Join us   

प्रसूतीनंतर पोट बांधण्याची जुनी पद्धत योग्य की अयोग्य? प्रसूती तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 4:12 PM

Method of Binding Belly after Delivery प्रसूतीनंतर महिलेचं शरीर पूर्णपणे बदलून जातं. विशेषतः ओटीपोट प्रचंड वाढतं. ते कमी करण्यासाठी एब्‍डोमिनल बाइंडिंग ठरेल उपयुक्त..

आई होणे ही भावना एका महिलेसाठी अविस्मरणीय क्षणांपैकी एक असते. नऊ महिने एका जीवाला ती आपल्या उदरात वाढवते. अत्यंत वेदना आणि त्रास सहन करून ती एका गोंडस बाळाला जन्म देते. या काळात तिच्या शरीरात अनेक बदल घडतात. एक जिवाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तिच्यात असंख्या बदल होत असतात.

गर्भधारणेनंतर महिलांना केस गळणे, कमकुवत मूत्राशय, वाढलेलं वजन इत्यादी असे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यापैकी एक समस्या म्हणजे पोटाचा आकार वाढणे. गर्भधारणेनंतर महिलांच्या पोटावर भरपूर चरबी जमा होते. आणि ती कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करताना दिसून येतात.

मदर्स लॅप IVF सेंटरचे वैद्यकीय संचालक आणि IVF तज्ञ डॉ शोभा गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर पोटावर कापड बांधल्यास प्रसूतीनंतरचे पोट कमी होण्यास मदत होते. एब्‍डोमिनल बाइंडिंग महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही गर्भधारणेनंतर तुमचे ओटीपोट कमी करण्यासाठी ही पद्धत वापरत असाल तर उपयुक्त ठरेल.

एब्‍डोमिनल बाइंडिंग म्हणजे काय?

यात रोजच्या आंघोळीनंतर ५ ते ६ तासांनी एक लांब सुती कापड किंवा पट्टा आईच्या पोटावर थोडा घट्ट करून बांधला जातो. असे केल्याने ओटीपोटला आराम मिळतो, गर्भाशयाच्या पोकळीतील वात कमी होते आणि पाठदुखीची समस्या देखील नाहीशी होते. ओटीपोट बांधल्याने कमरेला आधार आणि स्तनपान करण्यास आधार मिळतो.

जर तुमची सिझेरियन प्रसूती झाली असेल तर प्रसूतीनंतर लगेचच बेली बाइंडिंग करू नये. या पद्धतीचा अवलंब तेव्हाच केला पाहिजे जेव्हा शस्त्रक्रियेच्या जखमा पूर्णपणे बऱ्या होतील. कारण शस्त्रक्रियेच्या जागेवर दाब दिल्यास हानी होण्याची शक्यता असते. यासह कपड्यांमुळे दुखापत झालेल्या त्वचेला त्रास होऊ शकतो.

एब्‍डोमिनल बाइंडिंग करण्याची योग्य पद्धत

यासाठी सर्वप्रथम 5 ते 6 मीटर लांब सुती कापड घ्या.

पोटाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंत पोटाला बांधा. निदान 4 ते 5 वेळा पोटावर कापड गुंडाळावे.

यानंतर पोटाच्या उजव्या बाजूने कापड बांधा. कापड फार घट्ट बांधू नये. नाहीतर श्वास घेण्यास अडचण होईल. 

ही प्रक्रिया नियमित करावी जेणेकरून ओटीपोट कमी होण्यास मदत मिळेल.

टॅग्स : गर्भवती महिलाहेल्थ टिप्सप्रेग्नंसी