Join us   

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 12:03 PM

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो.

ठळक मुद्दे ३० वर्षांपेक्षा कमी वयातील १० पैकी एका महिलेला मिसकॅरेजचा सामना करावा लागतो तर ४५ पेक्षा जास्त वयाच्या १० पैकी ५ महिला या समस्येच्या शिकार होतात. 

गर्भधारणा झाल्यानंतर  २४ आठवड्यांच्या आत गर्भ नष्ट होणं याला वैद्यकिय परिभाषेत मिसकॅरेज असं म्हणतात.  ही स्थितीत आई वडील दोघांसाठीही एखाद्या मानसिक धक्क्यापेक्षा कमी नसते. मिसकॅरेजबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत. मिसकॅरेज नेमकं कोणत्या स्थितीमुळे उद्भवते,  त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. (Miscarriage causes and symptoms)   

गर्भ नष्ट होण्याची किंवा त्याला ईजा पोहोचण्याची अनेक कारणं असू शकतात. पण यासाठी प्रत्येकवेळी  होणाऱ्या बाळाची आईच जबाबदार असेल असं नाही. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये असं दिसून येतं की शेवटची स्टेज येईपर्यंत मिसकॅरेजबाबत आईला काहीही कल्पना नसते. त्यामुळे अचानक गर्भाला धोका पोहोचल्याचं समजताच आईला मानसिक धक्का बसतो. 

साधारणपणे प्रेग्नंसीच्या पहिल्या ३ महिन्यात मिसकॅरेज अनबॉर्न बेबीला उद्भवलेल्या एखाद्या समस्येचा परिणाम असतो. नॅशनल हेल्थ सर्विस (NHS) नं दिलेल्या माहितीनुसार यासाठी भ्रुणातील असामान्य  क्रोमोजोम्सला  जबाबदार ठरवलं जातं.  भ्रणात कमी, जास्त क्रोमोजोम्सची संख्या मिसकॅरेजसाठी कारणीभूत ठरते. कारण अशावेळी भ्रणाचा संपूर्ण विकास होऊ शकत नाही. 

केस फार गळतात; शॅम्पू बदलूनही उपयोग होत नाही? शहनाज हुसैननं सांगितले लांबसडक केसांसाठी उपाय

मिसकॅरेजच्या २ ते ५ टक्के प्रकरणांमध्ये जेनेटिक्सला दोषी ठरवलं जातं.  अनेकदा पार्टनरच्या असामान्य क्रोमोजोम्सबाबत माहिती नसल्यानं ही स्थिती उद्भवते. त्यामुळे प्लेसेंटा विकासात समस्या निर्माण होतात. भ्रुणात रक्ताची कमतरता, पोषक घटकांचा अभाव जाणवतो. तर ३ महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मिसकॅरेज होत असेल तर कमकवत गर्भाशय, इंफेक्शन, सेक्शुअल ट्रासंमिशन डिसिस, गर्भाशयाचा आकार, पीसीओएस किंवा फूड पॉयजनिंग हे कारण असू शकतं.  

ऐकावं ते नवलंच! लग्नानंतर तब्बल ४५ वर्षांनी घरात पाळणा हलला; ७० वर्षीय आजींनी दिला चिमुकल्याला जन्म

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सतत गर्भपात होण्याची अनेक  कारणं असू शकतात.  ब्लड क्लोटिंग डिसॉर्डर, थायरॉईडची समस्या, सर्वाकल कमकुवतपणा, इम्यून सेल्सचाही प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. वारंवार असा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जीवनशैलीत बदल करावेत.   

४५ नंतर मिसकॅरेज होण्याची शक्यता जास्त असते.

नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो. ३० वर्षांपेक्षा कमी वयातील १० पैकी एका महिलेला मिसकॅरेजचा सामना करावा लागतो तर ४५ पेक्षा जास्त वयाच्या १० पैकी ५ महिला या समस्येच्या शिकार होतात. 

काय आहेत मिसकॅरेजची लक्षणं

ब्लिडींग किंवा कपड्यांवर रक्ताचे सौम्य, गडद डाग दिसणं हे मिसकॅरेजचं लक्षणं असू शकतं. पण हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात ब्लिडींग किंवा ब्लड स्पॉट खूप साधारण आहे.  अशा स्थितीत घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यायला हवा. ओटीपोटात दुखणं, प्रायव्हेट पार्टसमधून स्त्राव होणं मिसकॅरेजचं लक्षण असू शकते. 

टॅग्स : हेल्थ टिप्समहिलाआरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिला