Lokmat Sakhi >Health >Pregnancy > पोटावरची उभी रेघ, गरोदरपणात या समस्येचा त्रास अनेकींना घाबरवतो; त्यावर उपाय काय? कशाने होतो हा बदल

पोटावरची उभी रेघ, गरोदरपणात या समस्येचा त्रास अनेकींना घाबरवतो; त्यावर उपाय काय? कशाने होतो हा बदल

गरोदरपणात शरीरात अनेक बदल होतात. पण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे घाबरुन  जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नसते. गरोदरपणात होणाऱ्या अनेक बदलांपैकीच एक बदल म्हणजे लिनी अनायग्र. अर्थात पोटावरची उभी काळी रेघ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 04:29 PM2022-01-04T16:29:00+5:302022-01-04T17:54:55+5:30

गरोदरपणात शरीरात अनेक बदल होतात. पण शरीरात होणाऱ्या बदलांमुळे घाबरुन  जाण्याची किंवा काळजी करण्याची गरज नसते. गरोदरपणात होणाऱ्या अनेक बदलांपैकीच एक बदल म्हणजे लिनी अनायग्र. अर्थात पोटावरची उभी काळी रेघ.

Linea Nigra: The vertical line on the abdomen skin. Is this a problem in pregnancy ? or It's Normal? Narika | पोटावरची उभी रेघ, गरोदरपणात या समस्येचा त्रास अनेकींना घाबरवतो; त्यावर उपाय काय? कशाने होतो हा बदल

पोटावरची उभी रेघ, गरोदरपणात या समस्येचा त्रास अनेकींना घाबरवतो; त्यावर उपाय काय? कशाने होतो हा बदल

Highlightsगरोदरपणात दुसऱ्या तिमाहीत होणाऱ्या त्वचा बदलांपैकी एक बदल म्हणजे लिनी अनायग्रा.पोटावरच्या काळ्या ठसठशीत रेघेमुळे घाबरुन जाण्याचं कारण नसतं.ही रेघ बाळंतपणानंतर पुसट होते, काहींच्या बाबतीत ही रेघ कायमस्वरुपी खूण म्हणून राहाते.

गरोदरपणात शरीरात अनेक बदल झालेले लक्षात येतात. काही बदल आश्चर्यचकित करतात, काही बदल आपल्याला आवडतात, हवेहवेसे वाटतात तर काही बदल इतके अचानक होतात की आपण सावध होतो. गरोदरपणात होणारा कुठलाही बदल हा गरोदरपणाच्या टप्प्यातला एक भाग असतो, जो नि:संशय सामान्य असतो. अशाच बदलांपैकी एक दिसणारा बदल म्हणजेच लिनी अनायग्रा.

लिनी अनायग्रा म्हणजे काय?

लिनी अनायग्रा म्हणजे गरोदरपणात पोटावर नाभीपासून जननेद्रियापर्यंत एक रेघ दिसते. खरंतर ही रेघ गरोदरपणाच्या आधीपासून असते पण ती ठळक नसते. पण गरोदरपणात विशेषत: दुसऱ्या तिमाहीत ही रेघ जास्तच ठळक दिसायला लागते. ही एकदम सामान्य स्थिती आहे. बाळंतपणानंतर या रेघेचा ठसठशीतपणा कमी होऊन रेघ पुसट होते.  काहींच्या बाबतीत पोटावरची ही ठसठशीत रेघ कायमची खूण म्हणून राहाते. पण म्हणून हे काहीतरी विचित्र आहे असं अजिबातच नाही आणि यात काळजी करण्यासारखंही काहीच नाही. 

Image: Google

लिनी अनायग्रा ठसठशीत का होते?

गरोदरपणात शरीरात प्रोजेस्टेराॅन आणि इस्ट्रोजन हे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात स्त्रवतात. हे हार्मोन्स गरोदरपणासाठी शरीराला  मदत करत असतात, बळ पुरवत असतात आणि पोटातल्या गर्भाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. गरोदरपणातील या हार्मोन्सचं प्रमाणात् स्रवणं आवश्यक असलं तरी त्याचे परिणाम होतात. या हार्मोन्सच्या जास्त स्त्रवण्यामुळे मेलानिन हे हार्मोन जास्त  स्त्रवतं. आणि त्याचाच परिणाम म्हणून गरोदरपणात त्वचा काळवंडते.

लिनी अनायग्रावर काय उपाय?

गरोदरपणात लिनी अनायग्रा म्हणजे पोटाच्या त्वचेवरील काळी रेघ ठसठशीत दिसण्यापासून आपण रोखू शकत नाही. या काळ्या रेघेचा ताण घेण्याची काहीच गरज नाही की यावर तेव्हाच काही वैद्यकीय उपचार करुन घेण्याचीही गरज नसते. संप्रेरकांच्या भूमिकेमुळे गरोदरपणात होणारी ही एक प्रक्रिया आहे. जर कधी बाळंतपणानंतरही ही काळी रेघ तेवढीच ठसठशीत दिसत असली आणि ती तशी दिसायला नको असं वाटत असेल तर त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. पण गरोदपणात किंवा स्तनपानादरम्यान यावर काही त्वचारोगाशी निगडित उपचार  घेण्याचा सल्ला कधीही दिला जात नाही.

तात्पर्य हे,  की लिनी अनायग्रा हा पूर्णपणे गरोदरपणात होणारा सामान्य बदल आहे. बाळांतपणानंतर पोटावरची ही ठसठशीत काळी रेघ पुसट होत जाते.  आणि जर ती पुसट झाली नाही तर तुमची इच्छा असल्यास  त्याबद्दल त्वचारोग तज्ज्ञाचा सल्ला घेता येतो.

विशेष आभार: डाॅ डिम्पल चुडगर ( एम.डी, डी.एन.बी, एफ.सी.पी. एस.डी.जी.ओ, डिप्लोमा इन ॲडव्हान्सड लॅप्रोस्कोपिक सर्जरी ( जर्मनी) फेलोशिप इन रोबोटिक सर्जरी ( यु.एस.ए) 
 

Web Title: Linea Nigra: The vertical line on the abdomen skin. Is this a problem in pregnancy ? or It's Normal? Narika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.