Lokmat Sakhi >Health >Pregnancy > स्ट्रेचमार्क दिसले तर काय बिघडलं, पोटावरचे स्ट्रेचमार्कस दिसल्यावर मलायकाचा चाहत्यांना थेट सवाल...

स्ट्रेचमार्क दिसले तर काय बिघडलं, पोटावरचे स्ट्रेचमार्कस दिसल्यावर मलायकाचा चाहत्यांना थेट सवाल...

Malaika Arora Stretchmark's : मलायकाच्या फॅशनमुळे नुकतेच तिचे स्ट्रेचमार्क कॅमेरात कैद झाले आणि त्यावर पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 08:38 PM2022-09-06T20:38:27+5:302022-09-06T20:42:08+5:30

Malaika Arora Stretchmark's : मलायकाच्या फॅशनमुळे नुकतेच तिचे स्ट्रेचमार्क कॅमेरात कैद झाले आणि त्यावर पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली.

Malaika Arora Stretchmark's : What's bad if you see stretch marks, Malaika directly asked fans after seeing stretch marks on her stomach... | स्ट्रेचमार्क दिसले तर काय बिघडलं, पोटावरचे स्ट्रेचमार्कस दिसल्यावर मलायकाचा चाहत्यांना थेट सवाल...

स्ट्रेचमार्क दिसले तर काय बिघडलं, पोटावरचे स्ट्रेचमार्कस दिसल्यावर मलायकाचा चाहत्यांना थेट सवाल...

Highlightsही पहिलीच वेळ नसून याआधीही मलायकाला तिच्या स्ट्रेचमार्कवरुन ट्रोल करण्यात आले आहे.विशेष म्हणजे स्ट्रेचमार्क असले तरी मलायकाला त्याची अजिबात लाज वाटत नाही.

आपल्या सौंदर्याच्या संकल्पना काहीशा वेगळ्या असतात, काही गोष्टी त्या व्याख्येत बसत नाहीत. प्रामुख्याने स्त्रियांच्या बाबतीत तर ही प्रमाणे जास्त लावली जातात. एखादी स्त्री जाड असेल, ती सावळी असेल किंवा तिच्या शरीरावर कसल्या खुणा असतील तर आपला त्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. महिलांचे लग्न झाले, त्यांना मूल झाले की तर त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होतात. मूल झाल्यावर पोटाचा भाग वाढणे, वजन वाढणे, शरीरावर स्ट्रेच मार्क राहणे या गोष्टी अगदीच स्वाभाविक असतात. मात्र आपल्याला वाटते या समस्या आपल्यालाच असतात. पण बॉलिवूड अभिनेत्रींनाही या समस्या भेडसावतात. मलायकाच्या फॅशनमुळे नुकतेच तिचे स्ट्रेचमार्क कॅमेरात कैद झाले आणि त्यावर पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली (Malaika Arora Strechmarks). 

(Image : Google)
(Image : Google)

अभिनेत्री या समस्यांना कशा सामोऱ्या जात असतील याबाबत आपण नेहमीच उत्सुक असतो. करीना कपूर, मीरा राजपूत यांसारख्या बऱ्याच अभिनेत्री आपले गर्भधारणेतील किंवा त्यानंतरचे अनुभवही आपल्यासोबत शेअर करतात. त्यामुळे आपल्याच बाबतीत एखादी गोष्ट घडते असे नाही तर अभिनेत्रींनाही आपल्यासारख्याच समस्या असतात याचा आपल्याला अंदाज येतो. मलायका अरोराही कायम फिटनेसबाबत काही ना काही शेअर करत असते. चाहते तिच्याकडून प्रोत्साहन घेत व्यायाम करण्याचा प्रयत्न करतात. मलायकाच्या फॅशनबाबतही सिनेसृष्टीत बरीच चर्चा असते. या वयातही तिचे सौंदर्य आणि फिटनेस चांगला असल्याने तिचे कौतुक होताना दिसते. आता ४८ वर्षांच्या असलेल्या मलायका अरोराने १९९८ मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले होते. या दोघांना अरहान खान हा एक मुलगाही आहे. २०१७ मध्ये हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. आता मलायका प्रसिद्ध अभिनेता अर्जून कपूरसोबत रिलेशनमध्ये असल्याचे आपल्याला माहित आहे. 

नुकताच मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्या पोटावरील स्ट्रेचमार्क दिसत आहेत. यावेळी मलायकाने व्हाईट शर्ट, स्पोर्ट ब्रा आणि पांढऱ्या रंगाची पँट घातली असून ती यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. नेटीझन्सनी तिच्या पोटावर दिसणाऱ्या स्ट्रेचमार्कवरुन तिला ट्रोल केले आहे. विशेष म्हणजे स्ट्रेचमार्क असले तरी मलायकाला त्याची अजिबात लाज वाटत नाही. उलट यात लाजण्यासारखे काय आहे असे म्हणत मलायका कायमच तिच्या आवडीची फॅशन कॅरी करताना दिसते. मलायकाला ट्रोल करताना काहींनी बुढ्ढी म्हणत तिची चेष्टा केली तर काहींनी सिनियर सिटीझन म्हणत तिची खिल्ली उडवली. मात्र असे असूनही मलायकाचे स्ट्रेचमार्क मात्र कमी झालेले नाहीत. गर्भधारणेनंतर राहणारे हे मार्क्स लपवायची गरज काय असा सवाल मलायका विचारते. हे तिच्यासोबत घडण्याची ही पहिलीच वेळ नसून याआधीही मलायकाला तिच्या स्ट्रेचमार्कवरुन ट्रोल करण्यात आले आहे.  

Web Title: Malaika Arora Stretchmark's : What's bad if you see stretch marks, Malaika directly asked fans after seeing stretch marks on her stomach...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.