Join us   

Weight gain in pregnancy : गरोदरपणात २५ किलो वजन वाढण्याविषयी करीना कपूर म्हणते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 1:29 PM

Weight gain in pregnancy : गरोदरपणात वजन वाढले तर तो शारीरिक लढा असतोच पण मानसिक जास्त असतो, सांगते करीना कपूर...

ठळक मुद्दे गरोदरपणातील वजनवाढ हा शारीरिक आणि मानसिक लढा असतो, त्यावेळी तुम्ही कठोर राहायला हवे...बाळ झाल्यावर घर, काम, बाळ असे सगळे मॅनेज होत नसेल तर कोणाची मदत घेण्यात काहीच चूक नाही...

प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर-खान Kareena kapoor khan म्हणजे आपली लाडकी बेबो आता दोन मुलांची आई आहे. गेल्या काही दिवसांपासून करीना सोशल मीडियावर ती बरीच अॅक्टीव्ह असल्याचे दिसते. आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करत आहे. सैफ अली खान आणि तैमूर आणि जेह या आपल्या दोन मुलांबरोबरचे तिचे खासगी आयुष्यातील काही क्षणही ती शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर अॅक्टीव्ह असलेली करीना आपले कुटुंब आणि मित्रपरिवार यांना किती महत्त्व देते हे आपल्याला समजू शकेल. याशिवायही करीना आपल्या गरोदरपणातील Pregnancy अनुभवांबाबतही Weight gain in pregnancy नेहमी बोलताना दिसते. 

(Image : Google)

नुकताच तिने ट्विंकल खन्ना संस्थापक असलेल्या ट्विक इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या गरोदरपणातील अनुभव शेअर केले. यावेळी टशन चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खान आणि तिची झालेली भेट, आपल्या खाण्याच्या सवयी आणि डाएटविषयी तिने भरभरुन सांगितले. य़ाचवेळी ट्विंकलने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आपले वजन गरोदर असताना २५ किलोंनी वाढल्याचे करीना म्हणाली. हे झेपणे आपल्याला शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही काहीसे अवघड असते असे तिेने सांगितले. आपले वजन इतके वाढले आहे याचा मनावर ताण आला होता असेही तिने सांगितले. पण त्या काळात आपण स्ट्रॉंग राहणे गरजेचे असल्याचेही ती म्हणाली. मात्र या सगळ्या काळात आपल्यासोबत आपली डायटीशियन ऋजूता असल्याचे करीना म्हणाली. तिने सांगितलेले डाएट रुटीन मी कायमच काटेकोरपणे पाळते असे करीना म्हणाली. आपण घरात स्वयंपाक करत नसल्याचेही तिने यावेळी कबूल केले.

(Image : Google)

दोन मुले असताना त्यांचे सगळे कसे मॅनेज करते, घरात मदतीला एखादी मावशी आहे का असेही ट्विंकलने करीनाला विचारले. तेव्हा हो सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने मॅनेज करायच्या असतील तर मदत लागणारच. त्यामुळे मावशींच्या मदतीनेच मी मुले, घरातील इतर गोष्टी आणि माझी कामे मॅनेज करु शकते असे ती म्हणाली. मी रोबोट किंवा सूपर मॉम नाहीये, मला तसे मिरवायचेही नाही आणि त्यासाठी कोणी माझ्या डोक्यावर मुकूटही घालणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला मदतीची गरज असेल तर ती तुम्ही घ्यायला हवी , त्याच काहीच चूक नाही असे सैफही तिला सांगत असल्याचे ती म्हणाली.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सप्रेग्नंसी