प्रेग्नंसी हा खूपच नाजूक आणि महत्त्वाचा काळ असतो. यादरम्यान महिलांना भरपूर काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. गरोदरपणात नऊ महिन्यांमध्ये काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी असं सगळं होणाऱ्या आईला डॉक्टर आणि बाकी तज्ज्ञ वडिलधारे सांगतातच. (Pregnancy Tips for Smart baby) पण तरीही मनात धाकधूक असतेच की आपण जे करतो ते पोटातल्या बाळासाठी पोेषक आहे का? बाळाला त्याचा फायदा तर होईल? अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना एका महिलेने विचारले की गर्भवती महिलांना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? त्याचं उत्तर देताना श्री श्री रविशंकर यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ( Shri Shri Ravi Shankar's advice for pregnant women)
संगीत ऐका
युनिसेफच्या रिपोर्टनुसारही प्रेग्नंसीत संगीत ऐकल्याने मुलांच्या मेंदूचा विकास चांगला होतो. महिलांनाही रिलॅक्स वाटते. तिसऱ्या तिमाहीत मुल संगीत ऐकू शकते. क्लासिकल म्यूझिक, अंगाई ऐकू शकता. यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल. गुरूदेव सांगतात की गर्भवती महिलांनी गाणी ऐकायला हवीत. तुम्ही हवंतर इंस्ट्रुमेंटल म्युझिक ऐकू शकता. रात्री झोपण्याआधी संगीत ऐका. याशिवाय भितीदायक चित्रपट, मालिक बघणं टाळा. जास्त हिंसात्मक शोव्ह पाहू नका. तुमच्या मनाला आनंद वाटेल अशा गोष्टी करा.
हिरवा रंग जवळपास ठेवा
गुरूदेव सांगतात की भारतासारख्या पारंपारीक देशात महिलांनी गर्भावस्थेत हिरवा रंग जवळ ठेवायला हवा. तुम्हाला या रंगाचा प्रत्येक शेड वेगवेगळा वाटेल पण कोणताही आरामदायक हिरवा रंग डोळ्यांना दिसेल असं पाहा. बोल्ड स्कायवर प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुससार हिरवा रंग जन्माचं प्रतिक असते. सृजनाचं प्रतीक म्हणजे हिरवा रंग.
विकास आणि शांततेसाठीही हा रंग चांगला असो. म्हणून गर्भवती महिलांना हिरव्या रंगाच्या सानिध्यात राहावं. प्रेग्नंसीमध्ये संतुलन राहणं गरजेचं असतं. कलर थेरेपीमध्ये हिरवा रंग गुणकारी ठरतो. फर्टिलिटीशी याचा संबंध आहे. माती आणि पृथ्वीशी जोडलेला असतो.