गर्भधारणेनंतरचे नऊ महिने खूप कठीण असतात. या नऊ महिन्यांत महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात, मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. (Sexual Health in pregnancy) काही स्त्रियांना गरोदरपणात जास्त राग येतो, चिडचिड होते. मूड स्विंग्ज होतात. त्याचकाळात जोडीदाराने जर शरीरसंबंधांची मागणी केली तर अनेक स्त्रिया नकार देतात. त्यांना आपल्या पोटातल्या बाळाला त्रास होण्यासह स्वत:लाही वेदना होण्याचं भय असतं. (What to know about sex during pregnancy)
अनेकींची त्याकाळात थेट सेक्सची मानसिक -शारीरिक तयारीच नसते. मात्र त्यामुळे दोघांच्या नात्यात ताण येणं, विसंवाद असेही प्रश्न निर्माण होतात. त्यासंदर्भात कुणी सहसा उघडपणे बोलत नाहीत. पूर्वी असा समज होता की गरोदरपणात शरीरसंबंध ठेवू नयेत. आता मात्र पहिल्या तीन महिन्यांचा नाजूक काळ आणि शेवटच्या महिन्यातले अवघड दिवस वगळता कशाप्रकारे सुरक्षित शरीरसंबंध ठेवता येऊ शकतात अशी चर्चा दिसते, त्याबाबत अनेकजण मार्गदर्शनही घेतात. मात्र यासंदर्भात नेमकं खरं काय, शास्त्र काय सांगतं, गरोदर महिलेसाठी आणि बाळासाठी सुरक्षित काय याविषयावर लोकमत सखीने स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गौरी करंदीकर यांच्याशी बातचित केली. (is it safe to have intercourse during pregnancy)
नेमकं खरं काय, डॉ करंदीकर सांगतात..
१. महिला गरोदर असली तर सेक्शुअल ड्राईव्ह (Sexual Drive) म्हणजे कामेच्छा ही दोघा जोडीदारांना असू शकते. प्रेग्नंसी साधारणपणे तीन ट्रायमिस्टरमध्ये विभागली जाते. म्हणजेच तीन महिन्यांचे ३ टप्पे. पहिल्या टप्प्यात नुकताच बाळाचा विकास व्हायला सुरूवात झालेली असते. त्यावेळी उलट्या, थकवा, प्रेग्नंसीच्या अनिश्चिततेमुळे ताण तणाव असतो. परिणामी पहिल्या ३ महिन्यात सेक्शुअल ड्राईव्ह महिलांमध्ये कमी असतो. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच चौथ्या ते सहाव्या महिन्यापर्यंत सेक्शुअल ड्राईव्हमध्ये वाढ झालेली असते. कारण स्त्रिया प्रेग्नंसीबाबत अधिक आरामदायक असतात आणि प्रेग्नंसीचा आनंद घेतात. (Pregnancy Sex Through the Trimesters )
शेवटच्या तीन महिन्यात बाळाची स्थिती, बाळाला काही होण्याची भिती यामुळे नैसर्गिकरित्या कामेच्छा कमी झालेली असते. याऊलट पुरूषांमध्ये पहिल्या दोन ट्रायमिस्टरमध्ये सेक्यूअल ड्राईव्ह नेहमीसारखाच असतो, लैगिंक गरजांमध्ये काहीही बदल झालेला नसतो. पण तिसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये त्यांनाही सेक्शुअल पोझिशन्स, सेक्शुअल ॲक्टबद्दल थोडं चिंताग्रस्त वाटते. जबाबदारीची जाणीव होते. सेक्शुअली एक्ट्रॅक्शनही कमी होतं त्यामुळे कामेच्छा कमी होते.
आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं साहजिक असलं तरी लक्षात घ्या विवाहित पुरुषाला डेट करण्यातले धोके
२. सेक्शुअल इंटरकोर्स प्रेग्नंसीत करू नये यात पूर्णपणे तथ्य नाही. कारण मेडिकल सायन्समध्ये कुठेच असं नमूद करण्यात आलेलं नाही. ज्या बायकांना प्रेंग्नंसीच्या सुरूवातीपासून कोणत्याही महिन्यात ब्लिडींग झालं असेल किंवा आई आणि बाळ यांना साधणारा दुवा म्हणजे वार (प्लेसेंटा). गर्भावस्थेत पिशवीमध्ये अनेकदा वरील बाजूस 'प्लेसेंटा' असावी लागते. आई आणि बाळ यांच्यात रक्ताचे एक्सचेंज करणारी वार (Placenta) ही खालच्या बाजूला म्हणजेच गर्भपिशवीच्या मुखाजवळ त्याची वाट झाली असेल तर त्याला Low lying Placenta म्हणतात. अशा वेळी ब्लीडिंग होण्याची भिती असते. म्हणूनच संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
३. ज्यांना योनी मार्गात इन्फेक्शन्स आहेत किंवा पार्टनरला इन्फेक्शन असतील तर प्रेग्नंसीत संभोग टाळावा. पहिल्या प्रेग्नंसीत अपूर्ण दिवसात डिलिव्हरी झाली असेल तर प्रेग्नंसीत रिलेशन न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. प्रेग्नंसीत संबंध ठेवावेत की ठेवू नयेत हे जोपड्यांच्या शारीरिक स्थितीवर, सेक्शूअल लाईफवर अवलंबून असतं.