लग्नाच्यावेळी पती किंवा पत्नीचा ब्लड ग्रुप सारखा असू नये असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. जर दोघांचाही ब्लड ग्रुप सारखा असेल तर बाळाच्या जन्माच्यावेळी समस्यांना तोंड द्यावं लागू शकतो याशिवाय एकापेक्षा जास्तवेळा गर्भापत होण्याचा धोकाही वाढतो. याबाबत अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेत. यात किती तथ्य आहे याबाबत डॉ. सुप्रिया पुराणिक यांनी व्हिडीओच्या माध्यमातून अधिक माहिती दिली आहे.
डॉक्टर सुप्रिया यांच्या म्हणण्यानुसार ब्लड ग्रुपचे २ कम्पोनेंट्स असतात. A, B, AB आणि O. दुसऱ्या कम्पोनेंट्सला RH फॅक्टर्स असं म्हटलं जातं. ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन असतात ते लोक आरएच पॉझिटिव्ह असतात. ज्या लोकांमध्ये आरएच एंटीजन नसतात ते लोक निगेटिव्ह असतात. म्हणून प्रत्येक ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. उदा, A+, A-, B+, B-, O+, O_.
जेव्हा पती पत्नीचे ब्लड ग्रुप वेगवेगळे असतात. उदा, होणारी आई O+ असेल आणि होणारे पिता A,B किंवा AB या रक्तगटाचे असतात त्यावेळी होणाऱ्या बाळात ABO Incompability होण्याची शक्यता असते. सगळ्याच प्रकरणांमध्ये असं होत नाही. पण काही प्रकरणात बाळाला ही समस्या जाणवते परिणामी बाळाला जन्मत: काविळ होण्याचा धोका असतो.
जेव्हा होणारी आई आर एच निगेटिव्ह असते आणि होणारे वडील आरएच पॉझिटिव्ह असतात तेव्हा होणाऱ्या बाळाला RH Incompability होण्याची शक्यता असते. म्हणजेच गरोदरपणात RH निगेटिव्ह मातांना एनटीडीचे इन्जेक्शन द्यावे लागते. डिलिव्हरीनंतर बाळाचा ब्लड ग्रुप तपासला जातो. बाळाचा ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरी मातेला पुन्हा एनटीडीचे इन्जेक्शन दिले जाते.
याचाच अर्थ असा की या जोडप्यांचे ब्लड ग्रुपसारखे असतात त्यांच्या होणाऱ्या बाळात ABO Incompability किंवा RH Incompability उद्भवण्याचा धोका नसतो. त्यांची बाळं सुरक्षित असतात. म्हणूनच पती, पत्नीचा ब्लड ग्रुप सारखा असल्यासं घाबरण्याचं काहीही कारण नाही.
जोडप्यांनी hb electrophoresis चाचणी जरूर करून घ्यायला हवी. जेणेकरून बाळाला hemoglobin abnormalities होऊ शकतात की नाही याबाबत कळू शकेल. यावरून लक्षात येतं की बाळाला थालेलिमिया होण्याची शक्यता आहे की नाही.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शक्य असल्यास जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करू नका. लग्न करायचं असेल तर दोघांचेही जेनेटिक्स अभ्यास केला जाणं फार महत्वाचं आहे. जेणेकरून सतत गर्भपात होणं, बाळामध्ये दोष होण्याची शक्यता कमी असते.