Join us   

मीरा राजपूतने विशीत तर दीपिका पादुकोणने पस्तीशी उलटल्यावर आईपण स्वीकारलं, आई होण्याचं योग्य वय कोणतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 6:42 PM

Right Age To Become A Mother : सध्या मूल जन्माला घालण्याचं योग्य वय होणं, कोणत्या वयात आई बनायला हवं, अशा चर्चा बऱ्याच होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि शहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत (Meera Rajput) या दोघींच्या  प्रेग्नंसीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.  मीरा राजपूत ही  वयाच्या २१ व्या वर्षी आई बनली होतील तर दीपिका पादुकोण वयाच्या  ३८ व्या  वर्षी आई होत आहे. यामुळे सध्या मूल जन्माला घालण्याचं योग्य वय होणं, कोणत्या वयात आई बनायला हवं, अशा चर्चा बऱ्याच होत आहेत. (Right Age To Become A Pregnant)

मेडिकल सायंसनुसार आई होण्याचं कोणतंही वय निश्चित नसते. महिला  २० ते ४० वर्ष वयोगटात कधीही गर्भधारणा करू सकतात. हंगरीच्या बुडापेस्टमध्ये सेमेल्विस युनिव्हर्ससिटीच्या संशोधकांनी खुलासा केला की मुलं जन्माला घालण्याचं सगळ्यात उत्तम वय  २३ ते ३२ हे आहे. कारण या वयात होणाऱ्या बाळात निर्माण होणारे दोष टाळले जाऊ शकतात.

रिसर्चनुसार आई होण्याचं योग्य वय कोणतं (Which is Best Age To Become a Mother)

हा अभ्यास जर्नल बीजेओजी एन इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स एंड गायनेकोलॉजीमध्ये प्रकाशित झाला आहे. (Ref) २३ ते ३२ वर्ष वयोगटातल महिलांच्या शरीरातील अंड्यांची क्वालिटी सगळ्यात चांगली असते आणि गर्भधारणेची संभावनाही अधिक असते. 

योग्य वयात मूल न झाल्यास काय समस्या उद्भवू शकतात?

१) अंड्यांची क्वालिटी  या वयात महिलांच्या अंड्यांची गुणवत्ता चांगली असते ज्यामुळे हेल्दी मुलं जन्माला घालण्याची शक्यता जास्त असते. जसजसं वय वाढत जातं तसतशी याची गुणवत्ता कमी होते.

२) या वयात महिलांचे शारिरीक स्वास्थ उत्तम असते ज्यामुळे गर्भावस्था आणि प्रसव या दोन्ही क्रिया सोप्या होतात. महिलांना प्रेग्नंसीसंदर्भातील ९ महिन्यातील त्रास कमी होतात काहींना जाणवतही नाहीत.

माधुरी दीक्षित सांगतेय तिच्या घरातली कांदाभजीची खास रेसिपी; पावसाळ्यात करा चहा-भजीचा बेत

३) या वयात महिला आर्थिक आणि मानसिक स्वरूपात मुलांची काळजी घेण्यासठी तयार असतात. वयाच्या  ३५ नंतर गर्भपाताचा धोका वाढतो. क्रोमोसोमल असामान्यता जसं की डाऊन सिंड्रोमचा धोका वाढतो. गर्भावस्थासंबंधित समस्या जसं की डायबिटीस, हाय बीपी या आजारांचा धोका वाढतो. 

दीपिका पादूकोण

दीपिका पादूकोण वयाच्या ३८ व्या वर्षी आई होत आहे. हे वय गर्भधारणेसाठी आदर्श असलेल्या वयापेक्षा थोडे जास्त आहे. पण आजकाल मेडीकल सायंन्स इतके विकसित झाले आहे की एडवांस टेक्नोलॉजीच्या मदतीने ३५ वर्षांनंतरही तुम्ही हेल्दी बाळाला जन्म देऊ शकता पण यासाठी स्वत:चे शरीर हेल्दी ठेवणे, इतर ट्रिटमेंट्स खर्चीक असू शकतात.

टॅग्स : हेल्थ टिप्सप्रेग्नंसीगर्भवती महिलादीपिका पादुकोण