2021 हे वर्ष करीना कपूर खान आणि तिच्या परिवारासाठी एक नवीन आनंद घेऊन आलं. वर्षाच्या दुसर्या महिन्यात म्हणजेच 21 फेब्रुवारी रोजी करीनाने दुसर्या मुलाला जन्म दिला. करीनाची पहिली डिलिव्हरी सिझेरियन ऑपरेशनने झाली होती आणि तिने एका मुलाखतीत मुलाला सांगितले होते की प्रसूतीच्या वेळी तिला चिंता होती, त्यामुळे तिला सी-सेक्शन करावे लागले. करीनाची दुसरी डिलिव्हरी नॉर्मल झाली की सिझेरियन झाली की हे बर्याच लोकांना माहिती नाही.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर पहिली डिलिव्हरी सी-सेक्शनने केली असेल तर पुढील डिलिव्हरीदेखील सी-सेक्शननेच करावी लागेल. असेच काहीसे करीनाच्या बाबतीतही घडले आहे. करीना कपूरची पहिली डिलिव्हरी सिझेरियन होती आणि यावेळीही तिला ऑपरेशनमधूनच मुलाला जन्म द्यावा लागला. करीनाच नाही तर प्रत्येक महिलेला पहिल्या डिलिव्हरी ऑपरेशननंतर दुसऱ्यावेळी नॉर्मल डिलिव्हरी व्हायला हवी असं वाटत असतं. पहिल्या सिजेरियननंतर र दुसऱ्यावेळी नॉर्मल डिलीवरीचा चान्स किती असतो याबाबत गायकोलॉजिस्ट सोनिया चावला यांनी एनबीटीला अधिक माहिती दिली आहे.
डॉक्टर काय सांगतात?
पहिल्या डिलिव्हरी ऑपरेशननंतर दुसरी डिलिव्हरी सामान्य होऊ शकते असे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनिया चावला सांगतात. डॉक्टर सोनिया म्हणतात की उच्च जोखीम गर्भधारणा, मुलाचे डोके योनीच्या दिशेने खाली जात नाही किंवा जर गर्भधारणेत खूप कॉम्पिकेशन्स असेल तर ऑपरेशन दुसऱ्यांदाही करावे लागते. जर अशी कोणतीही समस्या नसेल तर महिलेची सामान्य प्रसूती केली जाऊ शकते.
या व्यतिरिक्त, डॉक्टर सोनिया असे म्हणतात की काहीवेळा प्रसूतीच्या वेळी अचानक कॉम्पिकेशन्स झाल्यासही सिझेरियन ऑपरेशन निवडले जावे. डॉक्टर सोनिया म्हणतात की गर्भधारणेदरम्यान महिला असे काही करू शकत नाहीत जेणेकरून दुसऱ्यादा ऑपरेशन करण्याची परिस्थिती टाळता येईल. या गोष्टींवर निर्णय अवलंबून असतो
दोन गर्भधारणांमधील अंतर लक्षात घेतलं जातं. सिजेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरीसाठी दोन प्रेंग्नेंसीमध्ये कमीत कमी १८ महिन्यांचा गॅप ठेवावा लागतो. सिझेरियननंतर नवव्या महिन्यात बाळाचे वजनदेखील सामान्य डिलिव्हरीसाठी लक्षात घेतले जाते. याशिवाय मुलाची स्थिती देखील महत्त्वाची आहे. सामान्य डिलिव्हरीसाठी, बाळाचे डोके योनीच्या दिशेने खाली असले पाहिजे. शरीराचा पेल्विक पार्ट बाळाला बाहेर येण्यासाठी तयार असणे देखील महत्वाचे आहे. याशिवाय दुसरी नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी पहिल्या डिलीव्हरीचे टाकेसुद्धा पाहिले जातात.
करिना कपूरने पहिल्यांदाच दाखवला बाळाचा चेहरा
मदर्स डेचे औचित्य साधत बेबोने आपल्या दोन्ही मुलांचा फोटो शेअर केला. बेबोने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या लहान मुलाचा चेहरा दिसत आहे. या फोटोमध्ये तैमूर आपल्या लहान भावाला मांडीवर घेऊन बसल्याचे दिसतेय. (Kareena Kapoor Shares First Picture of Her Baby Boy)
या फोटोला बेबोने दिलेले कॅप्शनही लक्षवेधी आहे. ‘आशेवरच जग कायम आहे आणि हे दोघंही एका चांगल्या दिवसासाठीची आशा मला देतात. तुम्हा सर्व सुंदर आणि भक्कम मातांना मदर्स डेच्या शुभेच्छा! विश्वास ठेवा,’ असे तिने लिहिले आहे. करिनाने याआधी तिच्या लहान मुलाचे काही फोटो शेअर केले होते. पण यात बाळाचा चेहरा दिसणार नाही, याची काळजी घेतली होती.
काही दिवसांपूर्वीच करिनाचे वडील रणधीर कपूर यांच्या अकाऊंटवरुन एका बाळाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांना दोन फोटो कोलाज करुन फोटो पोस्ट केला मात्र काहीच वेळात ही पोस्ट डिलीट केली गेली. हा फोटो करिनाच्या लहान मुलाचा होता, अशी चर्चा यावेळी रंगली होती.
2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. आता या नव्या पाहूण्याचं नाव काय ठेवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.