Join us   

Pregnancy : डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये जाताना काय तयारी कराल, तयार ठेवा Maternity Bag;, अशी करा तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 5:47 PM

Pregnancy : डिलिव्हरीनंतर आरामदायक, जरा सैल असलेले इनरवेअर्स वापरा. त्याचप्रमाणे आधीच इनरवेअर्स घेऊन ठेवा.

गरोदरपणात तारीख जवळ आल्यानंतर जेव्हा महिलांना रुग्णालयात जावं लागतं तेव्हा खास तयारी करावी लागते.  रुग्णालयात काय न्यायचं हे माहित असायला हवं, नाहीतर ऐनवेळी धावपळ होते. दवाखाना घरापासून लांब असेल तर  येण्या जाण्यासाठी  घरातील इतर व्यक्तीला त्रास. त्यापेक्षा आधीच आपण व्यवस्थित बॅग भरून ठेवली तर गैरसोय होणार नाही.

बेसिक, रोज लागणारं सामान

रुग्णालयात नेण्यासाठी बॅगपॅक करताना लहान पाऊचमध्ये आधी लहान आणि बेसिक वस्तू पॅक करा. टुथपेस्ट टुथब्रश, फेसवॉश, बॉडीवॉश, शॅम्पू, कंडिश्नर,टिश्यू, टॉवेल, हेअर ब्रश, साबण, रूमाल या वस्तू आधीच ठेवा. डिलिव्हरीनंतर काही दिवस रुग्णालयात राहावं लागत असेल तर या वस्तूंचा उपयोग होतो. 

बाळासाठी या वस्तू सोबत घेऊन जा

बाळाला डायपर आणि वाईप लागू शकतात. म्हणून रुग्णालयात जात असतानाच डायपर  आधीच बॅग मध्ये ठेवा. नवजात बाळाला एका दिवसात अनेकदा डायपर बदलावे लागू शकते. बाळाची त्वचा संवेदनशील असते.  त्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. 

बाळाचे अंग स्वच्छ करण्यासाठी निर्जंतूक असलेल्या बेबी वाईप्स वापर जरूर करा किंवा पारंपारिक सुती कपड्यांचा वापर करू शकता. यासाठी बाळाचे लंगोट, झबलं, टोपी आणि दुपटी स्वच्छ धुवून निर्जंतूक करून सुकवा आणि बॅगेत भरून ठेवा. बाळाला घरी आणताना बेबी ब्लँकेट वापरणं फायद्याचं ठरेल.

स्वत:साठी 

डिलीव्हरीनंतर काही दिवस अंगावरून रक्त जातं. त्यासाठी आधीच तयारीत असणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्येही सॅनिटरी पॅड्स तुमच्या त्वचेला सुट होतीलच असं नाही. त्यामुळे नेहमी वापरत असलेले सॅनिटरी पॅड्स जवळ ठेवावेत. रुग्णालयात जाताना बॅगमध्ये ब्रा आणि ब्रेस्ट फिडिंगचे गाऊनही सोबत  ठेवा. जेणेकरून ऑपरेशननंतर घातला येतील. बाळाला स्तनपान कराताना त्याचा उपयोग होतो. डिलिव्हरीनंतर आरामदायक, जरा सैल असलेले इनरवेअर्स वापरा. त्याचप्रमाणे आधीच इनरवेअर्स घेऊन ठेवा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सप्रेग्नंसीगर्भवती महिलाआरोग्य