Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदर आहे म्हणून नोकरी सोडायची, काम बंद करायचं का? कसं सांभाळाल वर्क-लाइफ बॅलन्स

गरोदर आहे म्हणून नोकरी सोडायची, काम बंद करायचं का? कसं सांभाळाल वर्क-लाइफ बॅलन्स

आपण आई होणार कळल्यावर महिलांना अनेकदा प्रश्न पडतो की आता आपल्या नोकरीचं काय, आपल्याला काम पूर्ण बंद करावं लागलं तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:20 PM2023-06-23T17:20:46+5:302023-06-23T17:57:38+5:30

आपण आई होणार कळल्यावर महिलांना अनेकदा प्रश्न पडतो की आता आपल्या नोकरीचं काय, आपल्याला काम पूर्ण बंद करावं लागलं तर?

Pregnancy and work life balance : Having a better work-life balance during pregnancy | गरोदर आहे म्हणून नोकरी सोडायची, काम बंद करायचं का? कसं सांभाळाल वर्क-लाइफ बॅलन्स

गरोदर आहे म्हणून नोकरी सोडायची, काम बंद करायचं का? कसं सांभाळाल वर्क-लाइफ बॅलन्स

डॉ. रुजुल झवेरी (स्त्रीरोगतज्ज्ञ )

गरोदरपणात जर काही शारीरिक किंवा मानसिक समस्या नसेल, तर गरोदर महिला आपले व्यावसायिक काम अगदी सहज करु शकता. फक्त त्यात जोखीम किंवा मानसिक तणाव असता कामा नये.  डॉक्टरच्या सल्ल्याने काम करण्याचा, त्यात काय काय काळजी घ्यायची याचा विचार करुन गरोदर महिला उत्तम काम करु शकते. (Having a better work-life balance during pregnancy)

गरोदर मातेनं काय करायला हवे?

१. नियमित अंतराने छोटी विश्रांती घेणे: सलग एका जागी बसून दीर्घकाळ काम करू नका. मध्ये मध्ये थोडे पाय मोकळे करा आणि काही क्षण डोळे मिटून पाय थोडे उंच ठेवून आराम करा, ज्यामुळे तुम्हाला नवी ऊर्जा मिळेल.

२. पुरेशा प्रमाणात  दिवसभर थोड्या थोड्या वेळाने तुम्ही पाणी पिणे आवश्यक. तर तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित राहील, शरीरातील सांध्यांना वंगण मिळेल, पेशींना पोषण मिळेल आणि संसर्ग रोखण्यास मदत मिळून तुम्ही तरतरीत राहाल. पण, लक्षात ठेवा, रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नका. कारण त्यामुळे तुमची झोपमोड होवू शकते.

३. अनावश्यक काम करण्याचे टाळणे: जास्तीचे काम करू नका. प्राथमिकतेनुसार दिवसभरात काय काय कामे आहेत, यांची यादी बनवा आणि ते काम कोणाकोणाला सोपवता येत असल्यास तसे करा. आपल्या दिनचर्येतून अनावश्यक असलेली कामे काढून टाका.

४. बोलून मन मोकळे करा: मनावरील ताण कधीच वाढू देऊ नका. या तणावाचा प्रतिकूल परिणाम फक्त तुमच्या नाही, तर तुमच्या पोटातील बाळाच्या प्रकृतीवर देखील होतो. जवळच्या सहकाऱ्याशी किंवा सोबत्याशी बोलून मनातील तणावाला, नैराश्याला वाट करून द्या.

५. काही पदार्थांच्या काही विशिष्ट वासामुळे किंवा स्वादामुळे मळमळण्याचा किंवा डोहाळ्यांचा त्रास होऊ शकतो. जो प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळा असतो. गरोदरपणातील पहिल्या ३ ते ४ महिन्यांपर्यंत सतत असे मळमळणे अगदी सामान्य आहे. पण, त्यामुळे तुमच्या कामावर आणि व्यक्तिगत आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काय खावे आणि कसे हे डॉक्टरांशी बोलून ठरवा.

६. रात्री लवकर झोपणे: दररोज रात्री कमीत कमी आठ तास झोप घेण्याचे मनाशी ठरवा. त्यासाठी, रोज रात्री लवकर झोपा आणि झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी सेलफोन वापरू नका.

७. फिटनेस रूटीन सांभाळा: शारीरिक कसरतीमुळे तरतरी येते. विशेषतः बैठे काम करणाऱ्यांच्या बाबतीत ही विशेष दिसून येते. थोड्या थोड्या वेळाने पाय मोकळे केल्याने स्नायूंमधील तणाव कमी होतो आणि हातांपायावर सूज येण्याची शक्यता कमी होते. आपल्या प्रसूतीतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार चालण्याचा व्यायाम करा किंवा एखाद्या पॅरेन्टल फिटनेस क्लासला जा.

८. गरोदरपणात पुढे पुढे बऱ्याचदा झोपणे, बसणे, चालणे यांसारख्या सामान्य हालचाली करताना देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे आरामदायक खुर्ची निवडा, ज्यात पाठीच्या खालच्या बाजूस आधार मिळेल. ज्यामुळे तासनतास खुर्चीत बसणे सुसह्य होऊ शकेल. पाठीला अतिरिक्त आधार देण्यासाठी छोटी उशी किंवा कुशनचा उपयोग करू शकता. पायावरची सूज टाळण्यासाठी पाय थोडे उंच राहतील अशी व्यवस्था करावी. (पायाखाली छोटे स्टूल ठेवणे)

९. ज्यांना बराच वेळ उभे राहून काम करावे लागते, त्यांनी एक पाय जरा उंच फुटरेस्टवर किंवा बैठ्या स्टूलावर ठेवण्याची खबरदारी घ्यावी. पाय आलटून पालटून त्यावर ठेवावेत तसेच मध्येच जरा विश्रांतीही घ्यावी. 
१०. एखादी वस्तू उचलताना ती जड असल्यास विशेष काळजी घ्या. हलकी वस्तू उचलताना देखील कमरेतून न वाकता गुडघ्यातून वाका. वस्तू उचलताना शरीर वळणार नाही (ट्विस्ट) याची काळजी घ्या.

(NH-SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल, हाजी अली, मुंबई)

Web Title: Pregnancy and work life balance : Having a better work-life balance during pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.