Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण..

बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण..

Health tips: बाळ हवं म्हणून काही प्लॅनिंग (planning for pregnancy) सुरू करण्याच्या विचारात असाल तर या काही चुकीच्या सवयी (lifestyle changes) तुम्ही आताच सोडून द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 03:44 PM2022-02-26T15:44:47+5:302022-02-26T15:45:25+5:30

Health tips: बाळ हवं म्हणून काही प्लॅनिंग (planning for pregnancy) सुरू करण्याच्या विचारात असाल तर या काही चुकीच्या सवयी (lifestyle changes) तुम्ही आताच सोडून द्या..

Planning for a baby? Then you must change these 5 things of your life style before pregnancy | बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण..

बाळ हवं म्हणून प्लॅनिंग करताय, मग तातडीने करा ५ लाइफस्टाइल चेंज! चुकीच्या सवयी घातक कारण..

Highlightsगरोदरपण, बाळंतपण आणि त्यानंतर बाळ आणि तुमची तब्येत या सगळ्या गोष्टी सुखरूपपणे पार पडाव्यात, असं वाटत असेल तर गरोदरपणाच्या आधीपासूनच तब्येतीची काळजी घेतली पाहिजे.

आजकाल  करिअरच्या कोणत्या टप्प्यावर, वयाच्या कितव्या वर्षी आपल्याला बाळ व्हायला हवं, हे अनेक जोडप्यांमध्ये पक्क ठरलेलं असतं. करिअर, आर्थिक बाजू, वय या सगळ्या बाजूंनी विचार करून मग बाळ कधी होऊ द्यायचं हे प्लॅनिंग केलं जातं. एरवी आपण मनमौजीप्रमाणे वागतो. कधीही काहीही खातो, झोपण्याच्या वेळा, व्यायाम, आहार अशी काहीही बंधनं पाळली जात नाहीत.

 

पण पुढच्या काही महिन्यांमध्ये जर बाळ (planning for a baby) होऊ द्यायचा विचार असेल तर आपल्या लाईफस्टाईलमध्ये (lifestyle changes according to pregnancy) असणाऱ्या काही वाईट सवयी लवकरात लवकर सोडून द्या आणि स्वत:ला आहार, व्यायाम, आरोग्य याबाबत थोडी शिस्त लावा, असं डॉ. पायल नारंग सांगत आहेत. 

 

बाळ होण्यासाठी प्लॅनिंग करत असाल तर ....
१. गरोदरपण, बाळंतपण आणि त्यानंतर बाळ आणि तुमची तब्येत या सगळ्या गोष्टी सुखरूपपणे पार पडाव्यात, असं वाटत असेल तर गरोदरपणाच्या आधीपासूनच तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे एकदा संपूर्ण आरोग्य तपासणी करून घ्या आणि sexually transmitted diseases (STDs), मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब असा काही त्रास आपल्याला जडलेला नाही ना, याची खात्री करून घ्या. तपासणीतून असा काही त्रास असल्याचं समोर आलंच तर प्रेग्नन्सीपुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

२. गर्भाचा विकास उत्तम व्हावा, यासाठी आईच्या शरीरात फॉलिक ॲसिडचे (intake of folic acid) प्रमाण उत्तम असणे गरजेचे आहे. त्यामुळे जर पुढच्या एक- दोन महिन्यात प्रेग्नन्सीचा विचार करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलिक ॲसिडच्या गोळ्या सुरू करा.

 

३. आजकाल महिलांमध्येही स्मोकिंग आणि मद्यपान (smoking and drinking) करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तुम्हाला अशी काही सवय असेल, तर ती लगेचच सोडून द्या. यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. प्री मॅच्युअर डिलेव्हरी, गर्भपात, कमी वजनाचं बाळ होण्याची शक्यता वाढते. तसेच बाळामध्ये काही श्वसन विकारही उद्भवू शकतात. त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपान त्वरीत थांबवा. 

 

४. प्रेग्नन्सीच्या काही महिने आधीपासूनच तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे फास्टफूड खाण्याची सवय एकदम कमी करून टाका. पिझ्झा, नुडल्स, सामोसा, पास्ता, फ्रेंच फ्राईज, कोल्डड्रिंक्स, कॅण्डी, कॉफी, सोडा, पॅक फूड यांचं सेवन टाळा. आहारातून जास्तीतजास्त भाज्या, सगळी धान्ये, कडधान्ये, डाळी, फळं घ्यायला सुरुवात करा. 

 

५. व्यायामात खंड पडू देऊ नका. व्यायाम जरूर करा पण प्रेग्नन्सीचा विचार असल्यास कोणता व्यायाम, किती वेळ आणि कसा करावा, याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योगा आणि इतर व्यायाम करा. 
 

Web Title: Planning for a baby? Then you must change these 5 things of your life style before pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.