प्रेग्नंसीचा कालावधी प्रत्येक महिलेच्या आयुष्यात महत्वाचा असतो. यादरम्यान शरीरात वेगवेगळे बदल जाणवतात. प्रेग्नंसीदरम्यान महिलांनाआरोग्यविषयक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रेग्नंसी एक स्थिती असते ज्यावेळी शरीरात पोषक घटकांची कमतरता जाणवू लागते. (Indian Woman Pregnancy Advertisement) यातीलच एक म्हणजे लोहाची कमतरता. गर्भावस्थेत अनेक महिलांना लोहाच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. यामुळे महिला आणि बाळावर वाईट परिणाम होतो. (Viral ad on indian woman pregnancy advertisement urged mother to include iron diet)
'प्रोजेक्ट स्त्रीधन'नं अलिकडेच भारतीय महिलांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी एक जाहिरात प्रसारित केली आहे. यात गर्भावस्थेदरम्यान होणारी डोहाळ जेवणाची परंपरा दाखवण्यात आली आहे. या जाहिरातीत महिलांना सोन्या चांदीचे दागिने न घालता लोहाची कमरता पूर्ण करणाऱ्या पदार्थांचे दागिने घातले आहेत. या व्हिडिओत महिलांच्या शरीरातील लोहाच्या कमतरतेबाबत भाष्य केले आहे.
लोहाची कमरता एनिमियाचे मुख्य कारण आहे. कोणत्याही महिलेला एनिमिया झाल्यास बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. यात जाहिरातील महिलेच्या गळ्यात चेरी, डाळींब, मका, बेरीजचे दागिने तुम्ही पाहू शकता. या पदार्थांच्या सेवनानं शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येऊ शकते.
भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटतंच नाही? तब्येत बिघडण्याआधी जाणून घ्या जास्त भात खाण्याचे तोटे
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षात भारतातील अनेक राज्य आणि केंद्र शासिक प्रदेशात महिला आणि बालकांमध्ये एनिमियाच्या प्रकरणात वाढ होत आहे २०१९ मध्ये झालेल्या एका सर्वेनुसार ६८.४ टक्के मुलं आणि ६६.४ महिला एनिमियानं पीडित होत्याय तर २०१६ मध्ये हे प्रमाण ३५.७ आणि मुलाचं प्रमाण ४६.१ होतं.