Lokmat Sakhi >Health >Pregnancy > सेक्सनंतर लघवीला गेल्यानं प्रेग्नंसी टाळता येते? तज्ज्ञ सांगतात हे सत्य की गैरसमज..

सेक्सनंतर लघवीला गेल्यानं प्रेग्नंसी टाळता येते? तज्ज्ञ सांगतात हे सत्य की गैरसमज..

Peeing After Sex : सेक्सनंतर युरीन पास करणं गरेजचं नसतं पण हे फायदेशीर ठरू शकतं.  लघवी केल्यानं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका टळण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:44 PM2022-07-11T12:44:24+5:302022-07-11T13:08:13+5:30

Peeing After Sex : सेक्सनंतर युरीन पास करणं गरेजचं नसतं पण हे फायदेशीर ठरू शकतं.  लघवी केल्यानं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका टळण्यास मदत होते.

Peeing After Sex : Is peeing after intercourse really necessary does it stop pregnancy | सेक्सनंतर लघवीला गेल्यानं प्रेग्नंसी टाळता येते? तज्ज्ञ सांगतात हे सत्य की गैरसमज..

सेक्सनंतर लघवीला गेल्यानं प्रेग्नंसी टाळता येते? तज्ज्ञ सांगतात हे सत्य की गैरसमज..

संभोगानंतर युरिन पास करणं आवश्यक असतं हे आतापर्यंत अनेकदा तुमच्या ऐकण्यात आलं असेल. सेक्शुअल इंटरकोर्सनंतर युरिन पास केल्यानं शरीरातील बॅक्टेरिया निघून जातात. (Sexual Health) असा काहींचा समज असतो. यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन पासून बचाव होतो. खरंच सेक्सनंतर युरिन पास करणं गरजेचं असतं का? न केल्यास आजारांचा धोका असतो का? (Is peeing after intercourse really necessary does it stop pregnancy)

सेक्सनंतर युरिन पास करणं कितपत गरजेचं? (Is peeing after intercourse really necessary)

सेक्सनंतर युरीन पास करणं गरेजचं नसतं पण हे फायदेशीर ठरू शकतं.  लघवी केल्यानं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा धोका टळण्यास मदत होते. (UTI) जेव्हा मुत्रमार्गातून बॅक्टेरिया तुमच्या ब्लॅडरमध्ये प्रवेश करतात तेव्हा ही स्थिती उद्भवते. पुरूषांच्या तुलनेत महिलांचा मुत्रमार्ग मोठा असल्यानं बॅक्टेरिया ब्लॅडरमध्ये सहज प्रवेश करतात. संबंधानंतर युरिन पास केल्यानं बॅक्टिरया बाहेर निघून जातात. 

त्यामुळे या इन्फेक्शनपासून बचाव होऊ शकतो पण युटीआयपासून वाचण्याचा हा फुलप्रुफ उपाय नाही. इंटरकोर्सनंतर जवळपास ३० मिनिटांच्या आत युरीन पास करणं आवश्यक आहे. यामुळे युटीआयचा संभाव्य धोका टाळता येतो. (Is Peeing After Sex Actually That Important)

महिलांनी लघवीला जाणं कितपत गरजेचं?

शरीर संबंधांनंतर महिलांनी लघवीला जाणं गरेजचं असतं. कारण त्यांचा मूत्रमार्ग लहान असतो आणि या ठिकाणी बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो.  संबंधादरम्यान पुरूषांच्या मुत्र मार्गातील बॅक्टेरिया महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये सहज प्रवेश करू शकतात. अशावेळी जर  संबंध ठेवल्यानंतर लघवी केली आणि ती जागा पाण्यानं स्वच्छ केली तर बॅक्टेरिअल इन्फेक्शन पसरण्याचा धोका कमी असतो. 

पुरूषांनी लघवीला  जायला हवं का?

संबंध ठेवल्यानंतर पुरुषांनी लघवी करणे फारसे गरजेचे नाही. कारण त्यांचा मूत्रमार्ग महिलांपेक्षा जास्त मोठा नसतो. त्यामुळे लैंगिक संबंधादरम्यान संसर्गाचा असा विशेष धोका नसतो. अशा स्थितीत लघवी करायची की नाही, हे तुम्ही ठरवू शकता.

संबंधानंतर लघवी केल्यानंतर प्रेग्नेसी टाळता येऊ शकते? (Does peeing after sex prevent pregnancy)

डॉ. गौरी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लघवीला जाणं आणि सेक्शुअल इंटरकोर्स होणं हे दोन वेगळ्या शरीराच्या कार्यप्रणाली आहेत. साधारणपणे महिलांच्या योनीची रचना पाहिली  सगळ्यात वर मुत्र बाहेर येण्यासाठी छोटंस छिद्र असतं. त्याखाली मासिक पाळीची लहानशी जागा असते. त्याला व्हजायनल आऊटलेट असंही म्हणतात. त्यानंतर त्वचेचा भाग (perineal body) मग शेवटी शौचाची जागा असते. हे तिन्ही पार्ट्स वेगवेगळे कार्य करतात. लघवीचे छिद्र एका युरिनच्या बॅगेला जोडलेले असते.  या बॅगेतून दोन नळ्या येतात ज्याला युरेटर म्हणतात.

या दोन नळ्या किडनीशी कनेक्टेट असतात, ही एक वेगळी स्वतंत्र रचना आहे. याऊलट जिथे सेक्सुअल संपर्क होतो म्हणजेच योनी मार्गाचे छिद्र आत गर्भपिशवी आणि गर्भाशयाशी जोडलेले असते. सामान्यतः शरीर संबंध हे योनीमार्गात होतात याद्वारे बाहेर येणारे स्पर्म योनी मार्गात शिरतात. त्यानंतर ते गर्भाशयाच्या मुखाकडे प्रवास करतात.
वीर्य योनीमार्गात गेल्यानंतर व्यक्तीच्या बॉडी टेम्परेचरच्या संपर्कात येतं. त्यावेळी त्या वीर्याचे लिक्विफॅक्शन होते. त्यानंतर स्त्री बीज तयार होण्याचा दिवस असल्यास शुक्राणू त्याला मिळतात.

मग एम्ब्रियो म्हणजेच गर्भ तयार होऊ शकतो. अर्थातच संबंधानंतर लघवी करणं आणि प्रेग्नंसी टाळण्याचा काही संबंध नाही. कारण लघवी करण्याची जागा आणि योनी यांचे मार्ग ( Track) वेगवेगळे असतात हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.
लघवीला गेल्यानंतर सेमीनल फ्लूईल म्हणजेच पातळ द्रवपदार्थ बाहेर येऊ शकतात पण शुक्राणू बाहेर पडतातच असं नाही. अनेकदा तरल पदार्थ बाहेर येण्याआधीच शुकाणू गर्भाशयाकडे गेलेले असू शकतात. त्यामुळे शरीर संबंधानंतर लघवी केल्यानंतर प्रेग्नंसी टाळता येईल, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं ठरतं.

Web Title: Peeing After Sex : Is peeing after intercourse really necessary does it stop pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.