्या स्थितीच्या अनुकूलतेनुसार होत असतात पण याचा मानसिक व शारीरिक परिणाम सुद्धा स्त्री वर मोठ्या प्रमाणावर होतो. बाळंपणानंतर अचानक वजन वाढणे, स्तन लूज पडणे, थकवा जाणवणे, स्किन खराब होणे यांसारख्या असंख्य समस्यांमधून स्त्रीला जावे लागते. बॉलिवूडमधील नुकतीच आई झालेल्या आलियाने प्रेग्नंन्सी नंतर आपल्या स्किनची काळजी कशी घ्यावी याबाबतीत नवमातांसाठी खास टीप्स शेअर केल्या आहेत. आपली स्किन पूर्ववत करण्यासाठी नवमातांनी या टीप्सचा जरुर वापर करावा(Alia Bhatt Reveals Her Routine For Glowing Skin Post Delivery).

नक्की काय उपाय करता येऊ शकतो ?
 
१. स्किन क्लीनझरचा वापर करा :- प्रेग्नंन्सी नंतरच्या आपल्या स्किन केअर रुटीन बद्दल सांगताना आलिया सांगते, सकाळी झोपेतून उठल्यावर ती सर्वप्रथम स्किन क्लिन्झरने आपलच्या चेहऱ्याची स्किन स्वच्छ करते. 

२. टोनरचा वापर करा :- त्यानंतर आपल्या स्किनवर ती टोनरचा वापर करते टोनरमुळे प्रेग्नन्सीनंतर चेहऱ्याची लूज पडलेली स्किन टाईट होण्यास मदत मिळते. बाजारांत अनेक ब्रॅंड्सचे वेगवेगळ्या प्रकारचे टोनर सहज उपलब्ध होतात. फक्त हे टोनर विकत घेताना आपल्या स्किनला सूट होईल अशा पद्धतीचेच टोनर विकत घ्यावे.      

३. सिरमचा वापर करा :- टोनर नंतर स्किनवर सिरम लावण्याचा सल्ला आलिया देते. सिरम लावल्याने आपली स्किन बराच काळ हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. सिरम आपल्या स्किनचे संरक्षण कवच बनून स्किनची काळजी घेते. सिरमचा योग्य वापर केल्याने आपली स्किन मऊ व चमकदार होण्यास मदत मिळते. 

४. मॉइश्चरायझर वापरा :- सिरम लावून झाल्यानंतर आलिया आपल्या स्किनवर एकदम लाईट व स्किनला सूट होणारे मॉइश्चरायझर वापरण्याचा सल्ला देते. लाईट मॉइश्चरायझरचा वापर करावा जास्त हेव्ही मॉइश्चरायझर वापरणे टाळावे. जर आपण स्किनपेक्षा जास्त हेव्ही मॉइश्चरायझर वापरले तर दिवसभरात आपली स्किन ऑयली होऊन चिकट होऊ शकते म्हणून दिवसा एकदम लाईट मॉइश्चरायझरचा वापर करावा. जर आपण एकदमच थंड प्रदेशात राहत असाल तरच हेव्ही मॉइश्चरायझरचा वापर करावा. 

५. सनस्क्रीनचा वापर :- सगळ्यांत शेवटी आलिया आपल्या स्किनवर सनस्क्रीन लावायला कधीच विसरत नाही. घराबाहेर पडण्याआधी प्रखर सूर्यकिरणांपासून आपल्या स्किनचे संरक्षण करण्यासाठी आलिया स्किनला आवर्जून सनस्क्रीन लावते. बाजारांत विविध प्रकारचे सनस्क्रीन विकत मिळतात परंतु आपल्या स्किनच्या प्रकारानुसार किंवा स्किनला सूट होणारेच सनस्क्रीन वापरावे. दिवसातून प्रत्येक ३ ते ४ तासांनंतर स्किनवर सनस्क्रीन लावण्याचा सल्ला आलियाने सर्वांसोबत शेअर केला आहे.

Web Title: How to take care of skin after pregnancy? Alia Bhatt says the solution she took to keep her skin healthy..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.