Join us

गरोदरपणात अंगावर पांढरं पाणी जाणं नॉर्मल की धोक्याचं? डॉक्टर सांगतात, डिस्चार्ज होत असेल तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 18:26 IST

Pregnancy White Discharge : अंगावर पांढरं जात असेल तर गरोदरपणात काय काळजी घ्यायला हवी?

गरोदरपणात (Pregnancy) व्हजायनल डिस्चार्जमध्ये बदल होत जातात. रंग, टेक्स्चर आणि वॉल्यूमध्येही बदल होतो. व्हजायनल डिस्चार्जला प्रेग्नंसीच्या सुरूवातीची लक्षणं मानलं जातं. यात बदल  होणं अनेकदा सामान्य असते तर अनेकदा इन्फेक्शनचं  कारण असते. (Pregnancy White Discharge) नऊ महिन्यांच्या कालावधीत महिलांना वेगवेगळ्या बदलांमधून जावे लागते. या नऊ महिन्यांमध्ये योनीतून पांढरा डिस्चार्ज झाल्यानंतर बऱ्याच महिलांना चिंतेत असतात किंवा असा  स्त्राव का होतो असा प्रश्न त्यांना पडतो. स्त्रीरोगतज्ज्ञ लायन अल रहमानी यांनी बेबी सेंटर या वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

डॉक्टर सांगतात की, ''योनी नेहमी पुढून मागे स्वच्छ करा. घामाने भिजलेले कपडे त्वरीत बदला. जर तुमच्या योनीत जळजळ होत  असेल तर घट्ट पॅन्ट, सिंथेटीक कपडे वापरू नका. बबल बाथ, सुगंधित पॅड, सुगंधित टॉयलेट पेपर, स्त्री स्वच्छता स्प्रे आणि सुगंधित साबणाचा वापर करू नका. स्पॉटींग किंवा रक्तस्त्राव होत असेल तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.''

पांढरं पाणी काय असते? (What Is White Discharge)

गर्भाशय  ग्रीवा आणि व्हजायनामध्ये पांढऱ्या रंगाचा एक तरल पदार्थ तयार होतो. जो शरीरातील घाणेरडे घटक बाहेर काढण्याचे काम करतो. असं तर यामुळे व्हजानया स्वच्छ राहण्यास मदत होते. गर्भावस्थेच्या तिसऱ्या तिमाहित व्हजायनल डिस्चार्ज वाढतो. पांढरा, जाड, चिकट, दुर्गंध नसलेल्या डिस्चार्ज बाहेर येणं खूपच सामान्य आहे. 

वॉक करता तरी वजन कमी होईना? १ किलो घटवण्यासाठी किती चालायचं पाहा-पटकन बारीक व्हाल

प्रेग्नंसीत पांढरे पाणी बाहेर का येते?

गर्भावसस्थेच्या प्रत्येक तिमाहीत महिलांच्या योनीतून पांढरे पाणी बाहेर येते. काही महिलांना ही समस्या जास्त होते तर काहींना कमी. योनीतून पांढरे पाणी बाहेर येण्याच्या अवस्थेला ल्युकोरिया असंही म्हणतात. गरोदरपणात एस्ट्रोजनचा स्तर वाढतो ज्यामुळे पेल्विक भागात रक्त प्रवाहात वाढ होते. अधिक रक्त प्रवाह झाल्याने शरीरातील म्यूकस पेशी उत्तेजित होतात.  ज्यामुळे प्रेग्नंसीच्या सुरूवातीला आणि या   दरम्यान व्हजायनल डिस्चार्ज अधिक प्रमाणात होतो.  यामुळे बर्थ कॅनलची संक्रमणापासून सुरक्षा होते आणि बॅक्टेरिया संतुलित राहतात.

जास्त प्रमाणात पांढरे पाणी आल्यास काय करावे?

१) जर प्रेग्नंसीदरम्यान भरपूर पांढरे पाणी बाहेर येत असेल किंवा त्यातून दुर्गंध येत असेल तर हे इन्फेक्शनचे संकेत असू  शकतात. डॉक्टर एंटीबायोटीक किंवा इतर कोणतीही औषधं देऊ शकतात. प्रेग्नंसी दरम्यान योनी निरोगी ठेवण्यासाठी टॅम्पोनचा वापर करू नका.

१ कप रव्याचा झटपट करा पांढरा ढोकळा; १० मिनिटांत बनेल मार्केटसारखा मऊ, चवदार ढोकळा

२) आपल्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये केमिकल्सयुक्त पदार्थांचा वापर करू नका. योनीच्या भागात ओलसरपणा राहू देऊ नका. सुती अंडरवेअरचा वापर करा.

३) टाईट जिन्स किंवा नायलॉन कपडे वापरू नका. संतुलित आहार घ्या. अधिक प्रमाणात साखरेचे सेवन करू नका. कारण यामुळे यीस्ट  इन्फेक्शनचा धोका वाढतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सप्रेग्नंसीगर्भवती महिला