Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळांतपणानंतर कंबरदुखी छळते, कारण गरोदरपण आणि स्तनपानकाळात या २ गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, सावधान..

बाळांतपणानंतर कंबरदुखी छळते, कारण गरोदरपण आणि स्तनपानकाळात या २ गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, सावधान..

"आई गं... ही कंबर ना...." खूप काम झालं की असं वाक्य हमखास एखाद्या तिशी ओलांडलेल्या महिलेकडून  ऐकायला मिळतं. गरोदरपण आणि बाळांतपणात जर 'या' दोन प्रमुख गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना, तर ही कंबरदुखी आयुष्यभर छळत राहते. त्यामुळे सावधान....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 01:38 PM2021-08-03T13:38:22+5:302021-08-03T13:39:31+5:30

"आई गं... ही कंबर ना...." खूप काम झालं की असं वाक्य हमखास एखाद्या तिशी ओलांडलेल्या महिलेकडून  ऐकायला मिळतं. गरोदरपण आणि बाळांतपणात जर 'या' दोन प्रमुख गोष्टींकडे दुर्लक्ष केलं ना, तर ही कंबरदुखी आयुष्यभर छळत राहते. त्यामुळे सावधान....

Lower back pain after childbirth, because neglect of these two things during pregnancy and lactation, be careful. | बाळांतपणानंतर कंबरदुखी छळते, कारण गरोदरपण आणि स्तनपानकाळात या २ गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, सावधान..

बाळांतपणानंतर कंबरदुखी छळते, कारण गरोदरपण आणि स्तनपानकाळात या २ गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष, सावधान..

Highlightsदूध व दुधाचे पदार्थ, नाचणी, कोबी, ब्रोकोली, शेंगदाणे, शेवगा, चीज, पनीर, साजूक तुप, दही हे पदार्थ आहारात वाढवावेत.

कंबरदुखी म्हणजे जवळपास प्रत्येक महिलेला कमी- अधिक प्रमाणात छळणारं दुखणं. कंबरदुखीसाठी बसण्या- उठण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, खाली वाकण्याची आणि ओझं उचलण्याची चुकीची पद्धत किंवा झोपण्याची अयोग्य पद्धत या गोष्टीही कारणीभूत आहेत. पण खासकरून महिलांच्याबाबतीत बोलायचं झाल्यास गरोदरपणात आणि बाळांतपणात काही गोष्टींची योग्य काळजी न घेतली गेल्यामुळे बहुसंख्य महिलांची कंबर आणि पाठ दुखते. 

 

गरोदरपणात जेव्हा बाळाचा आकार वाढू लागतो, तेव्हा आपोआपच महिलांची चालण्याची, उभे राहण्याची, बसण्याची पद्धत बदलते. जसे जसे दिवस भरत जातात, तसतसा पाठीच्या मणक्याच्या सर्वात खालच्या भागावर ताण येऊ लागतो आणि तिथूनच कंबरदुखीची सुरूवात होते. म्हणूनच गरोदरपणाच्या काळात आणि डिलिव्हरी झाल्यानंतरही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कंबरेचे आणि पाठीचे काही व्यायाम अवश्य केले पाहिजेत, असे अस्थिरोगतज्ज्ञ सांगतात.

 

हे आहे कंबरदुखीचे मुख्य कारण
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा अभाव

- बहुसंख्य महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आढळून येते. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम अतिशय आवश्यक आहे. बाळाचे जेव्हा ब्रेस्ट फिडिंग सुरू असते, तेव्हा तर आईला कॅल्शियमची खूप जास्त गरज असते. बाळाला योग्य प्रमाणात कॅल्शियमचा पुरवठा व्हावा, यासाठी आपोआपच आईच्या शरीरातून कॅल्शियम शोषूण घेतले जाते आणि ते बाळाला पुरविले जाते. नेमक्या याच काळात अनेक जणी कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याकडे दुर्लक्ष करतात. याचाच परिणाम म्हणजे कॅल्शियमअभावी कंबरदुखी मागे लागते.

 

- व्हिटॅमिन डी देखील हाडांना मजबूती देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे गरोदरपणात आणि बाळांतपणातही डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी च्या गोळ्या अवश्य घ्याव्या. 

कंबरदुखी कमी करण्यासाठी हा आहार घ्या...
दूध व दुधाचे पदार्थ, नाचणी, कोबी, ब्रोकोली, शेंगदाणे, शेवगा, चीज, पनीर, साजूक तुप, दही हे पदार्थ आहारात वाढवावेत.

 

हे काही उपाय करून पहा
१. बसताना आणि उभे राहताना ताठ उभे रहा. चुकीच्या पद्धतीमुळे कंबर दुखू शकते.
२. खूप काळ ताठ बसून राहिल्यानंतर कंबरेला थोडे रिलॅक्स करा.
३. बसताना कंबरेला आधार देण्यासाठी छोट्या उशीचा किंवा मग कपड्याच्या गुंडाळीचा वापर करा. 
४. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही व्यायाम अवश्य करा.
५. खाली पडलेली एखादी वस्तू उचलायची असल्यास कंबरेतून खाली वाकू नका. पाठ ताठ ठेवून खाली बसा आणि मग ती वस्तू उचला.

 

Web Title: Lower back pain after childbirth, because neglect of these two things during pregnancy and lactation, be careful.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.