स्त्रियांमधे आई होण्याचे नैसर्गिक गुण असतात. यामुळे त्या ज्या क्षणी बाळाला जन्म देतात त्या क्षणी त्यांचं आपल्या अपत्याशी नातं जुळतं. पण नेहमी असे होईलच असेही नाही. बाळंतीणीच्या मनाची अवस्था चल-बिचल होऊ शकते, कारण तिने प्रसूती वेदना घेवून नुकताच बाळाला जन्म दिलेला असतो आणि आणि अशा वेळी त्या बाळाशी तिची नाळ घट्ट होईलच असे नाही. मूड स्विंग्स होणे किंवा सुरुवातीला बाळ नावडते होणं काही नवीन नाही.
यात चांगली बाब अशी आहे की जस जसे त्यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारत जाते तसे त्या बाळाशी स्वतःला जुळवून घेऊ लागतात. घट्ट नात स्थापित होण्याकरिता हा कालावधी काही दिवसांचा, किंबहूना काही आठ्वड्यांचा देखील असू शकतो. याबाबत डॉ.अलिफिया बापाई, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ (सैफी हॉस्पिटल) यांनी अधिक माहिती दिली आहे.
कधी-कधी आपण असे बघतो की बाळाकरिता सर्व काही करताना देखील आई मध्ये नकारात्मकता येते. तिच्या हार्मोन्समध्ये बदल होत असतात, तिची भूमिका कधी-कधी निर्विकार होते. ही लक्षणे पहिल्यांदा आई झालेल्या स्त्रियांमध्ये विशेषकरून आढळून येतात. त्या लगेच आपल्या बाळाला समजू शकत नाहीत, की तो का रडतोय किंवा त्याला भूक लागली आहे की पोटात मूरड येत आहे.
अशा परिस्थितित त्या ताण घेतात आणि हा ताण त्यांचा स्वतःवरचा विश्वास कमी करतो, त्या स्वतःबाबतीत सांशक होवू लागतात. त्यांचे मन घटेकत खिन्न होते आणि नैराश्य येते. हे पण मानले जाते की आपल्या बाळाला जवळ घेतल्याने जन्म देताना झालेली कळा आणि वेदनांचा विसर पडतो. पण प्रत्येक आईच्या बाबतीत असे होत नाही. काही जणी आपल्या बाळाला लगेच घेणं टाळतात, त्यांना स्वतःला वेळ हवा असतो, जेणेकरुन त्या सावरु शकतील.
हा काळ असा असतो जेंव्हा बाळंतीणीला कुटुंबाची गरज असते. कुटुंबाने तिच्या अशा वागण्यासाठी तिच्यावर टीका न करता तिला सर्व ठीक असल्याची जाणीव करून देत तिची अशा परिस्थितीतून बाहेर येण्यात मदद केली पाहिजे. तिला सांगायला हवे की नैराश्य किंवा नकारात्मक विचार येणे अगदी स्वाभाविक आहे, आणि त्यात काही गैर नाही.
अचानक निपल्स दुखतात, तर कधी खाज येते? सांगता न येणारा हा त्रास टाळण्यासाठी हे घ्या उपाय
आई आणि बाळाचं नातं जवळीक झाल्यानेही घट्ट होतं. हॉस्पिटलमध्ये आम्ही हे बंध घट्ट करण्याकरिता बाळाला आईच्या छातीशी बिलगू देतो. यामुळे आई आपल्या बाळाला आणि बाळसुद्धा आईला ओळखू लागते . आम्ही लेबर रूममध्येच स्तनपानाकरिता प्रोत्साहित करतो. या सगळ्यांमुळे एकमेकांशी त्यांचा संबंध येतो आणि आई- बाळाचं नातं घट्ट होतं. आम्ही बाळंतीणीशी हितगुजही करतो.
ब्रेस्ट फिडींगच्या काळात स्तन ओघळण्याची भीती वाटते? स्तनांचा आकार बिघडू नये म्हणून ५ टिप्स
कधी कधी सल्लागार समुपदेशन करून त्याचा पाठपुरावाही करतात. क्वचितच अशी वेळ येते जेव्हा मानसशास्त्रज्ञांची गरज भासते. जर लगेच आई आणि बाळाच नातं जुळले नाही आणि त्यात गैरसमजांची भर पडली तर तिला अपराधीपणाची भावना येऊ शकते जे तिला गंभीर नैराश्य आणि मानसिक आजाराकडे घेवून जावू शकते . या काळात बाळंतीणीला समजून घेण्याची, मदतीची आणि सहकार्याची गरज असते.