Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

What is egg freezing, procedure that helped Priyanka Chopra become mother? : एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) म्हणजे नेमकं काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2023 06:22 PM2023-03-30T18:22:58+5:302023-03-30T18:46:52+5:30

What is egg freezing, procedure that helped Priyanka Chopra become mother? : एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) म्हणजे नेमकं काय ?

Priyanka Chopra felt ‘freedom’ after freezing her eggs ‘in her early 30s’; gynecologist explains all you need to know about this procedure | प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

प्रियांका चोप्रा सध्या चर्चेत आहे. कारण आहे एग्ज फ्रिजिंग. पूर्वीच्या काळात लग्न आणि मुलं जन्माला घालणे याचे एक ठराविक वय मानले जात असे. परंतु आता उच्च शिक्षण, जॉब, करिअर या सगळ्या गोष्टींमुळे काही जोडपी लग्नानंतर लगेच बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेत नाहीत. मूल नेमके कधी हवे हा निर्णय व्यक्तीपरत्वे बदलतो. पण एका ठराविक वयानंतर नैसर्गिक पद्धतीने बाळाला जन्म देणं कठीण होतं किंवा फर्टिलिटी कमी होते, अपत्य प्राप्ती अवघड होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून आणि आपलंच बाळ आपल्याला हवं तेव्हा जन्माला घालता यावं म्हणून काही महिला एग्ज फ्रिजिंगचा निर्णय घेतात. प्रियांका चोप्रानेही नुकतेच सांगितले की तिने एग्ज  फ्रिज  करुन ठेवले होते.

 प्रियांका चोप्राने नुकतेच सांगितले ती वयाच्या ३० व्या वर्षीच एग्ज फ्रिजिंग केले होते. प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा ही एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहे, आपल्या आईनेच मला हा एग्ज फ्रिजिंगचा सल्ला दिला असल्याचे प्रियांका सांगते. अलीकडेच प्रियांकाने दिलेल्या एका मुलाखती दरम्यान बॉलिवूड सोडण्यापासून ते निक जोनसशी लग्न व एग्ज फ्रिजिंग करण्याबद्दलही भाष्य केलं. प्रियांका चोप्राने सांगितले की, 'मला मुलं खूप आवडतात. युनिसेफमध्येही मी मुलांसोबत बराच वेळ घालवला आहे. मला नेहमीच आई व्हायचं होतं कारण मला मुले फार आवडतात. मी माझ्या ३० व्या वर्षी एग्ज फ्रिजिंग (Eggs Freeze) करुन घेतले होते. माझ्या आईने मला समजावून सांगितले की ३५ वर्षांच्या वयानंतर मुलं होण्यात अडचण येते." अशा परिस्थितीत मी संपूर्ण वैद्यकीय सल्ला घेत ते केले.  त्यावेळी माझे लग्नही झाले नव्हते आणि मी निक जोनसला डेटही करत नव्हते. पण एग्ज फ्रिजिंग (Eggs Freeze) केल्याने मला खूप फायदा झाला. मला मूल हवं होतं म्हणून मी तो निर्णय घेतला.’(Priyanka Chopra felt ‘freedom’ after freezing her eggs ‘in her early 30s’; gynecologist explains all you need to know about this procedure).

एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) म्हणजे नेमकं काय ? 

एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) ही एक शास्त्रीय वैद्यकीय  प्रक्रिया आहे जी स्त्रियांना त्यांच्या पसंतीच्या वयात बाळाला जन्म देण्याची परवानगी आणि प्रजनन स्वातंत्र्य देते. एका विशिष्ट वयामध्ये ओव्हरीमधून मॅच्युर एग्ज काढून लॅबमध्ये हे एग्ज शून्य तापमानावर फ्रिज केले जातात. जेव्हा या एग्जची गरज भासते तेव्हा शुक्राणूंसह (Sperm) यांचा मिलाप घडून गर्भाशयात हे स्थलांतरित करण्यात येते. त्यामुळे एका विशिष्ट वयानंतरही कोणत्याही महिलेला आई होता येतं. तुम्हांला एखाद्या विशिष्ट वयात आई व्हायचं नसेल पण काही वर्षांनंतर तुम्हांला आई व्हायची इच्छा झाली तर तुम्हांला या एग्ज फ्रिजिंग प्रक्रियेमुळे आपलं स्वप्नं साकार करता येतं. यासाठी तुम्हांला कोणत्याही शुक्राणूंची किंवा अन्य गोष्टींची गरज भासत नाही. कारण तुमचे एग्ज हे एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येतात. जेणेकरून तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा गरोदर होण्यासाठी याचा वापर करू शकता. भविष्यासाठी तुम्ही तुमच्या तरूण वयातही हे एग्ज फ्रिजिंग करून ठेऊ शकता. ते बरेच काळ टिकून राहते आणि त्याचा पुढे कोणताही त्रास होत नाही. 

एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) कमी वयातच का करावे ? 

डॉक्टरांच्या मते, कमी वयातच एग्ज फ्रिज करण्याचे अनेक फायदे होतात. यामुळे एखाद्या महिलेला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आई होता येते. तज्ज्ञांनुसार वय वाढल्यानंतर अनेक आजारांमुळे महिलांच्या अंड्यांमध्ये दर्जा आणि संख्येत कमतरता येऊ शकते, त्यामुळे कमी वयात एग्ज फ्रिजिंग करावी. कमी वयात अर्थात २० ते ३० वय वर्षाच्या दरम्यान एग्ज फ्रिज करणे योग्य ठरते. कारण यानंतर एग्जची संख्या कमी होऊ लागते. कमी वयात एग्ज फ्रिज केल्याने एग्जचा दर्जा चांगला राहू शकतो. ज्यामुळे कधीही त्याचा वापर करता येऊ शकतो. या वयादरम्यान चांगल्या दर्जाचे एग्ज सर्वात जास्त प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यामुळेच पूर्वी साधारण वीशीनंतर लग्न करण्याचा आग्रह असायचा. मुलांना जन्म देण्यासाठी हा काळ योग्य असतो. तसंच या वयामध्ये गर्भावस्थेदरम्यान होणाऱ्या गुंतागुंतीही कमी होतात यामुळेच कमी वयातच एग्ज फ्रिजिंग (Egg Freezing Technique) करण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Priyanka Chopra felt ‘freedom’ after freezing her eggs ‘in her early 30s’; gynecologist explains all you need to know about this procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.