Lokmat Sakhi >Health >Pregnancy > इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....

इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....

Mom-to-be Ileana D'Cruz talks about her baby's dance party in belly, gorging on shakshuka : गरोदरपणातले आपले अनुभव इलियाना डिक्रूझ शेअर करतेय, सांगतेय मनात आणि शरीरात होणारे बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2023 06:07 PM2023-05-06T18:07:38+5:302023-05-06T18:16:49+5:30

Mom-to-be Ileana D'Cruz talks about her baby's dance party in belly, gorging on shakshuka : गरोदरपणातले आपले अनुभव इलियाना डिक्रूझ शेअर करतेय, सांगतेय मनात आणि शरीरात होणारे बदल

Pregnant Ileana D'Cruz Struggles To Sleep; Mommy-To-Be Shares ‘Baby Nugget Decides To Have... | इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....

इलियाना डिक्रूझ म्हणते, आईला झोप येते पण पोटातलं बाळ तेव्हाच जागं होतं आणि....

आई होणे हा क्षण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात खास आणि लक्षात राहण्यासारखा आनंद सोहळा असतो. आई होत असताना तिच्यात खूप सारे बदल होत असतात. अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D'Cruz) गेल्या महिन्यातच इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिने प्रेग्नसीची घोषणा केली होती. यानंतर तिने तिच्या प्रेग्नसीचे सगळे खास क्षण फोटो म्हणून इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आपल्या पहिल्याच प्रेगनन्सीचे वेगवेगळे अनुभव सांगणारे व्हिडीओ आणि फोटो ती सध्या तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करते. 

प्रेगनन्सी दरम्यान प्रत्येक स्त्रीमध्ये अनेक बदल होत असतात. तसेच या होणाऱ्या बदलांना त्या स्त्रीला एकटीलाच सामोरे जावे लागते. शारीरिक आणि मानसिक बदल होतात.  त्रासही होतो. परंतु मातृत्वाची लागलेली चाहूल स्त्रीला हे सारे त्रास विसरण्यास भाग पाडते. इलियानाने नुकतेच, तिच्या प्रेगनन्सीमुळे (pregnancy update) तिला कसे झोपता येत नाही किंवा झोपताना काय काय त्रास होतो याबद्दलची माहिती शेअर केली आहे. 

इलियाना म्हणते जेव्हा पोटात माझ्या बाळाची डान्स पार्टी सुरु असते... 

नुकतेच इलियानाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून वेगवेगळ्या फोटोची सिरीज पोस्ट केली होती. ती म्हणते " आम्हाला झोप येत नाही, झोपताच येत नाही कारण आपला डोळा लागणार तोच पोटातलं बाळ डान्स पार्टी करत हलायला लागतं.’

बाळ झाल्यानंतर लगेच स्लिम व्हायचा हट्ट तरी कशाला? आलिया भटचा सल्ला, आई झाल्यावर...

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

काही आठवड्यांपूर्वी इलियानाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली आणि म्हणाली, “लवकरच येत आहे. माझ्या प्रिये, तुला भेटण्याची प्रतीक्षा करू शकत नाही. ” इलियानाने बाळाच्या वडिलांचे नाव सांगितले नाही.  इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनला बऱ्याच काळापासून डेट करत होती. तसेच २०१९ मध्ये हे दोघेही विभक्त झाल्याची बातमी आली. अलीकडे, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन कैफला डेट करत असल्याची अफवा पसरली होती .

Web Title: Pregnant Ileana D'Cruz Struggles To Sleep; Mommy-To-Be Shares ‘Baby Nugget Decides To Have...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.