गर्भावस्था हा प्रत्येक महिलेसाठी खास क्षण असतो. याच काळात महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागू शकतो. गर्भावस्थेबाबत वेगवेगळे अभ्यास नेहमीच समोर येत असतात. नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार गर्भावस्थेत दारू पिणं मातेच्या शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार गर्भावस्थेदरम्यान ज्या महिला बाळाला जन्म देण्याचा विचार करत आहेत त्यांनी स्वतःला दारू पिण्यापासून रोखायला हवं.
जागतिक आरोग्य संघटनेनं अलिकडेच ग्लोबल अल्कोहोल एक्शन प्लानच्या माध्यमातून दारूच्या सेवनानं होणारं नुकसान आणि हानीकारक उपयोगाबाबत सांगितले आहे. यातून लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचे काम केले जात आहे. या एक्शन प्लानच्या पहिल्या टप्प्यातील माहितीनुसार लहान मुलांसह गर्भवती महिलांना मद्याचे सेवन करण्यापासून रोखायला हवं याशिवाय जास्त वयाच्या महिलांनीही मद्याचे सेवन करू नये. याच्या सेवनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा सामन करावा लागू शकतो. मानसिक आरोग्यावर परिणाम होणं, हिंसक स्वभाव, ताण येणं अशा समस्या उद्भवू शकतात.
आई बनण्याचा विचार करत असलेल्या महिलांनी गर्भावस्थेत दारू प्यायाल्यास जन्माला येत असलेल्या बाळात अल्कोहोल एक्सपोजर चा धोका असतो. गर्भावस्थेत नवजात बाळाला फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसॉर्डर या आजाराचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय बाळाचा विकास व्यवस्थित न होणं, तोंडाच्या आकारात बदल, शिकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावानुसार अशा प्रकारच्या समस्यांना दूर ठेवण्यासाठी आंतराराष्ट्रीय दारू निषेध दिवसाचे (world no alcohol day/week) आयोजन करायला हवं. युकेच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आई होण्याच्या तयारीत असलेल्या महिलांनी कोणत्याही प्रकारे दारूचे सेवन करणं योग्य ठरत नाही.
युके अल्कोहोल ट्रेड बॉडी, पोर्टमॅन ग्रुपचे प्रमुख मॅट लॅम्बर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार WHO चा प्रस्ताव हा फारच चिंताजनक विषय आहे. एनएचएस वेबसाइटवर नमुद केलेल्या माहितीनुसार गर्भावस्थेत दारूचे सेवन केल्यानं बाळावर बराच वाईट परिणाम होतो. बाळाच्या अवयवांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.